अनैतिकता , संगीत दिग्दर्शक आणि Nostalgia चे उमाळे
मी अशात ऐकलेली नवीन वैचारींक पिंक :
headphone वर गाणे ऐकत बसलो होतो .
बाजुच्या डेस्क वरचे काका ," काय रे ? काय ऐकत आहेस ? "
"आतिफ अस्लम ."
त्यांनी माझ्याकडे सहानुभूती पूर्वक कटाक्ष टाकला . त्याला माझा आक्षेप नव्हता . पण ते जे काही बोलले त्यामुळे मी पार भंजाळून गेलो . इतका की ते वाक्य पूर्ण पणे quote करण्याचा मोह आवरत नाही .
"तुमच्यासमोर दुसरे काही चांगले option नाहीत का रे ? हे आजकालची पोर (संगीत दिग्दर्शक ?) इंग्लिश गाणी चोरतात आणि तुम्हाला ऐकवतात . तुम्हाला पण जे काही बाही पाश्चमात्य ते सगळ गोड वाटत . आमची पिढी त्याबाबतीत खूप नशीबवान . काय ते दिग्गज एकेक संगीत दिग्दर्शक होते त्याकाळी . ओपी , बर्मन साहेब , सलिल चौधरी . वा वा ! देवाघरची माणस सगळी . त्यांनी या मातीतल संगीत दील . काय त्या रसाळ चाली . काय ती melody !आणि हे सगळ original बर का. तुमच्या अनु मलिक आणि प्रीतम सारख्या चोऱ्या नाही केल्या त्यांनी. "
असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते . भारतीय चित्रपटा च्या इतिहासात मला रस असल्याने मी त्यावर थोड फार वाचन केल होत . त्यामुळे मला हे माहित होत की भारतीय चित्रपट हा plagiarism चा इतिहास अंगावर भरजरी दागिना बाळगावा त्याप्रमाणे वागवतात . अगदी सुरुवातीपासून . मग च्यामारी ह्या ५०, ६० आणि ७० च्या दशकातल्या म्युझिक directors एकदम कसे काय गुणवत्तेची खाण निपजले की त्याकाळातले लोक आज पण त्यांच्या नावाने उसासे टाकत असतात ? अशी कशी bollywood रुपी चिखलात हि कमळ उगवली ? दाल मे जरूर कुछ काला है म्हणून थोड अधिक संशोधन केल . मग कळल की पूर्ण दालच काली आहे .
म्हणजे अस बघा . आजा सनम मधुर चांदनी मे हम हे राज कपूर च्या चोरी चोरी मधल शंकर -जयकिशन च मधुर गाण एका गाण्यावरून (http://www.youtube.com/watch?v=U-xsosv6uM0) सरळ सरळ ढापल आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार ? दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा हे सलिल चौधरी च रसाळ गाण सही सही नक्कल (http://www.youtube.com/watch?v=jLijXZBsdbo) आहे हे कळाल्यावर धक्का नाही बसणार . आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? आमच्या पिढीच एक ठीक आहे हो पण 'सुवर्ण काळाच्या ' आठवणी काढून उसासे टाकणाऱ्या व आजकालच्या संगीताला उठसुठ नाव ठेवणार्या बाजूच्या डेस्क वरच्या काकासार्ख्या लोकाना काय वाटेल ? ज्या nostalgia च्या आपण दिवसरात्र ढेकरा देतो तोच अनैतिक पायावर उभा आहे हे कळल तर पायाखालच जाजम काढून घेतल्यासारख feeling नाही येणार त्यांना ?
वस्तुस्थिती हि आहे की या तथाकथित 'सुवर्ण कालामधली ' अनेक गाणी ही त्याकाळच्या हिट इंग्रजी गाण्यावरून चोरलेली होती . त्यासाठी आपल्या गुणवान संगीत दिग्दर्शकांनी मुळ गाण्याची मालकी ज्यांच्याकडे होती त्यांच्याकडे परवानगी घेण्याची तोशीस पण घेतली नाही हे तर उघडच आहे . दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हि शुध्द चोरी होती . या चोरी चे अनेक तपशील तुम्हाला इथे सापडतील .
http://mrandmrs55.com/2012/08/24/plagiarism-in-hindi-film-music-is-imitation-the-most-sincere-form-of-flattery/
http://www.itwofs.com/hindi-opn.html
nostalgia चे उमाळे काढणाऱ्या लोकांचे आद्य सरदार जे की शिरीष कणेकर याना याबाबत कुणीतरी भर कार्यक्रमात प्रश्न विचारला . कणेकर काही क्षण नक्कीच गडबडले असतील पण त्यांनी जी मखलाशी केली ती मुळातून वाचण्यासारखी आहे . कणेकर म्हणतात ," त्यांनी गाणी चोरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही पण त्यांनी या गाण्याचं 'भारतीयकरण ' केल आणि त्यात जी melody आणली त्याच श्रेय या संगीत दिग्दर्शकाना द्यायला हव ." म्हणजे चोरी ते चोरी वर सिनाजोरी ?
या निमित्तान काही प्रश्न उपस्थित होतात .
१) अन्नु मलिक , प्रीतम , ओपी आणि बर्मन पितापुत्र हे संगीत शर्विलक या एकाच श्रेणीतले म्हणून गणले जाणार का ?
२) आता सगळाच मामला चोरीचा आहे हे कळल्यावर तरी nostalgia चे उमाळे थांबतील का ?
३) ओपी नय्यर आणि तत्सम संगीत दिग्दर्शक चोर आहेत हे कळल्यावर त्यांच्या भक्तांच्या भावना बदलणार आहेत का ?
मी जमा केलेला संगीत चोरीचा डाटा बाजूच्या डेस्क वर च्या काकाना मेल करणार होतो . पण नाही केला . ज्याचा त्याचा nostalgia . हल्ली मी माझ्या डेस्कवर आमच्या रहमान च्या rockstar ची गाणी फुल आवाजात ऐकतो .
🗣 चर्चा
(100)
फ
फारएन्ड
Sun, 01/12/2014 - 08:26
नवीन
जुने संगीतकार सगळे पूर्णपणे ओरिजिनल संगीत देत होते व आत्ताचे टोटल चोरतात असे मी म्हणणार नाही पण येथे टीका जरा टोकाची वाटते. बरीच 'सरळ सरळ ढापल्या' चा उल्लेख केलेली उदाहरणे मूळच्या "रॉ" किंवा लोकसंगीतात लोकप्रिय असलेल्या चाली व संगीताच्या तुकड्यांवर संस्कार करून आपल्या लोकांना आवडेल असे रूप त्याला दिलेले आहे असे जाणवते.
सरळ सरळ ढापणे म्हणजे माझ्या दृष्टीने कोणीतरी आधीच लोकप्रिय केलेली चाल व संगीत जसेच्या तसे वापरणे. माकारेना ची हिन्दी व्हर्जन, डोण्ट ब्रेक माय हार्ट नावाचे ते नवीन यारानातील भंकस गाणे ही तशी वाटतात मला.
या वरच्या लिन्क्स तशा वाटत नाहीत. 'ये दिल ना होता बेचारा', 'दिल तडप तडप के', 'आजा सनम मधुर चाँदनी मे हम' ही उदाहरणे मला मूळच्या कच्च्या स्वरूपातील संगीतावर केलेले संस्कार वाटतात. या गाण्यांमधे मूळच्या चालीतील सार्धम्याबरोबरच भारतीय संगीतकारांचीही मेहनत आहे.
आणि या उदाहरणांतून ज्या पद्धतीने एसडी/आरडी वगैरेंना "डिसमिस" केलेले आहेस ते पटले नाही - दोन्ही बर्मनचे संगीत अनेक रूपांत आहे. दोघांची शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक गाणी आहेत. तसेच दोघे बर्मन त्रिपुरा परिसरातील लोकगीते हिन्दीत आणण्याबद्दल फेमस होते. या वरच्या लिन्क्स मधली अनेक उदाहरणे (अगदी 'घर आया मेरा परदेसी' ऐकल्यावरही) ऐकल्यावर मूळ गाणे म्हणजे एखाद्या यंत्रात जाणारा मेटलचा ओबडधोबड ठोकळा व त्यावर आधारित हिन्दी गाणे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट वाटतो :)
(एस डी व जयदेव यांची याबाबतीत तुलना केलेली वाचली आहे. जयदेव आधी एस्डींचे साहाय्यक होते. जयदेव यांची गाणी एसडी इतकेच श्रेष्ठ असले तरी हम दोनो सारखा अपवाद सोडला तर त्या चाली, ते संगीत प्रचंड लोकप्रिय करण्यासाठी लागणारे कौशल्य एसडींकडे जास्त होते. हे मी वाचलेले आहे व मला पटले).
एकूण ही गाणी इतर गाण्यावरून सुचलेली नाहीत असे मी अजिबात म्हणत नाही. त्यांनी वेळोवेळी या मूळ गाण्यांचा उल्लेख करायला हवा होता. पण मूळचे गाणेच उचलून हिन्दीत आणले आहे याच्याशी सहमत नाही. बाकी देशोदेशीची लोकगीत ऐकून त्यावर गाणी बनवणे यात सहसा काही गैर मानले जात नाही.
मला नवीन लोकांबद्दल काहीच राग नाही. अगदी अन्नू मलिकची ही काही गाणी खूप छान आहेत. नॉस्टॅल्जियाच्या उमाळ्याबद्दल सहमत आहे. फक्त त्या ज्या काकांचा उल्लेख केलेला आहे त्यांचे म्हणणे हे एक टोक असेल तर ही वरची टीका जरा दुसरे टोक वाटली.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 08:41
नवीन
काहीतरी गैरसमज होतो आहे . मी कुणालाही dismiss करत नाही आहे . अनेक जुन्या संगीत दिग्दर्शकांनी इंग्रजी गाणी ढापली आणि श्रेय स्वतः घेतलं याला माझा आक्षेप आहे . आणि तो काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे reference आज पण दिले जातात हे दुर्दैव . चोरलेल्या गाण्या शिवाय त्यांनी स्वतःची काही चांगली गाणी दिली हे कबूल . पण ती सर्वाना माहीतच आहेत . पण या जुन्या संगीत दिग्दर्शकांचे पाय पण मातीचेच आहेत हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 08:56
नवीन
या वरच्या लिन्क्स मधली अनेक उदाहरणे (अगदी 'घर आया मेरा परदेसी' ऐकल्यावरही) ऐकल्यावर मूळ गाणे म्हणजे एखाद्या यंत्रात जाणारा मेटलचा ओबडधोबड ठोकळा व त्यावर आधारित हिन्दी गाणे म्हणजे फिनिश्ड प्रॉडक्ट वाटतो Smile
याचेच स्पष्टीकरण लेखातील कणेकरांच्या उदाहरणावरून दिले आहे . मूळ चालीचे 'भारतीयकरण ' करूनच ते इथे आणले जायचे .
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 01/12/2014 - 08:29
नवीन
तसे तर पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित गाण्यांना पण चोरी म्हणणार का? चोरी आणि प्रेरणा यात फरक कोणी कसा करायचा? कोणतीही कलाकृती मानवी जीवनावर, त्यातल्या अनुभवावर आधारित असतेच. मग ती सगळीच चोरी म्हणायची का?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 08:48
नवीन
लोकसंगीत किंवा भारतीय संगीत यांचे reference घेणाऱ्या बद्दल आक्षेप नाही . कारण तिथे copy right चा मुद्दा नसतो . पण एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची creation भ्रष्ट आणि सही सही नक्कल करणे आणि आपली म्हणून खपवणे हे नक्कीच आक्षेपार्ह आहे . जसे Frank Sinatra ची गाणी ओपी नय्यर ने स्वतःची म्हणून खपवली . आज लाखो भारतीयांना ती चाल नय्यर चीच आहे असे वाटते .
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 01/12/2014 - 09:15
नवीन
पण अगदी सही सही नक्कल आणि प्रेरणा घेऊन बनवलेले गाणे यात फर्क आता इतक्या वर्षांनी आपण कसा ठरवणार? "रहे ना रहे हम" आणि "सागर किनारे" ही गाणी "ठंडी हवाएं" वर आधारित असल्याचं त्या त्या संगीतकारांनी सरळ सांगितलं होतं. पण ही दोन्ही गाणी चोरीची आहेत असं आज म्हणता येईल का? याशिवाय "यही है तमन्ना" हे अजून एक गाणं याच सुरांचा उपयोग करून बनवलेलं. ही सगळी गाणी पहाडी रागावर आधारित असल्याचं म्हटलं जातं. मात्र यातील एकही गाणं कमी दर्जाचं आहे असं कोणीच म्हणू शकणार नाही. शेवटी सगळे ७ सूर. त्यातच काय ती कॉम्बिनेशन्स व्हायची.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 01/13/2014 - 16:03
नवीन
असे कुणी पिढीचे हिशेब द्यायला लागले की टाळके सरकते .
लेख/स्वानुभवातील हा मतितार्थ समजू शकतो आणि तेव्हढ्यापुरता सहमत देखील आहे.
कणेकर अथवा तत्सम काय म्हणतील हा वेगळा मुद्दा आहे.
पण एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची creation भ्रष्ट आणि सही सही नक्कल करणे आणि आपली म्हणून खपवणे हे नक्कीच आक्षेपार्ह आहे .
पैसा यांनी लिहीले आहेच. त्यात अजून भर... तुम्ही दिलेले दोन्ही दुवे हे पाश्चात्य शास्त्रीय/क्लासिकल संगीतातले आहेत. पहीला दुवा, Tarantella Napoletana चा होता जो इटालीअन रिफ अथवा मेलडी पद्धतीतीवर आधारीत आहे. दुसरा दुवा Szla dzieweczka चा होता जो पोलीश लोकसंगीतावर आधारीत आहे. त्यामुळे त्यात प्रत्यक्ष नक्कल नाही, खपवणे वगैरे तर नक्कीच नाही.
जसे Frank Sinatra ची गाणी ओपी नय्यर ने स्वतःची म्हणून खपवली
नक्की कुठली? हा उत्सुकतेपोटी प्रश्न आहे.
माझ्या मते: पूर्वीच्या (म्हणजे आर डी पर्यंतच्या) संगितकारांनी अशा इतर देशातील धून घेतल्या असतीलही कदाचीत, पण त्याहून अधिक स्वतःचे संगीत देखील तयार केलेले आहे. त्यांचा (कणेकरी) डिफेन्स म्हणून म्हणत नाही, पण अगदी १००% देशी बनावटीची गाणीच करायची असे ठरवले असते तर त्यांनी ते करून दाखवले असते. पण त्यांच्या ऐकण्यात आलेल्या सप्तसूरातील काही आवडलेल्या ताना/धून यांना त्यांनी आपल्या अमूक गाण्यात चांगल्या दिसतील असे म्हणत घेतले असेल तर त्यात काहीच गैर नाही. मला वाटते एकदा नौशाद अथवा शंकर (जयकीशनमधला) च्या एका फुल खिले है.... मधील मुलाखतीत सांगितल्याचे आठवते, त्याप्रमाणे त्याने कधी कधी अशा धून घेतल्यात कुठून घेतल्यात हे सांगितले होते.
हृदयनाथांनी अनेकदा अनेक गाण्यांचे सांगितलेले मी ऐकलेले आहे. त्यात "रंगा येई ओ" ची चाल ही एका बंगाली आरतीवरून कशी सुचली ते आहे. त्यांच्याच वडीलांनी दिलेली, "सुहास्य तुझे मनासी मोही.."ची चाल "मी मज हरपून बसले ग..." ला कशी दिली वगैरे भरपूर येते.
माझ्या लेखी ज्याला चोरी म्हणता येईल असा प्रकार, बप्पी लाहीरीने सुरू केला. गाण्याला चाली देण्याआधी (त्याकाळात इतर पर्याय मर्यादीत असल्याने) हा कुठल्यातरी देशात जाऊन येतो असे म्हणायची पद्धत झाली होती. त्याच्यातली ओरीजिनॅलीटी म्हणजे अशी चोरी/ढापणे म्हणता येईल. त्याचे स्वतःचे असे काहीच दिसणार नाही. अजून एक अक्षरशः ढापलेले गाणे म्हणजे "मैने प्यार कीया" हे टायटल सॉंग (आय जस्ट वाँट टू से आय लव्ह यू). गाणेच काय, भावनापण ढापल्यात! (अर्थात हे बप्पीचे नसून रामलक्ष्मण असे नाव लावून संगीत देणार्या विजय पाटील यांचे हे संगीत आहे).
लोकसंगीत म्हणून सोडून देता येईल, पण एकदा वणीच्या देवीवर एक नवरात्रात दूरदर्शनवर कार्यक्रम चालला होता. त्यात एका स्थानिक भाविकाने वणीच्या देवीची आरती अथवा लोकगीत म्हणताना पार्श्वसंगीतासारखे लावले होते. ते ऐकून धक्काच बसला, कारण उषा खन्ना यांनी संगीत दिलेले आणि किशोर कुमारमुळे गाजलेले सौतन मधले "जिंदगी प्यार का गीत है.." ह्या गाण्याची चाल जशीच्या तशी होती!
कदाचीत तुम्ही म्हणाल पण पाश्चात्यांनी असे केलेले नाही. त्यांच्या गाण्यात (ढापून नाही पण त्यावर आधारीत म्हणता येईल असे) आत्ता पर्यंत चर्च संगीत म्हणता येईल असे आणि अर्थातच मोझार्ट आणि तत्सम दिग्गजांनी बांधलेल्या ट्यून्स वर आधारीत चाली दिसतील. त्यांनी आत्तापर्यंत भारतीय संगीताकडे (रवी शंकर वगैरे सोडल्यास) लक्षच दिले नव्हते. पण आता ते बदलत आहे. (जसे इतिहास म्हणले की यांची फक्त युरोप आणि इस्त्रायलपासूनच सुरवात होते तसेच संगीताबाबत आहे/होते.)
असो. आपल्याकडे केवळ व्यावसायीक संगीतकारांनीच संगीताची चोरी केलेली नाही तर तुम्ही म्हणता ती प्रत्येक चोरीच समजायची झाली तर तशी सरकारीपातळीवर पण झाली होती... कुठली? ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 01/13/2014 - 16:15
नवीन
शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते तेव्हा सव्वीस जानेवारीच्या एका कार्यक्रमात बोनी एमच्या "रासपुतीन" मधला एक तुकडा मिल्ट्री ब्यांड वाजवत होता आणि त्यावर परेड चालू होती.
मला "गो गो रासपुतीन, रशियाज ग्रेटेस्ट लव्ह मशीन, इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन" वगैरे आठवत होतं आणि तिकडे शर्माजी गंभीरपणे सॅल्युट करत होते!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 01/13/2014 - 16:52
नवीन
अगागागागागा =)) =))
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 01/13/2014 - 17:20
नवीन
हे काहीतरी भलतचं! कठीण आहे!
आम्ही फार साधे आहोत हो! ;)
आम्ही फक्त "हम होंगे कामयाब" हे आणिबाणीच्या काळात म्हणायला लागणार्या (आणि ज्याचा उपयोग नंतर "जाने भी दो यारो" मध्ये केला गेला) त्या संदर्भात बोलत होतो.
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 01/14/2014 - 06:25
नवीन
>>> इट वॉज अ शेम हाऊ ही कॅरीड ऑन
इन्डीड!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 08:39
नवीन
हा हा हा =))
- Log in or register to post comments
न
निवांत पोपट
Sun, 01/12/2014 - 08:43
नवीन
ह्या संकेतस्थळावर सर्व काही सापडेल.. :)
- Log in or register to post comments
ए
एम.जी.
Sun, 01/12/2014 - 08:48
नवीन
सचिन तेंडुलकर आणि अतुल बेदाडे हे दोघेही आक्रमक खेळाडू..
पण सचिन लक्षात रहातो तो त्याच्या सातत्यामुळे.
अतुल बेदाडे एखाद दोन सामन्यात चमकतो आणि नंतर विस्मरणात जातो.
कुठलेही यश हे त्याच्या सातत्याच्या कसोटीवरही मोजायला हवे.
दिग्गज संगीतकारांच्या अविशमरणीय गाण्यांची टक्केवारी हे काही काळ चमकलेल्या आणि थोड्या फार चांगल्या रचना दिलेल्या संगीतकारांपेक्षा बरीच जास्त आहे.
बर्मन पितापुत्र, ओपी, शंकर जयकिशन यांची कारकीर्द, त्यांच्या उत्तम गाण्यांची यादी काढून प्रीतम, अन्नू मलिक अशा बेदाड्यांशी ताडून पाहिल्यास अनेक गोष्टी सुस्पष्ट होतील.
संगीतातील इलेक्ट्रॉनिक्सचा प्रभाव हासुद्धा एक मोठा फॅक्टर आहे.
सध्याच्या सिनेसंगीतामधे संगीतकारांचे श्रम किती आणि साऊंड डिझायनरचे [ एडिटरचे ] किती हाहे एक वादग्रस्त मुद्दा आहे..
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sun, 01/12/2014 - 08:48
नवीन
आर ड़ि बर्मन आणि ओपी ची अख्खी कारकीर्द चोरलेल्या इंग्लिश गाण्याच्या पायावर उभी आहे हे कळल्यावर भारतीय म्हणून वस्त्रहरण झाल्याचा फील नाही येणार का ? >>>>
हे वाक्य लिहिणार्याला सांष्टाग दंडवत ...कहर....खर तर खुप राग ( गाण्यातला नव्हे ! ) आला होता पण असो ....
अवांतर : आज तात्या असता तर ?????
गाण्याबजावण्यातल्या तात्याचा फॅन
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 15:42
नवीन
हे वाक्य लिहिणार्याला सांष्टाग दंडवत ...कहर....खर तर खुप राग ( गाण्यातला नव्हे ! ) आला होता पण असो ....
मग?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Mon, 01/13/2014 - 06:45
नवीन
मग >>
हे आमच आजच्या संगीता विषयी मत !!
http://misalpav.com/node/14241
फार आधीच लिहुन झाल्याने आता त्याविषयी लिहीत नाही ..
बाकी तुमच्या खालच्या प्रतिसादाला ...
हेमराज माहीत आहे कोण होता ते ? त्याच मुंडक नाचवित असताना , पाकिस्तान्यांच्या चेहर्यावरचे भाव बघीतले आहेत का ? अश्या भोसडींच्याच्या इथले किंवा तेथील गायकाचा आवाज का ऐकु मी ??? सिएसटी ला जे मारले गेले त्यांच्या नातेवाई़आंना तुम्ही छाती ठोकपणे हे सांगु शकता का ??
असेल तर मग मात्र तुम्हाला हात जोडुन नमस्कार आहे ब्वा आमचा ..
शेवटाचा धन्यवाद !!
- Log in or register to post comments
स
सुहास..
Sun, 01/12/2014 - 08:50
नवीन
एक सांगायचे राहिले ...
अतिफ अस्लम हा पाकिस्तानी आहे आणि " भाई पॉलिटिक्स अपनी जगह , और संगीत कल्चर अपनी जगह " सारखं थर्ड क्लास वाक्य माझ्या पाहण्यात नाही
- Log in or register to post comments
इ
इष्टुर फाकडा
Sun, 01/12/2014 - 15:24
नवीन
हेच आणि हेच !
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 15:45
नवीन
आपली अनेक हिट गाणी पाकिस्तानी गाण्यावरून ढापली आहेत . किती लिंका देऊ ? तुम्हाला ऐकताना गोड वाटली असतील पण कबूल न करून जाता कुठे ?
- Log in or register to post comments
म
मारकुटे
Sun, 01/12/2014 - 17:20
नवीन
>>> भाई पॉलिटिक्स अपनी जगह , और संगीत कल्चर अपनी जगह "सारखं थर्ड क्लास वाक्य माझ्या पाहण्यात नाही
शमत आहे.
अत्यंत कर्मदरिद्री खाल्ल्या ताटात हागणारे विचारवंत असली भलामण करत असतात.
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Mon, 01/13/2014 - 07:52
नवीन
अनेको बोलीवुड गाणी पाकिस्तानी गीता वरून उचलली आहेत(अगदी रेहमान चे चैय्या छैय्या सुधा ) आणि ह्यासाठी स्वतंत्र धागाच हवा.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानव
Tue, 01/14/2014 - 08:36
नवीन
लागे राहो सुहासजी,
आणि संगीतात राजकारण नसते कि काय?
आणि ओपी किंवा बर्मन किंवा सी रामचंद्र (संगीत शारदामधील "मूर्तिमंत भीती उभी..." ह्यावरून "यह जिंदगी उसीकी है ....")
पंडित हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी तुम्ही म्हणता तशी "चोरी "(कारण चोरी हा शब्दच इथे गैर आहे. तुम्ही नकळत काही दिग्गजांचा अपमान आणि अतिफ असलमसारख्यांचा सन्मान करता आहात असे वाटून त्रास होतो.) केल्याने कुणाचे काही नुकसान झाले का? आम्हाला तर आनंदच, समाधानच मिळाले आणि त्यासाठी ह्या "चोरीचे" मी समर्थनच करीन.
आणि टाळके सटकलेच पाहिजे कारण इतके चिरंजीव संगीत बांधण्याची अक्कल जर हल्लीच्या पिढीत नसेल तर टाळके सटकलेच पाहिजे पण मग कृती करा.....तुम्ही म्हणता तसे ओरिजिनल ऐकवा. "फेविकॉल लगाले...." ओरीजीनलच आहे की...थोडे सुश्राव्यपण हवे. "...उशीर झायीला..वाट माझी बघतोय रिक्षावाला....." ओरिजिनलच आहे पण थोडे दर्जेदार असते तर बरे झाले असते.
बाकी तुम्ही मराठी संगीतकार सोडलेत ते "ओरिजिनल" म्हणून की त्यांच्या "ओरीजीण्यालीटीचा" स्त्रोत ज्ञात नाहीत म्हणून!!!!
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Sun, 01/12/2014 - 08:57
नवीन
अन त्या आजोबांना प्रत्युत्तर म्हणून लेख न्याय आहे. भलेही थोडा आक्रमक आहे तरी
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sun, 01/12/2014 - 08:59
नवीन
बरं क्षणभर धरून चालूया की केली चोरी. त्याने गाण्याच्या सु/कुश्राव्यतेत काही फरक पडणार आहे का? मदनमोहनची हळूवार गाणी आवडतात का प्रीतमचा दणदणाट हा आपापल्या आवडीचा प्रश्न आहे.
याला तर सडकून आक्षेप आहे. अकबर-बिरबलाची "हात न लावता रेघ लहान कर" ची गोष्ट आठवते. नव्यांची बाजू घेण्यासाठी जुन्यांनाही तोच दोष लागू होता हे सिद्ध करण्यात कशाला उर्जा घालवायची?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 09:05
नवीन
बरं क्षणभर धरून चालूया की केली चोरी. त्याने गाण्याच्या सु/कुश्राव्यतेत काही फरक पडणार आहे का?
प्रश्न नैतिकतेचा आहे .
मदनमोहनची हळूवार गाणी आवडतात का प्रीतमचा दणदणाट हा आपापल्या आवडीचा प्रश्न आहे.
मान्य
नव्यांची बाजू घेण्यासाठी जुन्यांनाही तोच दोष लागू होता हे सिद्ध करण्यात कशाला उर्जा घालवायची?
मजा येते म्हणून : )
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 01/12/2014 - 09:06
नवीन
मी स्वप्न पडण्याच्या बाबतीत फार भाग्यवान माणूस आहे. मी नेहमी दुसर्या दिवशी सकाळी असा विचार करतो की कालचे स्वप्नातले दॄष्य आपण कोठे पाहिले होते काय? त्यावेळी निष्कर्ष असा असतो की काही वेळा परिचित व काही वेळा पूर्ण कल्पनापूर्ण अशी पार्श्वभूमी असते. कोणत्याही कलाकारीच्या बाबतीत असेच असते. आज मी ज्यावेळी की बोर्डवर काहीतरी वाजवितो त्यावेळी ओ पी नय्यर यांच्या फ्रेझेस माझ्या वाजविण्यातून आपोआप बाहेर येतात. ( अशा विशीष्ट गोष्टी केवळ नय्यरचा मेंदू निर्माण करू शकला असे माझे निरिक्षण आहे. व आग्रहाचे म्हणणेही) याचाच अर्थ असा की माझ्या मेंदूवर काही सांगितिक संस्कार नय्यर यांचा शैलीचे झाले आहेत. मग माझ्या वादनाला तुम्ही कॉपी म्हणणार का ? हा प्रश्न आहे.
आपल्याला संगीतात चोरी करण्याचा मोह झाला होता काय ? हा प्रश्न मी स्वता:च नय्यरना एक हजार कानांच्या साक्षीने विचारला होता.व त्याचे उत्तर " सुन सुन सुन सुन जालिमा" हे गीत चोरलेले आहे अशी त्यानी लगोलग कबुलीही दिली होती. परंतू त्यानंतरचे सगळे माझे स्वतः चे आहे हे ठासून सांगायला ही ते विसरले नव्हते. हे असो. पण त्यानाही ही काही चाली लोकगीतातून सुचल्या असणारच .तरीही मी त्याला कॉपी मानीत नाही. त्यांचे उदा. सांगायचे झाले तर " हमको तुम्हारे इश्कने क्या क्या बना दिया" हे गीत छायानट या रागावर आधारित आहे व ही चाल पारंपारिकपणे मुशायर्यात वापरली जात होतीच. म्हणजे खरे तर त्यांच्या मौसिकीला एक सोडून दोन आधार झाले तरीही ती चोरी नाही.
अशीच चाल एस डी नी प्यासा मधे ही वापरली आहे.
रोशन यानी तर कित्येक बंदिशी " गीत" म्हणून वापरल्या आहेत. तरीही त्यातील स्वरमेळ, वाद्यांची निवड, गायकाचा सुरेख उपयोग या साठी संगीतकाराला दाद ही दिलीच पाहिजे.
बर्मनदानी तर " खमाज" रागावर आधारित अप्रतिम व विविध रचना सादर केल्या आहेत. पण त्याला शास्त्रीय संगीताची
कॉपी असे मी म्हणू शकत नाही.
जाता जात मर्डर मधील 'दिलको हजार बार रोका रोका रोका" ही गीत नय्यरच्या " नीले आसमानी" याची आठवण करून
देते. " नीले आसमानी" हे ही एखाद्या परदेशी धुनीची आठवण करून देत असेल तरीही नय्यर यांचा ऑरकेस्ट्रा गीता दत्त च्या आवाजाचा थ्रो, अलिशा चिनाय चा " दिल को मधला मस्त उपयोग याचे श्रेय अनुक्रमे नय्यर व अनू मलिकला द्यायलाच हवे.
किरवाणी, अहीर भैरव हे राग अरेबिक संगीतात डोकावतात. भूप हा राग जपानी संगीतात डोकावतो. कशाला कॉपी व ओरिजिनल यांचा खल करायचा ?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 09:15
नवीन
अभ्यासपूर्ण प्रतिसाद . . पण खरच नय्यर चा दावा खरा आहे ? खरच त्याने एकच गाण चोरलं आहे ?
ही लिंक बघा . original गाण्याच्या लिंक समोरच दिल्या आहेत . tally करून बघा
http://www.itwofs.com/hindi-opn.html
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 01/12/2014 - 09:26
नवीन
अमोलसाहेब ,
मी नय्यरचा जाम पंखा असलो तरी मला 'लाखो है यहां दिलवाले' बद्दल गेली २५ वर्षे संशय होता. आपण दिलेली लिंक मी
ऐकली. तरीच नैयर आर डी ला एक प्रतिभावान कॉपी कॅट म्हणाले होते. असो. मूळ गीत मस्त आहे. पण त्या संगीत काराने
जर ओ पी ची कॉपी ऐकली तो तो ही म्हणला असता प्रत्याक्षाहून प्रतिमा उत्कट !
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 01/12/2014 - 09:26
नवीन
जुन्या संगीतकारांनी गाणी जशीच्या तशी उचलली की त्यातून प्रेरणा घेतली याबाबत वरील साइटसवर स्पष्ट उल्लेख आहेत. आणि तरीही आम्हाला ती जुनी गाणीच गोड वाटतात. त्या जुन्या संगीतकारांना शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. त्याचा अनेक गाण्यांवर स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. वेगवेगळे ताल वापरले जायचे. आता चाराच्या पटीतच काथ्या कुटला जातो. रुपक, दादरा असे ताल असतात हे ह्यांच्या गावीही नसते. अर्थात कुणालाही जे संगीत आवडते ते त्याने ऐकावे. जुन्यांनी नव्यांना सांगू नये आणि नवीनांनी उगाच जुन्या संगीताबद्दल अनुदगार काढू नयेत.
आताच्या संगीतात भारतीय संगीताचा कणही दिसत नाही. एकतर संपूर्ण वेस्टर्न पद्धतीची रचना नाहीतर पंजाबी धुडगुस. आणि काव्याच्या दर्जाबद्दल तर बोलूच नये. ही झाली आम्हा म्हातार्यांची मतं. त्याहून तुम्हाला जे ऐकायचं ते ऐका ना, उगाच, आम्हाला 'उमाळे' वगैरे दूषणे देऊ नका.
- Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे
Sun, 01/12/2014 - 14:37
नवीन
आपल्या हिरोजचे पाय मातीचे आहेत हे कळल्यावर माणूस कसा डिनायल मोडमध्ये जातो आणि आक्रमक होऊन प्रतिवाद करू लागतो त्याचं वरचे प्रतिसाद म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहेत. 'तुम्ही ज्याची पूजा करता आहात तो देव नाही, एक पाषाण आहे' असं सांगितलं तर लोक मारायला धावतातच.
तुम्ही सांगितलं आहे त्यात नवीन काहीच नाही. 'आयला, ते ४०-७० च्या दशकातले संगीतकार किती थोर्थोर! एवढ्या अद्भुत रचना एवढ्या सातत्याने देणं म्हणजे काय प्रतिभा असेल नै' अशी सर्वसाधारण रसिकाप्रमाणे माझीही कल्पना होती. हळूहळू पाश्चात्य संगीत ऐकण्याचं प्रमाण वाढत गेलं, तसतसे शॉक्स लागत गेले. पूर्वी आजच्यासारखा माहितीविस्फोट झाला नव्हता म्हणून या ढापू लोकांच्या चोर्या खपून जात. आजकाल लोक बर्यापैकी बहुश्रुत होत असल्यामुळे नव्यांच्या चोर्या तर पटकन समजतात, पण काही सणसणीत धक्केपण बसतात. युट्यूबसारख्या साईटवर व्हिडिओखालचं कॉमेंट सेक्शन वाचत जा. बर्याचवेळा ते गाणं कोणत्या गाण्यावरून ढापलं आहे त्याची थेट लिंक कोणीतरी दिलेली असते. माझ्या मते बहुतेक गाजलेल्या फिल्मी गीतांपैकी ९०% (याहून जास्त, बहुदा जवळजवळ सर्व!) गाणी ही आयदर अभारतीय संगीतातून कुठून ना कुठून ढापलेली, किंवा भारतातल्याच कुठल्यातरी प्रांतातील फोक ट्युनवर आधारीत, किंवा भारतीय शास्त्रीय संगीतातल्या एखाद्या जुन्या चीजेवर बेस्ड असतात. (दुसर्या आणि तिसर्या कॅटेगरीवर आक्षेप नाही). बरं या लोकांचं केवळ पाश्चात्य संगीतावर भागत नसे. जगाच्या कानाकोपर्यातून हे लोक बिनदिक्कत चाली उचलत, (आणि आजचेही उचलतात) मी वाचलं आहे त्याप्रमाणे चित्रपटाचा निर्माता तेव्हा गाजत असलेल्या पाश्चात्य गाण्यांच्या रेकॉर्ड्सची चळत आणून संगीत दिग्दर्शकासमोर टाकत असे, आणि 'ठोक यातून चारपाच चाली' अशी ऑर्डर टाकत असे. संगीत दिग्दर्शक साहेब मग तीच चाल जरा इकडून तिकडून फिरवून त्याचं अल्ट्रेशन, सॉरी सॉरी 'भारतीयीकरण' करून देत.
याउलट पाश्चात्य साँग-रायटर्सनी भारतीय गाण्यातलं एखादं टुंयटुंय जरी उचललं, (सँपलिंग केलं) तर आधी परवानगी घेतली जाते, गाण्याचे हक्क ज्याकडे असतील त्याला त्याचा मोबदला मिळतो, आणि क्रेडिट दिलं जातं. अलिकडच्या ग्रॅविटी चित्रपटात एक पात्र नुसतं 'मेरा जूता है जपानी' असं गुणगुणतं, तर एण्ड क्रेडिट्समध्ये त्याचा व्यवस्थित श्रेयोल्लेख केला होता.
अनेक जुन्या संगीत दिग्दर्शकांनी इंग्रजी गाणी ढापली आणि श्रेय स्वतः घेतलं याला माझा आक्षेप आहे . आणि तो काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचे reference आज पण दिले जातात हे दुर्दैव .
प्रिसाइजली!
तसे तर पूर्णपणे भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित गाण्यांना पण चोरी म्हणणार का?
अर्थातच नाही, अभिजात भारतीय संगीत हे केवळ आपल्यासाठीच नाही, तर जगासाठी असलेला ठेवा आहे, पण असं बघा, नदीवर जाऊन पाणी आणणं, आणि शेजारच्याच्या विहीरीवरून त्याला न विचारता पाणी उपसणं, यात काही फरक आहे की नाही?
बाकी, काही 'अवीट चवीची' हिंदी-मराठी चित्रपटातली गाणी आणि त्यांची ओरिजिनल्स यांची काही उदाहरणं देणार होतो, पण ते म्हणजे समुद्रातल्या माशांच्या थव्यातले चारपाच मासे दाखवल्यासारखं होईल. अशा गाण्यांच्या साईट्सच्या साईट्स उपलब्ध आहेत. इच्छुकांनी शोधाव्यात. उदा. http://www.itwofs.com
बाकी, थोडाफार फेरफार केला तर ती काही चोरी नाही ठरत, असे म्हणणार्या वरच्या काही मंडळींनी मिसळपाववर यापूर्वी बरंच ओरिजिनल लेखन केलं आहे. त्यातलाच एखादा लेख, ललित, कविता कोणी उचलून, पात्रांची नावं बदलून, जरा इकडेतिकडे फेरफार करून आपल्या नावाने प्रसिद्ध केलं तर त्याला चोरी म्हणणार की कसं?
- Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा
Sun, 01/12/2014 - 15:47
नवीन
.
- Log in or register to post comments
क
काकाकाकू
Sun, 01/12/2014 - 18:58
नवीन
आर. डी. बर्मन ची ४७ सर्वात जास्त. बाकिच्यांची (जुने बघितले फक्त - ओ. पी., ल. प्या., शं.ज., स.चौ) ३० हून कमी आहेत. असं समजू की ही लिस्ट उदाहरण म्हणून आहेत व प्रत्येकाने १०० चाली उचलल्या. तरीही खूपच कमी आहेत. आणि अर्थातच मूळ चाल व त्या चालीवरून बेतलेलं गाणं हे ९०% वेळा फारच वेगळं आहे. चाल उचलणं इतकं सोपं असतं तर आपण अ.उ. आणि चि.खं. ची खंडीभर गाणी नसतो का ऐकत बसलो? !
'योग्य श्रेयोल्लेख करणं गरजेचं आहे' आणि 'जुनं ते सोनंच' म्हणणं चूक आहे हा तुमचा मुद्दा पटला. पण तो सांगताना तुमच्याकडूनहि टोकाची भूमिका घेतली गेली.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 01/13/2014 - 07:50
नवीन
माझ्या मते फरक आहे...
आता मला सांगा, लव्ह ट्रॅन्गल या विषयावर कितितरी चित्रपट येत असतात.. यातल्या बर्याच चित्रपटांची कथा काही प्रमाणात साऱखीच असते.. त्या सगळ्यांना आपण चोरी म्हणणार का?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sun, 01/12/2014 - 15:37
नवीन
+११११. जबरि. अप्रतिम.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 01/12/2014 - 17:07
नवीन
दुसर्याच्या निर्मितीचं श्रेय स्वतः घेणं अयोग्य आहे हे निर्विवाद.
पण लेखात दिलेल्या दोन्ही लिंक्स अत्यंत लक्षपूर्वक ऐकल्यावर उल्लेखित गाण्यांच्या केवळ पहिल्या ओळींचा (नगण्य) भास होतो. यावारनं लेखकानं जे दिव्य निष्कर्श काढलेत :
ते आश्चर्यकारक आहेत.
आजा सनमचा नुसता पहिला पिक-अप म्युझिक पीस : सां-निसांप, पध़सांनिसां निसांप, पधसांरें/ग़ंरेंसांरेंनिध़पमग़रेसा आणि त्याला जोडून असलेला ही अत्यंत दिलखेचक रचना : मंध़ंमं-सांमंसां / गंपंगं-सांगंसा उल्लेखित सिंफनीच्या किती तरी पुढे आहे.
मोरे साजन ले चल मुझे तारोंके पार, लगता नही है दिल यहां... नंतर लतानं घेतलेली ती जागा... (पध़मप-मध़प) केवळ विलोभनीय आहे.
गाण्याच्या इंटरल्यूडचा तर जवाब नाही. ती दोन्ही इंटरल्यूडस वेगवेगळी आणि तितकीच आकर्षक आहेत. लिंकमधे दिलेली एकसुरी सिंफनी त्यापुढे झक मारते.
कडव्यांबद्दल तर बोलायलाच नको. आणि कडव्यातल्या ओळीतले पिक-अप्स तर लेखकाच्या बधीर श्रवणीयते पलिकडे आहेत.
पुन्हा समेवर येतांना केलेलं काँपोझिशन तर कहर आहे.
एखाद्या गाण्याचा समग्र अभ्यास केला तर अजय-अतुलनं म्हटल्याप्रमाणे `एकेक गाणं एकेक युनिवर्सिटी आहे'.
त्यामुळे लेखाच्या या शेवटाविषयी :
इतकंच म्हणावंसं वाटतं, बाळ आधी नीट ऐकायला शिक.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 01/13/2014 - 06:47
नवीन
ह्या गटातले आहेत हे.गाणे पुर्ण एकण्याआधी हे महाशय हे कुठुन बरे चोरले असणार ह्याचा शोध घेत असतात. दाल मैं कुछ काला है म्हणत सगळे गाणेच चोरले आहे असा निर्णय देतात.
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 01/13/2014 - 20:34
नवीन
पण उद्या कुठलाही सोम्या गोम्या येऊन अविस्मरणीय हिंदी सिनेसंगीताबद्दल काहीही भंकस करायला लागला तर लोकांची दिशाभूल व्हायला नको म्हणून प्रतिसाद दिले.
लेखात दिलेल्या दुसर्या गाण्याबद्दल (दिल तडप तडपके कहे रहा है आभी जा) लिहायचं तर एक पोस्ट होईल.
लताचा तो आलाप (सां / रेंगंरेंसांध़ / धध़पधध़ / धसांधपम) ही प्रेयसीनं प्रियकराला दिलेली इतकी आंतरिक साद आहे की नुसती ऐकत राहावी.
गाण्यात सतत येणारं `धध़म / धध़म' हे स्वरसंयोजन इतकं नजा़कतीनं केलंय की सलीलदांच्या सौंदर्यदृष्टीला सलाम करावासा वाटतो. आणि त्याचं टाईमिंग असं काही अफलातून आहे की ऐकणार्याचं मन गायला लागतं!
गाण्याचं इंटरल्यूड खर्जातले आणि कोमल सूर घेऊन केलंय : सा-रेसामरे-सारेसाध़ध / धंसारे़रे / गरेपग / सारेसाध़ध / सारेसाधम / सारेसापग / सारेसापग / सारेसाध़ध, आणि...
त्याची मध्यसप्तकातल्या `तू नही तो ये बहार क्या बहार है' शी केलेली चकित करणारी जोडणी केवळ मर्मज्ञच जाणू शकतो.
लेखात दिलेल्या सिंफनीचं स्वरसंयोजन इतकं उथळ आणि एकसुरी आहे की गाण्यातलं काहीही न समजणारा सुद्धा सलीलजींच्या काँपोझिशनला दाद देईल. आज चाळीस-पन्नास वर्ष ही गाणी गाजतायंत ती त्यांच्या स्वरसंयोजनामुळे. आणि ती तशीच अविस्मरणीय राहातील कारण प्रत्येक संवेदनाशिल व्यक्तीला हरेक युगात ती मोहवतील.
त्याला नॉस्टालजीया म्हणणं म्हणजे कर्णबधीरतेचं लक्षण आहे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Sun, 01/12/2014 - 17:13
नवीन
लेखाचा विषय चांगला आहे, पण मांडणी पोरकट आहे. जी जुनीच माहिती आहे, ती लेखकास नव्याने मिळाल्याने काहीतरी मोठे शस्त्र हाती लागल्यासारखे झाल्याने, लेख अत्यंत आक्रस्ताळा झाला आहे. आणि त्यात अनेक सरसकट वस्तुस्थितीची फारकत घेतलेली विधाने आहेत (उदा. एस. डी. बर्मन ह्यांचे बरेचसे संगीत 'चोरलेले'आहे वगैरे).
कणेकरांनी कुठल्याश्या जाहीर कार्यक्रमात नक्की काय म्हटले, ते 'मुळातून वाचण्यासारखे आहे' म्हणजे ते तुम्ही स्वतः ऐकलेले नाहीत. त्यांनी नक्की काय म्हटले हे माहिती नाही, तरीही तुम्ही जे quote केले आहेत, त्याचा मतितार्थ बरोबर आहे असे मी मानतो. तेव्हाचे संगीतकार अनेक पाश्चिमात्यच काय, अगदी आफ्रिकन वगैरे गीतांवरून आपली (सर्वच नव्हे, काही थोडीफार) गीते बेतत हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य अशासाठी म्हणतो की, सर्वसाधारणपणे मुखडा तसा बेतलेला असे,पुढील सर्व साज-- गाण्याची इंटरल्यूड्स, त्यांचे अंतरे, त्यांचे ठेके इत्यादी बहुतांश सर्वच-- स्वरचित असे. (एखादे गाणे अगदी शब्दांपासून तसेच्या तसे घेतलेले असे, उदा. 'पप्पा सांगा कुणाचे'-- हे आपण थोडे अपवाद म्हणून सोडून देऊ). तुम्हीच लेखात दिलेल्या दोन गीतांचे अंतरे, त्यांची इंटर्ल्यूड्स, गाण्याच्या स्टाईल्स, अंतर्यांच्या चाली, ठेके इत्यादी सर्वच आक्रस्ताळेपणा न करता,नीट ऐकलेत तर हे तुमच्याच लक्षात आले असते! थोडक्यात त्यांचे 'भारतीयीकरण' असे ज्याला कणेकरांनी म्हटले आहे, असे तुम्ही सांगता, ते बरोबर आहे.
चाळीशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून, हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी लाट आली, ती बहुतांश 'मेलडी'ची होती. पण त्याचबरोबर त्यात अनाहूतपणे अनेक प्रवाहांना सहजपणे समाविष्ट करण्यात आले. शुद्ध हिंदीबरोबरच उर्दूच्या लहेज्यात लिहीणारे लिरीसिस्ट्स, पारंपारीक भारतीय वाद्यांबरोबरच पाश्चिमात्य वाद्यांचा समावेश, इतकेच नव्हे, तर पाश्चिमात्य वाद्यवृंदांच्या संकल्पनांचा वापर, अॅरेंजमेंट्स, कॉंट्राज, -- ज्यांत प्रामुख्याने गोवानीज ख्रिश्चन वादकांचा पुढाकार होता, असे बरेच काही त्या लाटेत आले. इतकेच नव्हे, पारंपरीक भारतीय लोकवाद्यांना नवी परिमाणे ह्यावेळी मिळाली (ढोलकचा नव्याने होत असलेला वापर, त्यातील प्रयोग इत्यादी), तसेच सतार, संतूर, वगैरे वाद्यांनाही ह्या युगात, सदर संगीतांत स्थान मिळाले. तुम्ही ज्या संगीतकारांना लेखात तुच्छतेने संबोधले आहे, त्या सर्वांचाच ह्यात महत्वाचा वाटा होता.आजच्या हिंदीठीत लिहायचे तर 'त्यांचे योगदान' होते!
त्या काळातील (४५ - ९०) संगीताचा एक चाहता, व त्याविषयी नॉस्टील्जिया बाळगणारा ह्या नात्याने इथे काही उपस्थित केलेल्या प्रश्नांना, व टीकेस उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
ITWOFS साईट मी सुमारे १०- १२ वर्षांपूर्वी पाहीली असावी. त्यानंतर अशी माहिती येतच राहिली. त्यामुळे शंकर जयकिशन सारख्या संगीतकारांविषयीचा माझा आदर अजिबात कमी झाला नाही. कारण वर नमूद केलेच आहे-- ती गाणी तशीच्या तशी, सर्वच मूळ बाजासकट घेतलेली अजिबात वाटत नाहीत. त्यांच्या मुखड्यांवरून स्वतःचे संस्कार घडवून ते आपलेसे करणे हे कसब होते. नुसतीच येथून तिथून गाणी 'ढापणारे' हे संगीतकार असते, तर त्यांच्या गाण्यांवर त्यांचा स्वतःचा ठसा उमटता नसता. आजही आपण 'हे गाणे 'एस-जे'चे, हे 'ओ-पी'चे, हे सलील चौधरींचे 'हे सहज ओळखू शकतो. त्यांचेत्यांचे स्वतःचे संस्करण त्या गीतांवर झाले आहे, हे अगदी सहज जाणवते.
'तेव्हाचे संगीतकार 'चोर' होते' तसेच 'आताचे संगीतकार फालतू आहेत' अशा अर्थाची सर्वच विधाने पोरकट आहेत. काळानुसार आवडीनिवडी बदलतात, नवे येते, जुने मागे पडते, आपापल्या आवडीनिवडीनुसार आपणास हवे ते घ्यावे. मी त्या जुन्या गीतांत, त्या संगीतात रमलेला माणूस आहे असे मी म्हणतो, पण त्याचबरोबर मी असेही म्हणतो की आताचे संगीत मला आवडत नाही, कारण त्याच्या माझ्याशी सांधा जुळत नाही- त्याविषयीची माझी टीका इतकीच आहे. आपल्या परीने आजचे प्रथितयश संगीतकारही आपापल्या तर्हेने सर्जनशील असतीलच, तसे ते नसते, तर ते काँपिटीशनमधे इतके पुढे येते ना!
मात्र हिंदी चित्रपट संगीताचा एक अभ्यासक म्हणून मला जे जाणवते तेही इथे नमूद करतो. अगदी सुरूवातीपासून पाहिले तर ह्या वाटचालीचे चार खंड पडतात. पहिला, अगदी भारतीय शास्त्रीय संगीतांवर आधारीत, तबला इत्यादी निवडक प्रमुख वाद्यांनी नटलेल्या गीतांचा कालखंड. दुसरा, १९४५ च्या सुमारास सुरू झालेला, मेलडी प्रमुख बलस्थान असलेला कालखंड (ज्यातील बलस्थानांचे मी वर थोडे सविस्तर वर्णन केलेले आहे). कणेकरांनी ह्या कालखंडावर सुंदर टिपण्णी केली होती ती अशा अर्थाची, की तेव्हा हिरो बावळट होता, हिरोईन बर्यापैकी 'बोल्ड' होती (माझे शब्द, कणेकरांचे नव्हेत), चित्रपट हिरॉईन्सभोवती चालायचे, तेव्हा त्यांच्या मेलडीयुक्त गीतांना चित्रपटाच्या बलस्थानात महत्व होते. तिसरा कालखंड सत्तरीच्या सुरूवातीस आलेल्या 'दिवार' व 'जंजीर' पासून सुरू झालेला. हे अमिताभ युग, ज्यात हिरो 'मॅचो'झाला. चित्रपट त्याच्या ह्या मॅचोगिरीभोवती फिरू लागले. मेलडीयुक्त गीतांचे महत्व कमी झाले. ते तसे कमीकमीच होत गेले. गाणी बहुतांश त्याच पारांपारीक पद्धतीची येत गेली, पण त्यांवर चित्रपटांचा धंदा आता अवलंबून नसल्याने, ती secondary importance ची झाली. हा प्रामुख्याने भप्पी लाहीरीचा जमाना. हळूहळू चौथा कालखंड येऊ घातला होता, हा नव्वदीच्या दशकापासून सुरू झालेला visual महत्वाचा जमाना. आता गाण्याची (केवळ) श्रवणीयता राहिली नाही, कारण visual अंग आता महत्वाचे ठरू लागले. गाणी पडद्यावर कशी सादर केली गेली आहेत, ते आता महत्वाचे ठरू लागले. सध्या सुरू असलेला जमाना हाच होय.
तेव्हा जसजश्या गरजा बदलत गेल्या, तसतशी गाण्यांनी नवनवी वळणे घेतली. माझ्या (जुनाट माणसाच्या) मते ह्यात 'बरेवाईट' असे काही नाही. 'तो' एक जमाना होता, 'हा' आताचा जमाना आहे, इतकेच मी समजतो.
विषय जिव्हाळ्याचा असल्याने प्रतिसाद बराच पसरट झाला असल्याची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Mon, 01/13/2014 - 14:02
नवीन
ते 'नैतिकते'बद्दल लिहायचं राहिलंच की!
त्याचं काय आहे, मी एक खास मध्यमवर्गीय माणूस असल्याने, माझी स्वतःचीच नैतिकता कचकड्याची आहे, अशी मला दाट शंका आहे, तेव्हा त्याविषयी मी पामर काय बोलणार?
अर्थात धागाकर्त्याने ज्या अर्थी हा मुद्द्दा कळकळीने मांडला आहे, आणि त्याविषयी सहमती दर्शवणारे प्रतिसाद व (इथे व 'तिथे' ही) आले आहेत, तेव्हा ह्या सर्वांची स्वतःची नैतिकता अभंग असावी, त्यांनी कधीही आयुष्यात खोटे सॉफ्टवेअर वापरले नसावे, अनधिकृत डाऊनलोड्स केले नसावेत, अनधिकृत मीडिया streaming केल्या नसाव्यात, असे मी मानतो, व शांतपणे ती चर्चा वाचतो. धन्यवाद.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Mon, 01/13/2014 - 14:23
नवीन
अगं बाबो ! हा तर फायनल नॉकिंग पंच मारला दोन्ही टीमला !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/13/2014 - 14:45
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 01/13/2014 - 14:52
नवीन
पण आता मात्र झक मारली आणि मुंबै पाहिली असं झालं असेल!
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 01/13/2014 - 16:25
नवीन
भारतीय चित्रपट नवीन तात्काळ युट्यूबवर येणे आणि जुने युट्यूब रांगायला लागल्यापासूनच असणे, ह्यात काही नवीन नाहीच. तेच नवीन चित्रपटांच्या १-२ डॉलरमधे (कधी कधी बरेच सामान घेतल्यास फुकटच) डिव्हीडी या भारतीय दुकानात मिळणे देखील येथे नवीन नाही. त्यावर एकदा एक जण तावातावाने नैतिकतेच्या समर्थनार्थ बोलत होता आणि हे चुकीचे कसे ते सांगत होता. त्यावर दुसरा म्हणाला, काय बिघडले अशा डिव्हीडीज् घेतल्यातर? नाहीतरी हे सिनेमे देखील स्टोरीलाईनची चोरीच करतात मग आपण तसेच बघितले तर काय बिघडले?
तात्पर्यः भारतीय माणूस हवे तसे लॉजिक वापरू शकतो, काळजी नसावी. ;)
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 01/14/2014 - 07:13
नवीन
धागाकर्त्याच्या नैतिकतेवर घसरण्याचे कारण नाही.. तसे असते तर कलमाडी वगैरे लोकांवर टीका करण्याचा कोणालाच अधिकार राहिला नसता.. कारण सगळ्यांचीच नैतिकता थोड्याफार प्रमाणात कचकड्याचीच ना!
धाग्याच्या विषयात तथ्य आहे.. संगीतकलेत चोरी आणि प्रेरणा यात फरक करणे फारच कठिण काम आहे.. तसच कॉपिराइटविषयी जागरुकता पूर्वी कमी होती.. ती आता वाढत आहे.. जी पाश्चिमात्य जगात जास्त आहे..
बाकी राहिले जुन्या पिढितल्या संगीतकारांना या उदाहरणांवरुन सरसकट चोर ठरवणे.. ज्यांनी अखंड कारकीर्दीत शेकडो लोकप्रिय गाणी दिली .. या वेबसाईट वरील १०-१५ उदाहरणे (ज्यात तथ्य नक्कीच आहे) ही ५-१० टक्क्यांहून कमी असल्याने त्यांच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह असण्याचे काहीच कारण नाही.. धागाकर्त्याचेही तसे म्हणणे दिसत नाही .. आक्षेप एवढाच की जुन्या संगीतकारांच्या तुलनेत आजच्यांना चोरीच्या मुद्द्यावर मोडीत काढु नये!!!
बाकी आपली आपली आवड!!
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 01/14/2014 - 08:03
नवीन
इतकंच म्हणणं आहे!
नव्यातल्या चांगल्याला निदान इथे तरी कुणी वाईट म्हटलेलं नाही. तो लेखकानं स्वतःचा उत्ताप इथे काढलायं.
मात्र तुमच्या प्रतिसादातला हा भाग :
अमान्य आहे, कारण लेखकानं काय विद्वत्ता पाजळलीये पाहा :
आणि त्याला तीव्र आक्षेप आहे!
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Wed, 01/15/2014 - 05:37
नवीन
धागाकर्त्याचाही इतरांच्या उमाळ्याला उत्तर देताना अतिरेक झालाय हे मान्य!!
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 01/13/2014 - 16:18
नवीन
हा प्रतिसाद आत्ता वाचला. माहितीपूर्ण असल्याने अपेक्षापूर्ती झाली!
- Log in or register to post comments
न
नंदन
Tue, 01/14/2014 - 06:34
नवीन
तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. नेमका प्रतिसाद!
- Log in or register to post comments
अ
अमोल मेंढे
Tue, 01/14/2014 - 07:57
नवीन
अहो ही साइटच २००५ ला सुरु झालीय
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »