Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत) (कृपया विषयांतर नको)

आ
आयुर्हित
Fri, 01/03/2014 - 17:07
🗣 181 प्रतिसाद
लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य यावर :गीतारहस्याबद्दल थोडेसे"...हा अतुल ठाकुर यांचा सहभाग- "त्यापैकी सर्वात गंभीर मधुमेह त्यांनी आहारावर संयम करुन ताब्यात ठेवला होता" संदर्भ: “लोकमान्य” – न. र.फाटक (पूर्वप्रकाशित)
वरील धागा वाचतांना "मधुमेह"अगदी महत्त्वाचा मुद्दा हाती आला,आणि नवीन धागा सुरु करावासा वाटला. माझ्या मते मधुमेह हा भारतातील सर्वात गम्भीर आजार आहे. आज भारतातील प्रत्येकी तीन व्यक्तीमागे एकास मधुमेह आहे किंवा पुढच्या आयुष्यात कधी तरी होणार आहे. आज हीच गोष्ट कितीतरी मधुमेह तज्ञ व औषधं बनविणाऱ्या उद्योगांसाठी हवी हवीशी वाटत असली तरीही रुग्णांसाठी फारच धोकादायक आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ९०%(नव्वद टक्के)रुग्ण याबद्दल जागरूक नाहीत. काहींना तर हा विषयच नकोसा वाटतो. परिणामी पुढे जाऊन आपल्या पदरात काय वाढून ठेवले आहे, ह्याची जरासुद्धा खबरबात ते घेत नाहीत. काही रुग्ण तर फक्त "मी तज्ञ डॉक्टरांना हवी तेवढी भरघोस फी देतो व त्यांचाच सल्ला घेतो आहे" असे म्हणून सर्व जबाबदारी त्यांच्या डॉक्टरांवरच टाकत असतात. पण त्या बिचाऱ्यांना काहीही कल्पना नसते कि मधुमेह जर ताब्यात ठेवला नाही तर खालील पैकी काहीही होऊ शकते. १)उच्च रक्तदाब : High Blood Presure/ Atherosclerosis २)हृदयरोग : Byepass / Angioplasty /myocardial infarction /Heart failure २)मूत्राशयाचे आजार : Kidney cancer/ Kidney failure/ Proteinuria 3)दृष्टी जाणे : Glaucoma ४)पाय कापावा लागणे : Leg Amputation ५)इतर कारणास्तव उद्भवणारी महत्त्वाची शस्त्रक्रिया टाळावी लागणे ६)मेंदूचे गंभीर आजार : Brain Hemorrhage ७)कर्ण बधिरता येणे ८)क्षयरोग असल्यास योग्य ती उपाययोजना न करता येणे ९)रक्तशर्करा अचानक कमी होऊन अपघात होणे १०)गोड न खाण्याच्या पथ्याबद्दल चीड चीड होऊन घरात/बाहेर सर्व मित्र/हीतचिंतकांशी भांडणे होणे. हो हो मला कळले तुम्ही काय म्हणाल ते!!! रुग्णांना न घाबरविता, त्यांना हवी ती माहिती पुरवून त्यांना सर्व तोपरी मदत व्हावी या उद्देशाने हा धागा सुरु करत आहे.कृपया आपल्या कुटुंबात/मित्रांमध्ये जर कोणी रुग्ण असतील, तर आवश्यकतेनुसार त्यांचीहि मदत घेऊन त्यांचे प्रश्न आपण सर्वांनी समजून घेऊयात. ज्यां मान्यवरांना जी माहिती असेल ती त्यांनी मोफत या धाग्यावर पुरवावी. याचा फायदा सर्व रुग्णांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कळावे, गोडवा असावा. आपला लाडका:आयुर्हीत

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 82524 views

🗣 चर्चा (181)
आ
आयुर्हित Sun, 01/05/2014 - 19:51 नवीन
मनापासून धन्यवाद, कारण सूचना मनापासून लिहिलेली वाटली. प्रतिक्रिया आवडली, असू देत. शेवटी हे आपल्या सर्वांसाठीच आहे. कळावे,लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 01/06/2014 - 06:36 नवीन
Defective ‘MADD’ gene responsible for type 2 diabetes, discovers Indian origin scientist धन्यवाद त्या श्री. बेल्लूर एस प्रभाकर सरांना, ज्यांचा हा शोध आहे. Defective "MADD" gene कळावे, लोभ असावा आपला लाडका, आयुर्हीत
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/06/2014 - 07:12 नवीन
बाबा पाटील आणि खरे काका अजून या धाग्यापासून लांब राहिल्यचे पाहून आश्चर्य वाटले .. http://www.diabetesmukti.com/ काल झी हॅलो डॉक्टर मध्ये ह्याची माहिती आली होती.. बहुतेक प्रायोजित कार्यक्रम असावा
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/07/2014 - 07:39 नवीन
>>>>बाबा पाटील आणि खरे काका अजून या धाग्यापासून लांब राहिल्यचे पाहून आश्चर्य वाटले .. ते दोघेही, कदाचित, मधूमेही नसल्याकारणाने त्यांना अजून चर्चेचे गांभिर्य जाणवले नसेल. आणि असेही, फुकटचे सल्ले कोणी मागू नयेत आणि डॉक्टरांनी ते देऊ नयेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 01/07/2014 - 08:37 नवीन
नेट कंन्सलटींग हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. ते बर्‍याच धाग्यावर माहिती देत असतात .. पूर्व-काळजी आणि लक्षणांबद्दलची माहिती .. तसेच गांभिर्य ( सोनारांनी कान टोचले की बरा असता :) ) एवढेच अपेक्षित होते.. कदाचित कार्य बाहुल्यमुळे त्यांना जमले नसावे किंवा धाग्यावर प्रतिसाद (सल्ला) देणे यथोचित वाटले नसावे ..
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/06/2014 - 07:54 नवीन
मी सध्या डायबेटिक नसलो तरी त्या सीमेपार पोहोचीन ही दाट शक्यता आहेच.. :) त्यामुळे धाग्याच्या उद्देशाबद्दल अभिनंदन. बाकी भारतात नवे डायबेटिस मार्केट उगवते आहे असं काही वृत्तपत्रांच्या पूर्णप्रथमपृष्ठीय जाहिराती पाहून दिसतं. सध्या मजबाबतीत ते रक्तशर्करा थेट डायबेटिक रेंजमधे नसली तरी जनरल रीडिंगमधे साखर नेहमीपेक्षा (तरुण असतानापेक्षा बरीच) वाढताना दिसली आहे. प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इन्डेक्स बघूनच ती खाणे उत्तम. म्युजली वगैरे खाल्ल्यास ऊर्जा मिळते पण साखर एकदम वाढत नाही. त्यामुळे ते फायद्याचं, पण साधारण असे चघळचोथायुक्त पदार्थ चवीलाही आकर्षक नसतात. त्यांची सुरुवातीला बळंच सवयच करुन घ्यायला पाहिजे हे खरं. ग्लुकोमीटर घरी आणून गेल्या काही वर्षांत जे सेल्फ चेक केले त्यावरुन काढलेले निष्कर्षः भात, नूडल्स, पांढरा पाव/ब्रेड, बटाटा, साबुदाणा, फलरस या पदार्थांच्या सेवनानंतर रक्तातली साखर तातडीने डायबेटिक रेंजला स्पर्ष करु लागते आणि अनेक तास ती वरच्या पातळीवरच राहते. थालीपीठ, चिकन (स्किनलेस ग्रिल्ड चिकन ब्रेस्ट), फिश फ्राय / करी, सॅलड, म्युजली या पदार्थांनंतर साखर एकदम नॉर्मल रेंजमधे राहते आणि दोनचार तासात खाली उतरते. भाकरी, पोळी यांनी भाताइतकी नाही तरी बर्‍यापैकी साखर वाढते. माफक वारुणीसेवन काही कारणाने जाहले तर काही तासांनंतर साखर झपाट्याने खाली येते. व्यायाम (चालणे) हे क्वचित घडले तर त्यानंतर साखर कमी होते, तात्पुरतीच अर्थात. इत्यादि..
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 01/06/2014 - 11:17 नवीन
किती टोचलंत स्वतःला? ;) पण निष्कर्ष परफेक्ट आहेत. दारू पिल्याने साखर वाढते (लगेच). एक एम एल अल्कोहोल सात उष्मांक देतो. पण त्या रिकामटेकड्या कॅलर्यांचा बॉडिला उपयोग नसतो.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 01/18/2014 - 08:22 नवीन
हाती आलेल्या गुगल ब्लॉग नुसार Blood sugar level तपासण्यासाठी,येणाऱ्या काळात सुई टोचायची गरज नसणार.हे काम डोळ्यात घातलेला कॉन्टॅक्ट लेन्सच करेल.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 01/22/2014 - 03:58 नवीन
Glucose Monitoring
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/06/2014 - 11:26 नवीन
चांगली निरिक्षणे, गवि. उपयुक्त आहेत.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 01/07/2014 - 10:21 नवीन
इडलीडोसे इ.इ. मुळे साखर किती वाढते? आंबवलेल्या पदार्थांमुळे जास्त वाढते की कमी?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/07/2014 - 15:21 नवीन
नक्कीच वाढते, कारण यात simple carbohydrates (साधारण प्रतीचे कर्बोदके) जास्त असतात. अधिक माहिती साठी "मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था" हा प्रतिसाद व नंतर glycemic index मध्ये शोधावे.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 01/18/2014 - 09:37 नवीन
इडलीच्या आत काय खाद्यपदार्थ आहे या वरुन इडलीचा glycemic index हा कमी जास्त होऊ शकतो. चकचकीत (polished)बासमती तांदळाचा GI: ६८ ते ७४ मसुरी तांदुळाचा GI: ५५ ते ६० उकडा(सेल्ला/parboiled/steam)तांदुळाचा GI: ४८ ते ५५ गव्हाचा रवा चा GI:३५ ते ५५ (धन्यवाद रेवती ताई) मधुमेह असणाऱ्यांनी शक्यतोवर रवा इडली खावी. जर तांदळाची इडली असेल तर कमीत कमी इडली बरोबर जास्तीत जास्त सांबार व चटणीवर ताव मारावा,म्हणजे रक्तातील साखर जास्त वाढणार नाही. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 01/27/2014 - 15:30 नवीन
धन्यवाद आयुर्हित साहेब. सांबार-चटणीवर आम्ही ताव कायमच मारीत असतो, सबब टेण्षण नाही.
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 01/06/2014 - 07:55 नवीन
रात्री मुनीर खान ह्यांच्या बद्दल बर्याच लोकांचे मत ऐकले. दवा चांगली आहे म्हणतात. कुणा मिपाकराला अजून काही माहिती आहे काय?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 03/31/2015 - 15:24 नवीन
आजच "India न्यूज" TV channel वर सांगितल्याप्रमाणे मुनीरखानला अटक करण्यात आली आहे, जो बॉडी रिवाइवल ट्रीटमेंट उपचारासाठी एका बाटलीचे रुपये १६०००/- घेत असे, ज्याचे उत्पादनमूल्य १००/- आहे. साभार TOI 'Miracle doc' Munir Khan held by Versova police
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Mon, 01/06/2014 - 12:13 नवीन
पेठकरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या मनाची समजूत मीसुद्धा यशस्वी रीतीने घातली आहे. त्यामुळे मला स्वतःला त्यापासून मानसिक त्रास होत नाही, कदाचित ते सुद्धा वयोमानावर अवलंबून असेल. पण ज्यांना त्या बंधनांचा खूप त्रास होतो अशी माणसे मी पाहिली आहेत, त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही असे घडत असते. पाऊस आणि डबके हे उदाहरण चपखल आहे. पण पावसाची एकादीच मोठी सर आली तर ते पाणीसुद्धा जमीनीत जिरून जाते. त्याचप्रमाणे मेजवानीच्या जेवणात भात, पोळी वगैरे टाळून आयस्क्रीम किंवा एकादा गुलाबजामिन खाल्याने निदान माझ्या रक्तातली साखर काही वाढत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 01/06/2014 - 12:39 नवीन
धन्यवाद आनंद सर,
पण ज्यांना त्या बंधनांचा खूप त्रास होतो अशी माणसे मी पाहिली आहेत, त्यांच्या बाबतीत कळते पण वळत नाही असे घडत असते.
याला "काही शारिरीक कारणे" च जबाबदार असतात, असे मला वाटते.हीच तर खरी परीक्षा आहे मधुमेहतज्ञांची. अशी काही लोक आपल्या माहितीत असतील, तर कृपया करून भेटवा मिपावर. मला काही खऱ्या खुऱ्या success stories तयार करायचा आहेत. कळावे, लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
म
म्हैस Tue, 01/07/2014 - 08:59 नवीन
हा मधुमेह लई वाईट . माझ्या मामीला cancer झाला होता . तिचा operation करायचं होतं पण मधुमेहामुळे जखमा बर्या होणार नाहीत म्हणून केला नाही. आणि आजार वाढतच गेला. गेल्याच आठवड्यात गेली ती
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 01/07/2014 - 10:17 नवीन
काही डॉक्टर मंडळी वजन कमी करण्याचे सल्ले देतात.वजन जास्त असले तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/07/2014 - 15:28 नवीन
हो हे १००% खरे आहे. यावरील अधिक माहिती साठी "शुगर हि टेन्शनमुळेही वाढते" हा प्रतिसाद परत एकदा वाचवा. कोणी अशी व्यक्ती आपल्या माहितीत असेल तर तिलाही हि माहिती पुरवावी, हि विनंती. धन्यवाद कळावे,लोभ असावा. आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 01/07/2014 - 10:30 नवीन
अनेक डॉक्टर्स/आहार तज्ञांकडून 'वाट्टेल ते खा, व्यायाम केला की प्रश्न मिटला.' अशा स्वरुपाचे सल्ले मिळतात मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 01/07/2014 - 12:50 नवीन
मिडियामधून. कितपत तथ्य असते त्यात?
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे .. मीडिया मधल्या बातम्या बघून सल्ला घेण्यापेक्षा १०० रु. खर्च केलेले बरे
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/07/2014 - 16:11 नवीन
वाट्टेल ते खावे ते निरोगी माणसाने. पण कोणत्याही मधुमेही /रुग्णासाठी पथ्य फार महत्त्वाचे असते. (अपवाद: आपण हे वाक्य ऐकले असेल, तर ते त्या एकट्या व्यक्तीलाच लागू होऊ शकतात, ज्याची casestudy डॉक्टरांनी पूर्ण केली आहे, ज्याची इत्यंभूत माहिती त्यांना असली पाहिजे. पण ते न करताच जर वरील सल्ला देत असतील तर मात्र धन्य ते डॉक्टर! व धन्य तो रुग्ण!!!!) यावरील अधिक माहितीसाठी "मधुमेह खरोखर फार भयंकर अवस्था" हा श्री. प्रभाकार पेठकर यांचा प्रतिसाद वाचावा. कळावे, लोभ असावा. आपला लाडका:आयुर्हीत
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/07/2014 - 16:51 नवीन
वर्तमानपत्रातील भविष्य इतकेच खात्रीचे असतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 01/07/2014 - 15:47 नवीन
आपल्या जीवन शैलीत तन आणि मन या दोनही पातळीवर बदल आवश्यक आहेत. पुढच्या पिढीची काळजी फारशी करू नये. एकंदरीत आपण एकटेच येतो एकतेच जातो मग नातेसंबधात अतिरिक्त गुंतवणूक मग साहजिकच ताण ही साखळी मोडावी. एका तंगडी वर दुसरी टाकून बसू नये. व्यायाम टाळण्यासाठी मन सबबी शोधत असते त्याला गप्प बसवावे. आपले वाहन आपल्या वास्तूतून रस्त्यावर हाताने ओढत न्यावे. वाहन लांब पार्क करून बँकेत वगैरे जावे. फायदे दोन साखर वापरली जाते व डबल पार्किंग म्हणून गाडी उचलून नेली जात नाही. घरातील धुणे वाळत घालणे , मशीनवर कपडे धुणे. घरातील केर काढणे , बागेतील काम ई कामे मधुमेहीने स्वतः वर लादून घ्यावीत. दोन मजल्यापर्यंत तरी लिफ्टचा वापर करू नये.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 01/07/2014 - 18:24 नवीन
माझ्या विषयापुरते डायबेटीसचे अनुभव सांगते. डायबेटीस आणि हिरड्यांच्या आजारांचा जवळून संबंध असतो. डायबेटीक असल्याने हिरड्यांना लवकर जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते त्यामुळे हिरड्यातुन रक्त येणे,दुर्गंधी येणे,पू येणे,दात हलायला लागणे असे प्रकार उद्भवु शकतात. डायबेटीसमध्ये जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रक्रुती मात्र संसर्ग धार्जिणी झालेली असू शकते. तसेच या इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभळले पाहिजे. ते कसे.. डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे. दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे. रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.) कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे. डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी. किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा. अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी व्रुत्ती टाळावी. ( मराठी टायपींग नीट होत नाही आहे,अशुद्धलेखन माफ करा)
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/07/2014 - 21:19 नवीन
डॉक्टर अजयाजी, एक स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण म्हणून आपले सर्वप्रथम स्वागत असो.वेळात वेळ काढून फार मोलाची माहिती दिलीत त्याबद्दलही धन्यवाद. एक मोठ्ठी चूक लक्षात आणून दिलीत आपण. ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील),जंतूंशी लढण्याची प्रतिकारशक्ती कमी होणे(आता हे १२नंबर ला येतील). फार फार महत्वाचा विषय हे हा.
इन्फेक्शनमुळे रक्तातील साखर वाढायला लागली असेही होउ शकते.त्यामुळेही डायबेटीसची गुंतागुंत वाढू शकते. आणि म्हणुनच मुख आरोग्य अतिशय काळजीपूर्वक सांभाळले पाहिजे.
त्यासाठी
डेंटीस्टकडुन नियमीत तपासणी करुन घेणे. दातांची साफसफाई दर सहा महिन्यानी डेंटीस्टकडुन करुन घेणे. रोज कसे दात घासावे हे समजावून घेणे.(कसे हे फार महत्त्वाचे आहे.) कवळी वापरत असल्यास ती अत्यंत स्वच्छ ठेवणे. डायबेटीसमुळे तोंडाला कोरड पडू शकते. त्याने दात किडायचा धोका वाढतो. रक्तातील साखर नियंत्रित झाल्यावर कोरड कमी होते,न झाल्यास त्यावर उपाययोजना करुन घ्यावी. किडलेले दात, लाल झालेल्या हिरड्या,हलणारे दात यांचा वेळीच बंदोबस्त करुन घ्यावा. अती झाल्यावर डॉक्टरकडे जाऊ अशी वृत्ती टाळावी.
इतके छान मार्गदर्शन आज फक्त मिपाकारानाच मिळतेय, ह्यापेक्षा अधिक ते सुख कोणते? तर आज पासून कोण कोण करतंय तंबाखू,१२०/३००,जर्दा, किमाम, पानमसाला इ.इ. बंद........ !!!! कळवा हो आम्हाला कसे वाटले ते. कळावे, लोभ असावा. आपला लाडका : आयुर्हीत
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/07/2014 - 21:35 नवीन
>>>>ह्या लेखात मधुमेहामुळे हिरड्यांना होणारे आजार मी तर विचारातच घेतले नव्हते(आता हे ११नंबर ला येतील), ह्याहून गंभिर दुष्परीणाम म्हणजे लैंगिक इच्छाशक्तीचा र्‍हास होतो. आयुष्यातला शारीरीक प्रणय जवळ जवळ संपुष्टात येतो. (नंबर १ ला टाका).
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sat, 01/25/2014 - 06:29 नवीन
Rachel Fiske, Certified Nutrition Consultant and Owner of Madrona Wellness in San Francisco लैंगिक शक्तीचा ऱ्हासाबद्दल काय सांगतो ते पहा: 10 Surprising Foods that Kill Your Sex Life सौजन्य : The New England Journal of Medicine, Bollywoodshaadis.com
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 01/08/2014 - 09:19 नवीन
वरचा प्रतिसाद चांगला होता पण डायरेक
स्त्रीशक्ती (woman power)चे जाज्वल्य उदाहरण
??
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 01/08/2014 - 17:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/07/2014 - 19:14 नवीन
मधुमेह या रोगाबद्दल आपल्या मित्र मंडळीनी बरेच काही छान आणि माहितीपूर्ण लिहिले आहे. या विषयावर प्रचंड माहिती जालावर पुस्तकात आणि इतरत्र उपलब्ध आहेच त्यात मी आपले चार थेंब टाकण्यात फार काही हशील नाही. पण काही मुद्दे वैद्यकीय शाखेत नसलेल्या मित्रांसाठी लिहित आहे. १) मधुमेहावर नियंत्रण ठेवणे एवढे कठीण का?(व्यायाम करणे किंवा वजन कमी करणे हे एवढे अवघड का याची पण उत्तरे यात आहेत) - आपण आपला चेहरा धुतला कि तो लगेच स्व्च्छ दिसतो. फेशियल केलें तर लगेच चमकू लागतो. हा ताबडतोब दिसणारा (मूर्त) प्रभाव आहे.(tangible effect) असा कोणताही ताबडतोबीचा प्रभाव मधुमेह नियंत्रणाने दिसत नाही. त्यामुळे आज खाउन घेऊ उद्यापासून पथ्य करू असे शंभरात नव्वद लोक करीत राहतात. २)मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही. ३) कित्येक व्यक्ती रक्तातील साखर तपासणी च्या आदल्या दिवशी उपास करून जातात. यात त्यांना हे लक्षात येत नाही कि ते स्वतःला फसवत असतात कि आपल्या नातेवाईकांना कि आपल्या डॉक्टरना. यात डॉक्टरला फार काही फरक पडत नसतो कारण रक्तातील साखर कमी दिसली कि डॉक्टर औषधाचा डोस कमी करतात त्यामुळे रुग्णाची साखर मधल्या काळात वाढलेली राहते आणि त्याचा दूरगामी परिणाम रुग्णालाच भोगावा लागतो. ४)मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात किंवा आपल्या स्वतःच्या अनुभवांची देवाण घेवाण करीत राहतात. दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते. ५) मधुमेहाचे रुग्ण आपले डॉक्टर आणि/ किंवा (पाथी- आयुर्वेद होमियो किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र) प्रणाली बदलत राहतात त्यामुळे कोणत्याच पाथी चा उपाय पूर्णपणे होत नाही. शिवाय दरवेळी डॉक्टरला पैसे कशाला द्यायचे म्हणून लोक वेळच्या वेळी डॉक्टरचा सल्ला घेत नाहीत. बहुसंख्य डॉक्टरांकडे येणारे रुग्ण हे सहा ते आठ महिन्यांनी येतात. मधल्या काळात त्यांच्या मधुमेहाची पातळी काय आहे हे त्यांना सांगता येत नाही (किंवा सांगायचे नसते-दुसर्या डॉक्टर/पाथी कडे गेलेले असतात. ६) आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल. दर दोन चार महिन्यांनी डॉक्टर बदलणे म्हणजे आपल्या मुलाला तीन महीने एका शाळेत तीन महिने दुसर्या आणि तीन महिने तिसर्या शाळेत घातल्यासारखे आहे. त्याचा अभ्यास होईल काय?डॉक्टर पासून काहीही लपवू नये असे म्हटले जाते. परंतु डॉक्टर आपल्याला ओरडतील या भीतीने सर्रास लोक लपवा छपवी करतात किंवा खोटे सांगतात. (याचे प्रमाण जवळ जवळ ९९-१०० % आहे.) ७) केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते. http://en.wikipedia.org/wiki/Glycated_hemoglobin. साती ताई या विषयातील तज्ञ आहेत त्यांनी यावर प्रकाश टाकला तर ते योग्य ठरेल. मी एक विकिरण विशेषज्ञ आहे मधुमेह तज्ञ नाही. चूक भूल द्यावी घ्यावी. क्रमशः
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Tue, 01/07/2014 - 20:47 नवीन
धन्यवाद सुबोध सर, फारच समर्पक रीत्या काही कुरितींचा उल्लेख केलाय आपण, ज्यात
मोठ्या प्रमाणावर लोक असे आहेत ज्यांना मधुमेहाचा त्रास असा काही होत नसतो त्यामुळे आपल्याला मधुमेह आहे हे त्यांना उशिरा लक्षात येते आणि निदान झाल्यावरही त्यांच्या "लक्षात"रहात नाही.
आणि
मुळात हा रोग इतका गंभीर आहे हेच लोकांना पटत नाही त्यामुळे ते जो भेटेल त्याला सल्ला विचारत राहतात व दुर्दैवाने लोक सुद्धा भेटेल त्याला स्वताचे अनुभव हे वैद्यकीय सल्ला म्हणून देत राहतात आणि त्यातून अर्धवट ज्ञान वाढीस लागलेले असते.
सुबोध सर,आपणा सर्वांना आपले डॉक्टर/path/प्रणाली न बदलण्यासही सांगतात:
आपला ज्या पाथी वर विश्वास आहे त्या डॉक्टरला कमीत कमी एक वर्ष वेळ द्यावा म्हणजे त्यांचा गुण येतो आहे कि नाही हे आपल्याला स्पष्ट कळेल.
एक जबरदस्त नवीन माहिती हाती आली आहे ती म्हणजे
केवळ रक्तातील साखर तपासून आपला मधुमेह पूर्ण नियंत्रणात येत नाही त्यासाठी Hb १ C (glyacated hempoglobin) याची तपासणी आवश्यक आहे. हि तपासणी आपल्या रक्तातील साखरेची गेल्या दोन ते तीन महिन्यातील सरासरी पातळी दाखवते.
From wikipedia_Glycated_hemoglobin In general, the reference range(that found in healthy persons)is about 20–40 mmol/mol (4–5.9 DCCT %). Higher levels of HbA1c are found in people with persistently elevated blood sugar, as in diabetes mellitus. The International Diabetes Federation and American College of Endocrinology recommend HbA1c values below 48 mmol/mol (6.5 DCCT %) A retrospective study of 47,970 diabetes patients found that patients with an A1C more than 48 mmol/mol (6.5 DCCT %) had an increased mortality rate कळावे,लोभ असावा आपला लाडका: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Tue, 01/07/2014 - 21:50 नवीन
कोणीतरी आवरा हो या आयुर्हितचिंतक 'अखिल पाघळे'ना..!! चांगल्या प्रतिसादाच्य मागे पुढे हे शेपुट आहेच साऱखे..
  • Log in or register to post comments
न
नित्य नुतन Wed, 01/08/2014 - 08:41 नवीन
लाइव्ह कॉमेंट्री चा असाही आस्वाद घेता येतो .. ते आजकालच्या मेडिया ला झालेय नं... तेच तेच पुन्हा पुन्हा ... वाक्याची तोडफोड करून सांगणे मधुमेहापेक्षा भयानक खी खी खी
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 01/08/2014 - 10:11 नवीन
आस्वाद घेता येतो ही चांगली बाब आहे. आपल्याप्रमाणे सर्वांना(अगदी मधुमेही रुग्णांनाही)आयुष्यभर आस्वाद घेता यावी या साठीच आहे हा उपक्रम. अधिक खोलात जाऊन विचार करायची वेळ आली आहे, म्हणून हे बारीक तपशील परत उद्धृत (highlight)करणे महत्त्वाचे वाटते मला. गंभीरपणे(seriously) सांगतो, आत्तापासून फक्त एक आठवडा साखर/गोड/आवडीचे पदार्थ खाणे बंद करून पहा, म्हणजे समजेल आपल्याया! १५ जानेवारीला भेटूच परत. कळावे, लोभ असावा. आपला लाडका,आयुर्हीत
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Wed, 01/08/2014 - 17:31 नवीन
ओक्के आयुर्हित काका आता तुम्ही डायरेक्ट १५ जानेवारीलाच या धाग्यावर परत प्रतिसाद द्या... तुमच्या हेतुंबद्दल कोणाच्याही मनात येथे शंका नाही... धागा खरोखर माहीतीपुर्ण व्हावा त्याचा सिरियसनेस रहावा यासाठीच सगळे तुम्हाला आवरायचा प्रयत्न करतायत.. . प्रत्येक प्रतिसादानंतर त्यातले मुद्दे हायलाईट करणारा उपप्र्तिसाद द्यायची खरच गरज नाहीये.. महत्वाचे मुद्दे स्वतः समजुन घेण्याईतका इथला प्रत्येक सदस्य सुजाण आहेच.. कुठलाही मुद्दा कोणाच्याही नजरेतुन मिस होणार नाही याची खात्री बाळगा... वाट्ल्यास चर्चा संपत आल्यावर तुम्ही ' कन्क्लूजन ' चा एक मोठा प्रतिसाद द्या.. त्यात सगळे मुद्दे अधोरेखित करा.. रादर आपण सगळेच करु.... या धाग्यावर अतिशय उत्क्रुष्ट चर्चा घडवुन आणण्यास मिपाकर समर्थ आहेत.. तुम्ही निश्चिंत रहा.. जस्ट वेट अँड वॉच!!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/08/2014 - 10:13 नवीन
उद्देश उत्तमच आहे धाग्याचा. मधुमेहाविषयी प्रबोधन आणि चर्चा होणं जरुरी आहेच. पण .. तरीही मला मधेच होमशॉप १८ पाहात / ऐकत असल्याचा फील का येतोय? की हेही शुगर वाढल्याचं लक्षण ? ;)
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 01/08/2014 - 16:13 नवीन
शुगर वाढल्याचं लक्षण आहे. ;)
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव Wed, 01/08/2014 - 18:35 नवीन
*lol* *lol* *lol*
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Wed, 01/08/2014 - 19:01 नवीन
धाग्याचा बाजार उठणार हे आधीच्या प्रतिक्रियेत जाणल होत :) आयला मधुमेह परवडला पण प्रतिक्रिया आवरा म्हणाव , आमच्या कडे म्हणतात गाढव मारताय ओझाने अं शिंगरू मरताय हेलपाट्यने !!!!
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 01/09/2014 - 08:31 नवीन
घोडी रे, घोडी !!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/10/2014 - 11:32 नवीन
Diabetics may soon not need to use injections for their insulin
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 01/18/2014 - 09:18 नवीन
आयुर्हित आपण स्वतः मधुमेहग्रस्त आहात का फक्त इतरांच्या मधुमेहाची काळजी जिकडेतिकडे घेता?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 01/19/2014 - 06:59 नवीन
उत्तरासाठी परत एकदा डायबेटिस अर्थात मधुमेह: लक्षणे, कारणे व उपाय या प्रतिसादातील ताजा कलम वाचावे. कृपया विषयांतर टाळावे व मुद्द्याचे प्रश्न ह्या लेखात विचारावे, ज्याने सर्वांना याचा फायदा होईल(असे प्रश्न व्यनि तूनच विचारावे)ही विनंती.
  • Log in or register to post comments
उ
उद्दाम Sun, 01/19/2014 - 07:06 नवीन
रक्त तपासणी साठी स्वस्तात मस्त शुगर स्ट्रिप मशीन कुठे उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 01/19/2014 - 08:02 नवीन
शक्यतोवर जवळच्या मेडीकल शॉप मधून घेणे. सोबत medicated cotton व spirit ही घ्यावे. मार्केट भाव माहिती साठी Ebay वर Accu check १३९९/- व १०० स्ट्रिप्स २४०/(with free door delivery.)
  • Log in or register to post comments
उ
उद्दाम Sun, 01/19/2014 - 08:11 नवीन
यांचा रेगुलर वापर करणारे लोक याची अ‍ॅक्युरसी किती यावर प्रकाश टाकू शकतील का?
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 01/19/2014 - 10:40 नवीन
क्षमा करा, मला वापरावे लागत नाही त्यामुळे अधिक माहिती देता येणार नाही. पण माझ्या मते अगदी ९५ ते ९९% accuracy असावी असा अंदाज आहे. यात calibration ची सोय नसावी. जर आपल्यात कोणाला मधुमेह असेल तर येणारे/असलेले अनुभव शेअर करावेत व आमच्या या धाग्याचा काही फायदा झाल्यास ते हि कळवावे हि विनंती. आपला मिपास्नेही : आयुर्हीत
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 52 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 4 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 6 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 8 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा