अदभूत शास्त्र
ज्योतिष हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ज्योतिष ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला ज्योतिष विद्येमुळे कळते. भविष्यात होणारे आजार, मिळणार असणारी नोकरी ह्या बाबत आधीच सारे कळते. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे.
सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल. पण ज्योतीशाना मात्र भारताचे भविष्य माहित असणार कोण निवडून येईल कोणाला किती मते मिळतील तेही माहितच असणार. असे हे अद्वितीय शास्त्र आहे.
काळाच्या उदरात काय दडलेले असते हे कोणालाच ठावूक नसते अपवाद ज्योतिष शास्त्र . काळाच्या उदरात जावून आतली बातमी हे शास्त्र काढू शकते अशा ह्या शास्त्र नि त्याच्या निर्मात्यांना सलाम .. ज्योतिष ह्या शास्त्रातले अनेक तज्ञ आपल्या देशात ज्योतिषांचा व्यवसाय करून जनतेचे भले करत आहेत.
हा व्यवसाय आता मोठ्या उद्योग धंद्याचे स्वरूप धारण करत असताना सरकारने जर ह्या व्यवसायाला शॉप अॅक्ट, इन्कमट्याक्स, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स लावला तर सरकारच्या मह्सुलातही भर पडून देशाचे कल्याण होईल विकास साधता येईल.
पुन्हा एकदा ह्या मानवजातीचे भले करणाऱ्या शास्त्राला दंडवत!
सामानासह.............! हसुन हसुन मुरकुण्डी वळली !