Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे

व
विद्युत् बालक
Tue, 01/07/2014 - 18:45
🗣 61 प्रतिसाद
एका जेष्ठ संपादकाची मुक्ताफळे २०१४ चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या साहित्यिक व त्यांच्या लेखना ऐवजी एका जेष्ठ संपादकांच्या वादग्रस्त मुलाखती वरूनच जास्त गाजत आहे . ह्या महाशयांनी उधळलेली मुक्ताफळे इथे व इथे पाहायला मिळतील . आणि विशेष म्हणजे ह्याचा महाराष्ट्रातील तथाकथित सामाजिक विचारवंतानी निषेध पण व्यक्त केलेला नाही उलटे ह्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे . मोदींचा उदय व दाभोलकर यांची हत्या यांची सांगड घालणाऱ्या ह्या थोर विचारवंतास आमचा साष्टांग नमस्कार . राजकीय मतभेद कितीही असोत पण साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय आखाड्यात रुपांतरीत होताना बरे नाही दिसत. (धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे )

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 10885 views

🗣 चर्चा (61)
प
पैसा Tue, 01/07/2014 - 18:49 नवीन
धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला. कुमार केतकरांबद्दल आहे ना? त्यांच्याकडून फार वेगळे अपेक्षित नसावे पण तरी...
व
विद्युत् बालक Tue, 01/07/2014 - 18:51 नवीन
=))
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/08/2014 - 02:31 नवीन
>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला. हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं. बाकी, निवांत वाचतो काथ्याकूट. -दिलीप बिरुटे (मिपाचा जेष्ठ संपादक) ;)
य
यशोधरा Wed, 01/08/2014 - 03:00 नवीन
खरं तर मला प्रश्न पडला की सद्ध्या संमंमध्ये ज्येष्ठ असं कोणी नाही, तरी असं काय लिहिलंय! :D मग लक्षात आले की क्षीण प्रयत्न वगैरे असावेत! :P
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/08/2014 - 08:01 नवीन
>>> धाग्याचे नाव बघून मी घाबरत धागा उघडला. हो ना. मिपाच्या कोणा जेष्ठ संपादकाबद्दल धागा आहे कोणास ठाऊक असं वाटलं. हो ना ! "कोण तो मिपाचा जेष्ठ संपादक?" आणि "आता त्रिशतकी रणधुमाळी वाचायला वेळ राखून ठेवायला पाहिजे" असे म्हणत धागा उघडला, तर हे ! (निवडणूकांची रणधुमाळी अंगवळणी पडल्याने मिपावरची रणधुमाळी जास्त मनोरंजक वाटणारा) इए :)
द
दर्यावर्दी Tue, 01/07/2014 - 18:51 नवीन
माथेफीरु नथुराम गोडशेच्या नावाने ठाणे साहित्य संमेलनात पत्रके काढली गेली होती ,तेव्हा आपण कुठे होतात विबा?
म
मुक्त विहारि Tue, 01/07/2014 - 19:17 नवीन
असो. ?
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 06:33 नवीन
नथुराम गोडसे अमर रहे :P
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 06:38 नवीन
महात्मा गांधी यांचे विचार चिरायू होवो.
व
विद्युत् बालक Tue, 01/07/2014 - 19:01 नवीन
तुम्ही गांधी मारला आम्ही तुमचा मोदी मारू असाच सूर दिसतोय तुमचा जहाज भरकटू देऊ नका म्हणजे झाले !
प
प्रसाद गोडबोले Tue, 01/07/2014 - 19:04 नवीन
जाऊनद्या हो ... कुमार केतकर / दिग्विजय सिंग / उमा भारती / जस्टीस काटजु वगैरे लोक जास्त बोलले तरी त्या कडे लक्ष द्यायचे नसते ...
म
मुक्त विहारि Tue, 01/07/2014 - 19:17 नवीन
केतकरांचे बोलणे कशाला मनावर घेता? चला मस्त एक-एक कटिंग मारू.
व
विनोद१८ Tue, 01/07/2014 - 19:30 नवीन
मला व्यक्तिशा असे वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, अशी सुपारी घेउन केलेली वि़क्रुत मुक्ताफळे परीणामशुन्य असतात, मिपासारख्या दर्जेदार सन्स्थळावर चर्चा करण्याच्या योगतेची तर ती कधीच नसतात, कुणीकडशी लोकान्चे लक्ष आपल्याकडे वेधुन घेणे एवढाच त्याचा हेतु दिसतो ( म्हणजेच चमकोगिरी करणे ) कारण आता दुसरे करण्यासारखे काही काम नसल्यामुळे असे होत असावे, त्याला बोंबलुदे आणि *dash1**dash1**dash1*. विनोद१८
ह
हुप्प्या Tue, 01/07/2014 - 19:39 नवीन
हा विषय उपस्थित केल्याबद्दल. केतकरांची मध्यमवर्गीय मराठी लोकांविषयीची जळजळ जगजाहीर आहे. ह्या संदर्भात तोडलेले तारे १. परदेशी जायचे, सुखसोयी आणि लठ्ठ पगार भोगायचे आणि गळ्यात पेटी बांधून सागरा प्राण तळमळला म्हणायचे. ह्यातल्या कुठल्या गोष्टी चुकीच्या वाटतात केतकरांना? काबुलीवालाचा पठाण ऐ मेरे प्यारे वतन असे गातो तेही ह्याच भावनेतून ना? त्याची का नाही खिल्ली उडवत? जातीपातीने बुजबुजलेल्या भारतात संधी कमी झाल्या आणि म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीय (त्यातही केतकरांचा ज्या वर्गावर विशेष लोभ आहे त्या वर्गातील भारतीय) अमेरिका व अन्य परदेशी गेले आणि स्थायिक झाले तर काय बिघडले? बरी घाण गेली म्हणून केतकरांनी टाळ्या पिटाव्यात की. २. मोदींच्या मागे धावणारे म्हणजे एखाद्या अमली पदार्थाचे व्यसन करणारे गर्दुल्ले, गांजेकस लोकांसारखे डोकेफिरु लोक आहेत. त्यांना मोदीच्या नावाची नशा चढली आहे. केतकरांची खंत बहुधा ही आहे की ते गांधी घराण्याचे नाव घेत घेत टाईट होतात आणि त्यांच्यासारखे व्यसनबाज त्यांना औषधालाही सापडत नाहीत. (त्यांनी मिपावर शोधले नसावे बहुधा!) ३. गांधी हत्या एका पुणेरी मराठी ब्राह्मणाने केली. दाभोळकरांची हत्या पुण्यात झाली. म्हणून दोन्हींच्या मागे एकच शक्ती आहेत. दाभोळकरांची हत्या मोदींच्या उदयानंतर झाली म्हणून मोदीच त्याला जबाबदार आहेत. बादरायण संबंधाचे याहून उत्कृष्ट उदाहरण पाहिले नाही. एका अत्यंत पराकोटीच्या द्वेषापोटी ह्या नादान, बिनडोक विचारांचा जन्म होतो. विरोधी विचार सहन न होणारे, विरोधकांचा उत्कर्ष पाहून डोकेफिरु आकांडतांडव करणारे हे तथाकथित विचारवंत हेच खरे फासिस्ट आहेत. ४. महाराणी सोनियाजींचे अफाट कर्तृत्व. इटलीची सून थेट देशाची प्रमुख झाली. शरद पवार वा अन्य नेत्याने इटलीत जाऊन साधा महापौर वा सिनेटर बनवून दाखवायची हिंमत आहे का त्यांच्यात? आता केतकरांना उलटा प्रश्न, जर ही बाई जर अन्य कुठल्या घराण्यात सून म्हणून आली असती तर नगरसेविका तरी बनली असती का? ही निव्वळ गांधी घराण्याची आणि लाळघोटी काँग्रेसी लोकांची कर्तबगारी आहे. सोनियादेवींचा हिस्सा नावालाच. असो. आपण आणि आपले विचार आता नि:ष्प्रभ होत आहेत. कुणी वाचक, चाहते फारसे उरले नाहीत हे ओळखून, काही तरी सनसनाटी, खळबळजनक बोलावे आणि काही दिवस प्रसिद्धी मिळवावी अशी ह्या सोनियाभाटाची अटकळ असावी. घटम भिन्द्यात, पटम छिन्द्यात कुर्यात रासभध्वनीम वगैरे.
च
चिरोटा Wed, 01/08/2014 - 08:36 नवीन
त्यांचे ९७-२००१ सालातले मटातले अग्रलेख आठवलेत तर गंमत वाटेल्.अजूनही लक्षात राहिलेली काही वाक्ये- १)'चंगळवादी' मराठी मध्यमवर्गाला प्युजो(PAL-प्युजो तेव्हा जोरात होती) घ्यायला हव्यात पण गाडी बिघडली तर ते स्वतः दुरुस्त करण्याऐवजी मेकॅनिकला देतात.मात्र अमेरिकन्/युरोपियन तरूण तसा नाही.ते स्वतःची गाडी स्वतःच दुरुस्त करतात. २)मुंबईची वाट्/र्‍हास मराठी माणसामुळेच झाला. ३)राजीव गांधींच्या हत्येमागे आंतर्राष्ट्रीय कट होता.
ख
खटपट्या Tue, 01/07/2014 - 19:42 नवीन
वड्याचे तेल वांग्यावर
क
कंजूस Wed, 01/08/2014 - 04:10 नवीन
हे लोक कोणतयातरी पक्षात का जात नाहित ? मग ठोका जाहिर सभा आणि ऐकवा आपली मते .
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 06:07 नवीन
छान ,केतकर परखड लिहितात त्यामुळे ते भ्रमवृदांस सहन होत नसावेत.
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/08/2014 - 06:08 नवीन
बरं झालं मी संपादक नाहीये! ;)
आ
आबा Wed, 01/08/2014 - 06:12 नवीन
केतकर वाइड बॉल टाकतात अधून मधून पण त्यांची सगळीच मते टाकाऊ वाटत नाहीत
स
सौंदाळा Wed, 01/08/2014 - 06:14 नवीन
हा माणुस साहित्य संमेलनात व्यासपीठावर आलाच कसा? पत्रकार साहित्यिक कधीपासुन झाले? यानेच काही वर्षांपुर्वी सचिन तेंडुलकर्विरुद्धही असेच गरळ ओकले होते.
म
मदनबाण Wed, 01/08/2014 - 06:18 नवीन
इतके दिवस आणि इतक्या वेळा मिपावर सुमार केतकर का शब्द वाचला होता आणि हा शब्द प्रयोग अजिबात चुकीचा नाही याची संपूर्ण खात्री आता पटली आहे. मोदी विरोधाची कावीळ यांना झालेली दिसली... आणि त्यावर त्यांना कुठलेही औषध लागु पडणार नाही. यावर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया योग्यच वाटली...
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 06:25 नवीन
पुतळ्यांच्या संदर्भातः ज्या माणसाला सरदार पटेल आणि मायावती यांच्यात फरक समजत नाही त्या माणसाबद्दल बोलण्यात फार वेळ घालवणे म्हणजे आपल्या बुद्ध्यांकाचा अपमान आहे :D
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 06:59 नवीन
Gandhi: Naked Ambition हे पुस्तक वाचा. फार उद्बोधक आहे. http://www.flipkart.com/gandhi-naked-ambition/p/itmdyyq5ctvcakwy?q=Gandhi%3A+Naked+Ambition&as=on&as-show=on&otracker=start&as-pos=p_1&pid=9780857381613
द
दर्यावर्दी Wed, 01/08/2014 - 08:47 नवीन
अहो तो अर्धनग्न होता ,देशातले लोक अर्धनग्न आहेत म्हणून तो सहसंवेदनेपोटी तसे करायचा ,एक वेळच जेवायचा...
स
सचीन Wed, 01/08/2014 - 06:26 नवीन
केतकर सरां सारखा विचारवंत जेव्हा असले काही बोलतो तेव्हा त्यात निश्चितच काहीतरी तथ्य असणार. अभय बंग ह्यांची आयबीएन लोकमत वर नुकतीच मुलाखत झालेली आहे त्यातली त्यांचीही मते योग्य वाटली.
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 06:27 नवीन
केतकर आणि विचारवंत :D
स
सचीन Wed, 01/08/2014 - 06:37 नवीन
का आपल्या विरुद्ध विचारांचा व्यक्ती विचारवंत असू शकत नाही?
न
नाखु Wed, 01/08/2014 - 06:33 नवीन
कुजकट थयथयाट माथेफिरू भाषण रतीब चाटुगिरी "ऊग्रलेखांचा" सडलेला (की) सोडलेला दृष्टीकोण प्रतिसाद चिवडणारे (बाष्कळ)धागे नको तिथे नाक खूपसून चमचागिरी /चमकोगिरीचा कळस
स
सचीन Wed, 01/08/2014 - 06:58 नवीन
नाद खुला विचारांचा प्रतिवाद विचाराने केला जावू शकतो. तुम्ही शिव्या देण्या पेक्षा केतकरांचे मत कसे चुकीचे आहे हे सांगितले तर ते योग्य ठरेल. तुम्ही नाक्यावर उभे राहून प्रतिवाद करत नाही आहात मिपा सारख्या संस्थळावर प्रतिसाद देत आहात.
ट
टवाळ कार्टा Wed, 01/08/2014 - 09:50 नवीन
हेच कु.के. मोदींबद्दल पण करु शकतात की
ऋ
ऋषिकेश Wed, 01/08/2014 - 07:03 नवीन
केतकरी चरफडाट(च) तो.. कानामागून येऊन त्या भारतकुमारांना(ही) खासदारकी मिळते आणि आपल्याला नाही!! हा शेवटचा निकराचा प्रयत्न समवजावा ;)
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 07:05 नवीन
सचीन, तुम्ही सुद्धा नळावरचे भांडण करत नसून मिपावर आहात हे लक्षात ठेवा. केतकर कसे चुकीचे हे तुम्हाला आम्ही (मराठीत) सांगायला हवे असल्यास वरचे सगळे प्रतिसाद नीट वाचा. विशेषतः हुप्या यांचा हुप्प्या - Wed, 08/01/2014 - 00:09 हा प्रतिसाद वाचा.
म
मंदार दिलीप जोशी Wed, 01/08/2014 - 07:14 नवीन
नाद खुळा :D अगदी, अगदी
ल
लोटीया_पठाण Wed, 01/08/2014 - 07:14 नवीन
केतकरांचा पुतळा मुद्दा पटला. मला तरी सद्यपरिस्थितीत देशात असे मोठमोठाले पुतळा प्रकल्प उभारणे योग्य वाटत नाही. पण, पंडित नेहरू अन त्यावेळची काँग्रेस अन आताची काँग्रेस अन पिलावळ यात दर्जात्मक काही फरक असेल असा केतकरांना वाटत नाही असा दिसतंय. अन मोदि, विद्वेष , फाळणी इत्यादी बद्दल कारणमीमांसा करण्याची गरज केतकरांना वाटत नाही, वाट्टेल ते अंदाज बांधून मोकळे. काँग्रेस इतकी वर्षे सत्तेत राहूनहि देशात secularism काही बोकाळला नाही तसाच मोडी आले म्हणून हिंदुत्ववादहि वाढणार नाही.
च
चिरोटा Wed, 01/08/2014 - 07:22 नवीन
लोकसभा निवडणूका पार पडेपर्यंत असल्या 'कुमार विचारांचा' रतीब टी.व्ही/पेपरांतून पडेल.उद्या गुजरातमध्ये बस/ट्रेनला अपघात झाला तरी कु.के. मोदींनाच जबाबदार धरतील. कु.के.चे लेख्/भाषणे विनोदी नजरेतून वाचावीत ही विनंती.
अ
अर्धवटराव Wed, 01/08/2014 - 07:24 नवीन
एक गरीब परिस्थितीतुन वर आलेला कर्तुत्ववान ओबीस माणुस प्रधानमंत्री पदापर्यंत झेप घ्यायला बघतो आहे तर त्याला साथ द्यायचे सोडु इतर ओबीसी विद्वान त्याचे पाय ओढायला बघतात... कोणासाठी ? तर आपण उच्चवर्णीय असल्याचा अहंकार झालेल्या पिढीजात श्रीमंतेचा गर्व असणार्‍या एका युवराजासाठी. यांनी पवार साहेबांना त्रास दिला...आता मोदिंच्या मागे लागले आहेत
भ
भुमन्यु Wed, 01/08/2014 - 07:51 नवीन
आता यात जात आणि वर्ण कुठुन आले? उलट त्यांनी विनाकरण गांधी हत्या आणि दाभोळ्कर हत्या एकत्र करुन उच्च वर्णियांना विनाकारण टारगेट केलंय
अ
अर्धवटराव Wed, 01/08/2014 - 08:35 नवीन
ते कधि नव्हतं? कुमार केतकर आणि त्यांचा कैवार घेणारे मिपाकर सगळे सारखेच दुटप्पी आहेत. हे सगळं ओबीसींच्या हक्कावर डल्ला मारण्याचं षडयंत्र आहे. अन्यथा संजय सोनवणींना कधिच कसं बोलवत नाहि व्यासपिठावर? हे कुमार केतकर ताबडतोब पोचतात. उच्चवर्णीमांना टार्गेट केलं नाहि केतकरांनी. तर "गांधी" नाव वापरुन इंडायरेक्टली त्यांनी इंदीरा, राजीव वगैरेंचं सो कॉल्ड हौतात्म्य ग्लोरीफाय केलय, आणि राहुलला पण तसाच धोका आहे अशी सहानुभुती मिळवायचा प्रयत्न करताहेत ते. आणि त्यांचे मिपासमर्थक त्यांना साथ देतात. ओबीसींना कुणी वालीच उरला नाहि हेच खरं.
य
यशोधरा Wed, 01/08/2014 - 11:30 नवीन
कर्तुत्ववान ओबीस माणुस >> ओबीस? ;)
न
नाखु Wed, 01/08/2014 - 07:36 नवीन
कु.के. ना आघाडीचे स्विकृत सदस्य नगरसेवक करेपर्यंत खर्‍या कु.के. यांनी लढा चालू ठेवावा. मि.पा.च्या कु.के.चे लेख्/प्रतिसाद विनोदी नजरेतून वाचावेत ही जाहीर विनंती.
इ
इस्पिक राजा Wed, 01/08/2014 - 07:40 नवीन
१. एका पुणेकराने गांधीजींची केलेली हत्या आणि पुण्यात झालेली एक हत्या यांचा बादरायण संबंध जोडुन समस्त पुण्याच्याच र्‍हास झाला आहे असा टाहो फोडलेला बघुन सदगदित झालो. पुणे मुरादाबाद किंवा मुझफ्फरनगर किंवा युपी बिहार मधल्या ९९% शहरांपेक्षा बकाल झाले आहे याबद्दल खात्री पटली. २. सु. श्री मायावतींजींनी केलेल्या उत्तुंग कार्याची महती येणर्‍या पिढ्यांना कळावी या थोर उद्देशाने त्यांनी स्वतःचे पुतळे उभारले. मात्र भाजपाचे नालायक नेते त्यावर जनतेचा पैसा वाया गेला म्हणुन अश्रु ढाळत आहेत हे बघुन त्यांची कीव आली. हेच पुर्वीच्या हिंदु राजांनी शिलालेख बन्वुन ठवले आहेत याचे या हरामखोरांना काय अप्रुप. मायावतीजींनी त्याच उच्च उद्देशाने स्वतःचे पुतळे उभारले तर मात्र यांचे रक्त आटते. फॅसिस्ट, जातीयवादी आहेत झाले. ३. पटेल हा माणुस धार्मांध होता. त्याने ३ गाड्या भरुन मुसलमान मारुन पाकिस्तानात पाठवले आहे हे तर सर्वज्ञात आहे. अश्या पापी माणसाचे पुतळे उभारुन मोदींनी स्वत:च्या धर्मांधतेचे जाहिर प्रदर्शनही केले आहे. मायावतीजींसारख्या आदर्श राजकारण्याचे पुतळे उभारायाला विरोध करणार्‍या जातीय धर्मांध भाजपाने पटेलांचा पुतळा उभारायचे ठरवुन स्वतःचे पितळ उघडे पाडले आहे. ४. कुमार केतकर सर एका महान कार्याने प्रेरित झाले आहेत. त्यांनी ज्या अलवारपणे दाभोळकर हत्येचे गूढ उलगडले आहे ते बघता गोध्रा हत्याकांडातला मोदींचा सहभागही ते लवकरच जनतेसमोर प्रकट करतील अशी आशा आहे. मोदींचा गांधी हत्याकांड आणि त्यानंतरचे जळीत यामधला सहभागही त्यांनी लवकर जनतेसमोर आणावा अशी विनंती. तसेच नेताजींच्या गूढ मृत्युमागचा त्यांचा सहभाग आणि लाला लजपतराय खून प्रकरणात त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांनी केलेली मदत यामागचे सत्यही केतकर लवकरच जनतेसमोर आणतील असा मला विश्वास आहे. त्याशिवाय १८५७ च्या उठावाच्या वेळेस झाशीच्या राणीला जो वर्मी घाव लागला होता तो प्रत्यक्ष मोदींनी मारला होता आणि तात्या टोपे तर त्यांच्याच गद्दारीमुळे पकडले गेले (आणि भाउसाहेबांना स्वामी बनवण्याचा छुपा डावही त्यांचाच होता) हे पण आता जनतेला लवकरच कळेल. ५. मोदींच्या फॅसिस्ट विचारांनी प्रभावित होउन हिटलर आणि मुसोलिनी यांच्यामधला राक्षस जागा झाला आणि दुसर्‍या महायुद्धाची बीजे पेरली गेले हे जेव्हा जगाला कळेल तोच खरा सुदिन
य
येडगावकर Wed, 01/08/2014 - 08:34 नवीन
ते तेवढं 'सर कुमार केतकर' करा बुआ... लै ब्येष्ट वाटल....
ब
बॅटमॅन Wed, 01/08/2014 - 07:57 नवीन
सोडा हो, भगवान जब लेता है छप्पर फाड के लेता है हे अजरामर सत्य मिपाकर वाचकांस परिचित असेलच. तस्मात जास्ती टेण्षण णै लेणेका.
ए
एम.जी. Wed, 01/08/2014 - 08:10 नवीन
केतकरांच्या ओशट चेहर्‍यावरून कॉंग्रेसने त्यांना तेलातुपाची आंघोळ घातली आहे हे नेहेमीच जाणवते. पेड न्यूज असतात तसेच पेड पत्रकार असतात.. नाह्यल्या तुपाला जागताहेत ते.. त्यांचा दोष नाही, मजबुरी आहे.
प
प्रकाश घाटपांडे Wed, 01/08/2014 - 08:35 नवीन
माझ्या मते कुमार केतकर काही अयोग्य बोलले नाहीत. भाषणातील ओघात त्याचा अर्थ पहा. त्यांचा रोख फॅसिस्ट वृत्तीवर आहे.
ब
बॅटमॅन Wed, 01/08/2014 - 08:39 नवीन
काका बाकीचं ठीके ओ पण आम्रिकेला जाणार्‍यांवर यांचा इनाकारण दात का??? हे कोण टिकोजीराव लागून गेले?
स
सुनील Wed, 01/08/2014 - 08:51 नवीन
माझ्या मते कुमार केतकर काही अयोग्य बोलले नाहीत. भाषणातील ओघात त्याचा अर्थ पहा. त्यांचा रोख फॅसिस्ट वृत्तीवर आहे.
मग इथे जे चालले आहे त्याला विच-हंटींग म्हणावे काय? ;)
R
Rahul Bhuskute Wed, 01/08/2014 - 08:49 नवीन
(धाग्याची भाषा हि दोन बाटल्या थंडगार पाणी पिउन गार ठेवलेली आहे ) नक्की थण्डगार पाणीच की दुसरे काही? इकडची मारामारी बघून आता मलाही मद्यमन्दिरात प्रवेश करावासा वाटू लागला आहे ! ;)
व
विटेकर Wed, 01/08/2014 - 10:15 नवीन
United States of India तुमच्या सहीला माझा आक्षेप आहे .. भारत हा United States of India नाही ! ते एक संपूर्ण एकसंध राष्ट्र आहे !! आणि अनादी अनंत कालापासून जेव्हा " राज्य" ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती, भारत हे एक "राष्ट्र" म्हणूनच जगाला परिचित आहे. संघराज्य असायला हे काही अमेरिकेसारखे अनेक राज्याचे, अनेक देशातून स्थलांतरीत झालेल्या लोकांचे आणि विविध संस्कृती आणि उपासना पंथ असणार्या लोकांचे 'कडबोळे' नाही की जे मुद्दामहून "युनायटेड" करावे. ते मूलत: समान श्रद्धामूल्ये असणार्या आणि एकच जीवनपध्द्ती असणार्या एकसंघ समाजाचे सनातन भौगोलिक स्थान आहे. काही संकल्पना मूळातूनच तपासण्याची आवश्यकता आहे. आमची अवस्था बदकात सापडलेल्या राजहंसासारखी आहे , आमची ओरिजनॅलिटी आम्हाला माहीतच नाही !आणि मग आमचे तारु ही उधार पाश्चिमात्य संकल्पनावर भरकटते !आणि बदकांच्या गर्दीत राजहंस "कुरुप-वेडे" ठरतात ! मला या संधीसाधु पण त्यामानाने तात्कालिक प्रिणाम करणार्या राज कारणापेक्षा स्वत्व हरवलेल्या भारतीय समाजाची चिंता वाट्ते .. हे असली आतविसमृती सार्वकालीक विनाशाकडे नेणारी आहे. राजकारणाने केलेला विनाश कालौघात भरुन निघेल , निघतो ही ! मोदी आत्ता सत्तेवर आले नाहीत म्हणून फारसे बिघड्णार नाही.. पुन्हा एखादा मोदी सत्तेवर आज नाही तर उद्या जन्माला येईलच ! राज कारणाने फारसे बिघडत नाही .. पण समाजकारणाचा कणा मोडला तर येणारी १०० वर्षे केवळ विनाशाकडे नेतील.. ही शोकांतिका समजून घ्यायला हवी. राजकारणाचे काय हो , पापी औरंग्या , शक , हूण आणि धूर्त इंग्रज ही शासन करुन गेले पण समाजाचा कणा इतक्या आक्रमणापुढे देखील अभेद्य राहीला. पण सध्या मात्र जे सांस्कृतिक आक्रमण होते आहे त्यापुढे आपण अक्षरशः गुडघे टेकले आहेत !!! असो लेखनाच्या भरात खूपच लिहिले गेले. धाग्याचा हा विषय नव्हे तेव्हा भरकट्ल्याबद्दल क्षमस्व ! काही गोष्टी जागीच दुरुस्त केलेल्या बर्या म्हणून हा प्रपंच ! जमल्यास सुयोग्य बदल करावा ही विनंती !
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा