Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मास्तर, जरा नैतिकतेने र्‍हावा....!!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/05/2014 - 06:47
🗣 60 प्रतिसाद
रामराम मंडळी. मंडळी काल रात्री ठरवलं होतं की रविवारच्या सकाळ पर्यंत विनाअडथळा मस्त ताणून द्यायची.. पण हाय रे दुर्दैव. पहाटे चारलाच डोळे उघडले. अर्थात तसं व्हायला दोन कारणं होती पैकी एक खासगी होतं आणि दुसरं खासगी आठवणीला जोडून पतंगाच्या शेपटीसारखं दुसरं एक सरकारी कारण चिकटलं होतं. आता मनात आलेल्या विचारांचं शेअरींग केलं की मनावरचं ओझं कमी होतं, काही एक उत्तम विचार आपल्या देता घेता येतो, असे म्हणतात म्हणून मास्तर, जरा नैतिकतेने राव्हाची ही एक गोष्ट. मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलं आहे. शिक्षक आणि प्राध्यापकांनी आपल्या चांगल्या नैतिक वर्तणुकीचे 'हमीपत्र' देण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१३ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात विधानपरिषदेत देण्यात आलेली जी आश्वासने होती त्यात शिक्षण खात्याला एक विनंती करण्यात आली होती त्यावरुन शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढले आहे. (दि.२०-१२-२०१३) शिक्षण विभागाचं पत्र काय म्हणतं पाहा ''विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकांना आदराचे स्थान असते. शिक्षकांकडून विद्यार्थीनीवर होणा-या अत्याचारामधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. शिक्षकांना गुरु म्हटले जाते. शिक्षकाकडून अशा गोष्टी घडू नयेत अशी समाजाची अपेक्षा असते. विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्तनुकीबाबत नियम घालून दिले आहेत. (परिनियम पाहा वगैरे) शिक्षकांनी विहित केलेल्या आचारसंहितेचा भंग केल्यास मुलींच्या, महिलांच्या व महिला शिक्षकांच्या बाबतीत नियमबाह्य वर्तन केल्यास त्या शिक्षकाविरुद्ध प्राचार्यांनी , विद्यापीठांनी, संस्थाचालकांनी त्वरित कार्यवाही करावी.मूळात शिक्षकांनी नैतिक मुल्यांच्या बाबतीत संवेदनशील राहून अनुपालन करावे, अशी प्राचार्यांमार्फ़त सर्व अध्यापकांना जाणीव करुन द्यावी व त्यांची स्वाक्षरी घ्यावी” मंडळी, अशी काही स्वाक्षरी (हमीपत्र) करुन देण्यास कोणाचीही ना नसावी, नाहीच. विद्यापीठ कायद्यात ४३१ प्रमाणे नैतिक अध:पतन झालेल्या व गैरवर्तणूक करणा-या शिक्षकाला निलंबित करण्याची व सेवासमाप्तीची तरतूद आहे. मंडळी, समाजव्यवस्थेत अनेक चूकीचं घडतं तसं इथेही काही चूकीचे असेल तर ते थांबेल, यासाठीच असा आदेश आहे शिक्षण हे ज्ञानदानाचं पवित्र क्षेत्र आहे. त्याचं पावित्र्य टीकलं पाहिजे याच्याशी सर्वच सहमत होतील. मंडळी वरील पत्रावरुन काही प्रश्न पडले आहेत. १] गैरवर्तणूक करणा-या शिक्षकांवर कार्यवाही व्हावीच. परंतु ''शिक्षकांकडून विद्यार्थीनीवर होणा-या अत्याचारामधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे'' हा निष्कर्ष शासनाने कोणत्या विदाद्वारे काढला असावा ? २] प्राध्यापक, शिक्षक यांचा विद्यार्थी-विद्यार्थीनीशी मुक्त संवाद असतो त्या संवादाला या मुळे बाधा येईल का ? ३] महाविद्यालयात येणारे विद्यार्थी सज्ञान असतात त्यांना जे वाटतं ते थेट आता निर्भिडपण बोलतात, तेव्हा अजूनही अशा घटना घडतातच का ? ४] विद्यार्थीनीमधे आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या ऐवजी अशा पत्रकांमुळे विद्यार्थीनीची आणि शिक्षकांची एकमेकांकडे पाहतांना दृष्टी निकोप राहील का ? ५] शिक्षक-प्राध्यापक यांच्यावर संस्कार असले पाहिजेत, नैतिकतेने ते वागले पाहिजेत तेव्हा अशी ही नैतिकता अशा शासकीय फतव्यांनी येत असते का ? ६] सर्वच शिक्षक थोर नसतील पण, समाजासमोर शिक्षकांबद्दल गैरसमज तर या निमित्ताने पसरवल्या जात नाहीत ना ? अजून काही राहीलं असेल तर...मंडळी, होऊ द्या सविस्तर चर्चा .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19117 views

🗣 चर्चा (60)
प
पहाटवारा Fri, 01/10/2014 - 20:12 नवीन
सर्व विद्यार्थी रॅगिंग करत नाहीत. पण 'अँटी रॅगिंग अ‍ॅफिडॅविट' सगळ्यांना द्यावंच लागतं. तसाच हा प्रकार.
जसे 'मॉडेल कोड ओफ कंड्क्ट' सर्वांना सहिनिशी द्यवा लागतो तद्वत वाटते आहे. अर्थात त्यातील भाषेबद्दल अन बारकाव्यांबाबत मतांतरे असू शकतात. अवांतरः यावरुन आमच्या शाळेतील काहि शिक्षकांच्या सरधोपट सर्व वर्गाला पट्टीच्या छ्ड्या देण्याच्या शिक्षा आठवल्या जेव्हा खरा अन एकच खोड्साळ सापडत नसे. त्यावेळी आपण काहिहि केले नसताना ऊगाच शिक्षा मिळाल्याबद्दल वाटणारी भावना बहुदा तुमच्या ह्या भावनेशी समांतर वाटते आहे. -पहाटवारा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/11/2014 - 04:41 नवीन
विद्यार्थी चूकने म्हणजे प्रात्यक्षिक परिक्षा असतील वर्गात उपस्थित राह्यचे नाही. ऐनवेळी धावाधाव करायची. सरांनी जरा खडसावले की मग विद्यार्थीनींना तो अपमान वाटतो, मग सर खडूस आहेत. चिडचिड करणारे आहेत. अन्याय करणारे आहेत, वगैरे ठरवून मोकळे व्हायचे. काही अनैतिक (मी इथे विद्यार्थ्यांना परिक्षा आणि इतर कामकाजाबाबत बोलतोय) जर घडत असेल तर शिक्षकाच्या पाठीमागे व्यवस्थापन उभे राहाणार नाही, आपल्या पातळीवर त्यांच्यावर कार्यवाही होते. विद्यार्थीनी शिक्षकाच्या त्रासामुळे शाळा-महाविद्यालय सोडून गेलीय असे क्वचित एखादे दुसरं प्रकरणे असतील असे मला वाटते. आणि एखादी कोणतीही कृती ज्यामुळे आपली समाजात बदनामी होईल अशी भीती शिक्षक,प्राध्यापकांना असते तेव्हा तो काळजीपूर्वक वागत असतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे, आपल्या प्रतिसादात थोडंसं सरसकटीकरण आणि परिपत्रकातील वाक्याप्रमाणे सर्वच असं काही अनैतिक करत आहेत, असे व्यक्त होत आहे. ते न पटणारं आहे, पण आपल्या मतांचा मी आदर करतो. अत्याचाराचं स्वरुप मानसिक त्रास यासंदर्भात आहे असे मला वाटतं बाकी लैगिंक शोषण वगैरे मला ही शक्यता अगदीच कमी म्हणजे खूपच कमी आहे, असे माझे मत आहे. आमच्या विद्यापीठात पीएच.डीच्या विद्यार्थीनीने एका शिक्षकावर असे आरोप केले होते. पुढे त्या शिक्षकाला निलंबित केले होते आणि या प्रकरणाची पुढे शहनिशा झाली विद्यार्थीनीने आपल्या प्रबंधाचे काम लवकर व्हावे म्हणून हा फंडा वापरला होता. परंतु झाल्याप्रकरणामुळे शिक्षकाची बदनामी झाली अनेक गोष्टींची चर्चा झाल्याचे मला स्मरण आहे. परिपत्रकाचा या निमित्तानं गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिपत्रकाला एकांगी विरोध होतोय असे काही नाही. हमीपत्र देणे ही किरकोळ गोष्ट आहे. परिपत्रकातील भाषेत खूपच अन्याय होत आहेत असं जे आहे, त्याला व्यक्तिगत माझा विरोध आहे. एखादा शिक्षक विद्यार्थीनीला घेऊन बागबगीचेत फिरतोय कधीतरी असं कधीतरी ऐकायला येतं. प्रेमाच्या गोष्टी वगैरे हा जरा दुसरा भाग इथे सुरु होतो, असं करणंही चू़कच आहे, असे मी म्हणेन. दुसरी गोष्ट शाळेतली विद्यार्थीनीच्या पाठीवरुन हात फिरवणे वगैरे अशी काहीत विकृती असू शकते. अवांतर : कोणत्या तरी राज्यातील गोष्ट मला या निमित्तानं आठवतेय. एका प्राध्यापकानं प्रेमाचे धडे गिरवता गिरवता आणि ते आवडून विद्यार्थीनी प्राध्यापकाच्या प्रेमात पडली. विद्यार्थी संघटनांनी ते प्रकरण प्रचंड ताणलं. पुढे त्यांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sat, 01/11/2014 - 05:21 नवीन
विद्यार्थिनी शिक्षकांच्या त्रासामुळे सोडून जातात असं मी म्हटलेलं नाही. त्या सोडून गेल्या तरी कॉलेजला फरक पडत नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी तेवढ्याशा गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. व्यवस्थापनाकडून कारवाई होतही असेल, पण ती त्यांच्या पातळीवर, त्यांच्या मर्जीइतकीच होते. यात त्या विद्यार्थिनीला न्याय नक्की मिळतो का? मला दिसलेल्या उदाहरणांमध्ये, नाही.
आपल्या प्रतिसादात थोडंसं सरसकटीकरण आणि परिपत्रकातील वाक्याप्रमाणे सर्वच असं काही अनैतिक करत आहेत, असे व्यक्त होत आहे
तुमचा कदाचित थोडा गैरसमज होत आहे. मी असं कधीच म्हटलं नाही की सर्वजण असं करतात. मी म्हटलं की सर्रास असे प्रकार होतात. मला शिक्षक लोकांबाबत आदर आहे कारण माझे शिक्षक अतिशय आदरणीय होते. पण आमचा कलाशाखावाल्यांचा वावर वर्ग ते डिपार्ट्मेंट एवढाच असतो. अन्य शाखांमधील मुलींना काही विशिष्ट शिक्षकांच्या सहवासात रहावे लागू नये म्हणून आम्ही मदतही करायचो. मानसिक त्रास कधी संपतो आणि शोषण नेमकं कधी सुरु होतं यातील मर्यादा मला वाटतं फारच धूसर आहे. परिपत्रकातील भाषा खटकली असणं मान्य आहे. मला एवढंच वाटतं की परिपत्रकाची गरज नाहीच आहे, असे प्रकार अगदीच तुरळक असा स्टँड घेतला जाऊ नये.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/10/2014 - 19:02 नवीन
वेळेवर संवाद न साधल्याने प्रॉब्लेमस वाढतात,म्हणून संवाद साधण्यात पुढाकार घेता आहात याच स्वागतच आहे. >>तुम्ही फारच आयडियल बोलताय असं नाही का वाटत आहे तुम्हाला?<< नाही मला वाटते मी आणि आपण एकच गोष्ट वेगवेगळ्या शब्दात मांडत आहोत. वुमेन सेल दिखाऊ होता आणि आपण एकत्र येऊन आवाज उठवला म्हणता म्हणजे आपण मी म्हणत होतो तसे वुमेन सेलच्या पॅरेलेल समांतर काम केलेच ना? आवाज उठवला म्हणजे संस्थेतील समाजातील अथवा शासकीय घटकांशी संवादच साधलाना ? आपण उचललेल पाऊल स्वागतार्हच आहे. आयडीयल्स असणार्‍यांची चांगल्या उद्देशात साथ मिळवत पुढे जायच ? का नेमक आयडीयल बोलतात म्हणून झिडकारायच या बाबत पुन्हा एकदा विचार व्हावा अस वाटत. >>प्रॉब्लेम्स डिस्कस करुन अशा विषयांवर सोल्यूशन्स निघतात का?<< आपल हे वाक्य डिस्कशन नंतर अ‍ॅक्शन चा अनुभव न आल्यामुळे तयार झाल आहे का ? पण इथे दोन बाबी लक्षात घ्या डिस्कस करत नाही तेथे प्रॉब्लेमच समजत नाही आणि प्रॉब्लेम समजला नाही तर सोल्यूशनची शक्यताच निर्माण होत नाही. आवाज न उठवण्या पेक्षा आवाज उठवण चांगल, आपण जेव्हा एखाद्या कार्यात पुढाकार घेत असतो एका अर्थाने नेतृत्व करत असतो.एफेक्टीव्ह रिझल्ट करता आपल नेतृत्व इफेक्टीव्ह व्हाव लागत.नेतृत्वक्षमता विकसीत होण्याकरता विवीध कौशल्यांची आवश्यकता भासू शकते.किमानपक्षी आपल्याला जी बाजू मांडायची आहे ती व्यवस्थीत आणि इफेक्टीव्हली मांडली जाण्याकरता आपण ज्यांची बाजू मांडायची आहे त्यांच व्यवस्थीत ऐकतो का दुसर्‍याचे म्हणणे संयमाने ऐकुन घेणारे आपण एक चांगले श्रोते आहोत का ? मी जर एक चांगला श्रोता असेन तरच मी आपली बाजू समजावून घेऊ शकतो.मी अबकडला काय खटकलय हे समजून घेऊ शकलो तर हळक्षज्ञलाही काय खटकल हे समजू घेऊ शकतो.मी दुसर्‍याबाजूची भूमीका एकण्यास नकार देतो तेव्हा दुसर्‍याबाजूला नव्हे स्वतःला श्रोतृत्वाच्या क्षमतेला तर नकार देत नाही ना हे मी एकदा तपासून घेतल तर मला ज्यांची बाजू मांडायची आहे ती अधीक प्रभावीपणे (इफेक्टीव्हली) आणि अधिक यशस्वी पणे मांडू शकेन. परिपत्रकाच्या बाबत शिक्षकमंडळींना काय खटकल त्याची चर्चा धाग्यात वर झाली आहे.इथे एवढच लक्षात घ्या की इतर प्रतिसादकांनी एका चांगल्या श्रोत्याच काम शिक्षक मंडळीना काय खटकल हे ऐकण्याच केल म्हणजे त्यांच समर्थन आंधळेपणाने केल असा कुठेही अर्थ होत नाही. आणि आपल्याला काय खटकल हे समजू घेतानाही आम्हाला एक चांगला सकारात्मक श्रोता होण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 01/10/2014 - 19:18 नवीन
दोन्ही बाजूंनी चर्चा झालेली खरंच आवडेल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/10/2014 - 20:23 नवीन
या धाग्यातल्या माझ्या आत्तापर्यंतच्या श्रोतृत्वानुसार, आपलेच शब्द वापरत सांगावयाचे झाल्यास एक किंवा दहाहजार किंवा पूर्ण एकलाख यात जेवढे दोषीअसतील त्या पैकी कुणाकडेही दुर्लक्ष करण्याच समर्थन होत नाही केल जात नाहीए. आपल्या स्वतःला माहित असलेली एकही चांगली व्यक्ती चुकीच्या कार्यवाहीत भरडली जावी हे आपल्यालाही पटणारे असणार नाही असा विश्वास आहे. प्रथमतः विद्यार्थीनी स्त्रीया यांना चुकीचे वर्तन करणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा दिसलीतरी आपला स्वतःचा वावर आत्मविश्वासपूर्ण आणि संभाषणाता जरूर तेवढी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण गरजेच आहे. आणि त्याकरता म्हणून जे निर्भिड बना म्हणून सांगितल जात ते समजून घेतल पाहिजे.माझ्या बद्दल इतर लोक काय म्हणतील नकारात्मक विचारकरणार नाहीत ना या विचाराला मनात खूप जास्त स्थानही देऊ नये. इंग्रजीत एक वाकप्रचार आहे डोन्ट टॉलरेट बट बी पेशन्ट (Patience) अर्थ सहनकरू नका पण संयम बाळगा. म्हणजे एखादी गोष्ट खटकली तर संबंधीत (त्याच) व्यक्तीशी वेळीच सरळ संवाद साधून खुपलेली गोष्ट स्पष्ट सांगणे. द्वेष मत्सर घृणा या भावना अपरोक्ष व्यक्त होत रहातात पण,बर्‍याच मोठ्या प्रमाणावर संवादाची महत्वाची स्टेप इमोशनल अस्पेक्टसमध्ये टळत असण्याची शक्यता वाटते. एखादी तक्रार वरच्या स्तरावर न्यायची असेल तर हायरार्की पुर्णतः समजून घ्यावी.तक्रार करताना शक्यतोवर मधल्या स्टेप्स मधे येणार्‍या व्यक्ती आवडोत अथवा न आवडोत टाळू नयेत.म्हणजे आधी क्लास टिचर मग एचओडी मग प्रिसिपॉल.मग संस्था संचालक मग व्हिसी आणि मग शिक्षणाधीकारी मग शिक्षण सचीव.आपल्याला अपेक्षीत बेस्ट पॉसीबल सोलूशन समाधान मिळे पर्यंत प्रत्येक स्टेप वर चढत जायची प्रत्येकाला सांगयच सर मी तुमचा मुद्दा समजून घेतला तरी माझ समाधान झालेल नाही आपण दोघे मिळून या विषयावर वरीष्ठांशी संवाद साधू.तुम्हाला हायरार्की व्यवस्थीतपणे माहिती आहे आणि तुम्ही आत्मविश्वासाने आपली बाजू एकेक स्तर वर संयमानी वर नेणार आहात हे लक्षात आल्या नंतर तुमच्यावर दबाव टाकल जाण बंद होत आणि तुम्हाला अपेक्षीत सोलूशन मिळण्याकरता कार्यवाही होते. नेमकी काय कार्यवाही केली आणि ती तेवढिच का ते संबंधीत स्तराशी डायरेक्ट संवाद साधून विचारून घ्याव समाधान होई पर्यंत वर जात रहाव चुकीच्या वागणूकीवर कारवाई केल्याने शैक्षणिक संस्थेची बदनामी होत नाही,उलटपक्षी पत सुधारते हे संवाद साधणार्‍या व्यक्तींना इफेक्टीव्हली कम्यूनिकेट करता आल पाहीजे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 01/10/2014 - 20:57 नवीन
कार्यवाही न होण्याची कारण वेगवेगळी असू शकतात.बर्‍याचदा संबंधित व्यक्ती समज दिली गेली असते त्याच्या पुर्ण करीअरच नुकसान होऊ नये म्हणून वर्तन सुधारण्याकरता संधी दिली गेली असते. याचा अर्थ मागच्या तक्रारीत कार्यवाही झाली नाही मग आता तक्रार करून काय उपयोग गैरवर्तन पुन्हा झाल्यास असा सुर काढणे टाळणे जरूरीचे असते.आपण ज्या स्तराकडे तक्रार घेऊन जातो त्यापैकीच कुणी असा सूर काढला तरीही वरच्या स्तराकडे सोबत जाऊन भेटण्याचा आग्रह कायम ठेवणे जरूरी असते. आणि कायदा होईल तेव्हा होऊद्या आपण माजी विद्यार्थी विद्यार्थीनी असाल तर आपल्या शाळा कॉलेजच्या संस्थेच्या निर्णय प्रक्रीयेत सहभागी होण्याचे प्रयत्न करून परिस्थिती बदलण्यास हातभार निश्चित लावू शकता. अर्थात हा एक भाग झाला प्राचार्य ही पुढे दिसणारी व्यक्ती असली तरी विद्यार्थेतर व्यक्तींवरच्या कार्यवाही करता संस्था संचालक वगैरे मंडळी असतात पण विद्यार्थ्यांना याची कल्पनाच नसते. किंवा वरच्या स्तरांपर्यंत जाण्याचे ते धाडस करत नाहीत. एकएकस्तर करत वरच्या स्तरापर्यंत संपर्क करत जाण्याचा प्रयत्न आयूष्यात पुढच्या करीअरमध्ये सुद्धा चांगलाच कामी येतो.त्या बद्दल कोनतीही अपराधीपणाची भावना न ठेवता धाडस केलेल चांगल. महाराष्ट्रातील बहुतांश शैक्षणिक संस्थाचालक सहकारी शैक्षणिक संस्था आहेत. संस्थेतील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हा आपला तो माझा या प्रकाराने भरले गेलेले असतात कर्मचारी संघटना आणि कोर्ट हे प्रकारही असतात मग यातलेच काही राजकारणी मंत्री पदापर्यंत असतात वगैरे.तरी सुद्धा शैक्षनिक संस्था विद्यापिठ आणि शासन या दुहेरी कात्रीत असतात त्यांच्या पर्यंत तुम्ही जाऊ लागला की बहुतांश शैक्षणिक संस्था द्बावाखाली निश्चित येणार.कायद्याच्या झक्कू पासून नेहमीकरता पुर्णपणे कुणीही पळू शकत नाही हा विश्वास महत्वाचा. सोबतच राजकीय राखीव कुरणे झालेल्या शैक्षणिक संस्था मध्ये विद्यार्थीनींच्या पालकांचा आणि माजी विद्यार्थी विद्यार्थीनींचा सहभाग संस्था स्तरावरच कायद्यात बदल करून वाढवण्या करता विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांनी प्रयत्न करावयास हवेत.जेणेकरून एकुण प्रक्रीया अधिक ट्रांसपरंट आणि विश्वासार्ह होईल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/10/2014 - 20:26 नवीन
विद्यार्थ्यांकडून रॅगिंग करणार नाही हे लिहून घेतात तसं शिक्षकांकडून चांगल्या वर्तणुकीची हमी घ्यावी का? हा धाग्याचा मूळ विषय. अन्य क्षेत्रात काय परिस्थिती आहे? अशी हमीपत्रे घेतली जातात का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. बँकेत नोकरी देताना फक्त २ सभ्य लोकांकडून चांगल्या वागणुकीची (मी अमक्या तमक्याला ओळखतो. त्याची वागणूक चांगली आहे अशा तर्‍हेची) सर्टिफिकेट्स घेतली जातात. त्यापलिकडे काही नाही. पण त्याचबरोबर एरवी मरीमर पैसा खाणारे बँकेतले म्यानेजर/ वरिष्ठ अधिकारी "मी भ्रष्टाचार करणार नाही" अशी शपथ दर वर्षी हात उचलून वगैरे घेतात आणि त्याचे फोटो पेप्रात छापवून आणतात हे पाहून प्रचंड करमणूक करून घेतली आहे.
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 01/10/2014 - 21:25 नवीन
ही चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून फारशी काही वर्क आऊट होणार नाही हे खरंही असेल. पण मला असं वाटतं, की अशा प्रकारच्या गोष्टी झाल्याने शिक्षण क्षेत्रातही या गोष्टी होतात याची जागृती होईल. जो काही निर्भीडपणा मुलींकडून अपेक्षित आहे, त्याची सुरुवात या जागृतीने होईल. 'मला छळणारा एकच शिक्षक असा नाही तर इतर अनेक असेच असतात' हे एकदा पचनी पडलं, की या गोष्टींबद्दल बोलायला मुली पुढे येऊ लागतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 01/11/2014 - 05:48 नवीन
बर्‍याच शैक्षणिक संस्थाची स्वतःची वेबसाईट्स आहेत.शिक्षक आणि कर्मचार्‍यांची अप्रायझल्स कॉन्फिडेशियल पद्धतीने ऑनलाईन घेऊन ती प्राचार्य , संस्था चालक आणि कार्याहवाल पिरियॉडीकली महिला आयोगा कडे दिली जाऊ शकतील अशी ऑनलाईन व्यवस्था करणे खरेतर अवघड असू नये. त्या शिवाय शैक्षणिक संस्थेच्या अक्रेडिशन मध्ये महिला सुरक्षीततेच्या दृष्टीने अशा अहवालावर आधारीत अक्रेडीशन बंधनकारक केल्यास संस्थांचालकांवरचा दबाव आपोआप वाढेल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 15 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा