Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भ्रामक मायाजाल

म
मंदार कात्रे
गुरुवार, 01/02/2014 - 02:26
🗣 5 प्रतिसाद
नुकत्याच दोन बातम्या आल्या साध्वी प्रज्ञा यांच्या वरचे आरोप NIA मागे घेणार http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-12-28/india/45651589_1_joshi-murder-case-sunil-joshi-nia-clean-chit 2009 मडगाव स्फोट खटल्यातून सनातन साधकांची निर्दोष मुक्तता http://www.deccanherald.com/content/377725/court-acquits-sanatan-sanstha-members.html काही महिन्यापूर्वी झालेल्या दाभोळकर हत्येबाबतही सनातन वर भरपूर गरळ मीडियातून ओकण्यात आले ,परंतु आजतागायत एकाही सनातन कार्यकर्त्या विरुद्ध ठोस पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत , त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी पोलिसांनी केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणत्याही धार्मिक संघटनेचा हात या कृत्यात नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले होते . गुजरात मध्ये गोध्रा हत्याकांडांनंतर उसळलेल्या दंगलीत तेथील स्थानिक हिंदूंनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारास " अल्पसंख्यांका वरील हल्ले" ठरवून गेली 14 वर्षे हेच ढोंगी सेक्युलरवादी अन मीडिया ,नरेंद्र मोदींना "मौत का सौदागार " ठरवून ढोल बडवत आहेत . पण परवाच मोदींनाही क्लीन चिट मिळालेली आहे . शंकराचार्य प्रकरणातही त्यांच्यावर असलेले हत्येचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झालेले आहे . एकंदरीत सर्व प्रकरणांचा आढावा घेता ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया हे साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार करत असल्याचे लक्षात येते . दिग्गी भाऊनी आणि सुशील कुमारनी तर "भगवा आतंकवाद" वगैरे पर्यन्त मजल मारली होती.याचा अर्थ येनकेन प्रकारेण खोटेनाटे आरोप करून भगव्या संघटनांना / नेत्यांना "मारेकरी" ठरवून बदनाम करायचे आणि लांगूलचालन करून निवडणूकात मतांची पोळी भाजून घ्यायची ,असे साधे सोपे "व्होट-बँक पॉलिटिक्स " या सगळ्या प्रकारामागे आहे हेच सिद्ध होते . प्रश्न हा आहे की सामान्य जनता या ढोंगी सेक्युलरवादी आणि मीडिया यांनी फेकलेल्या भ्रामक मायाजालातून बाहेर पडून सामान्य जनता खरे मुद्दे काय आहेत ते समजून घेईल का ? आणि येत्या निवडणुकीत Good Governence आणि विकास हे मुद्दे सातत्याने लावून धरणार्‍या पक्षाला निवडून देईल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3360 views

🗣 चर्चा (5)
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 01/02/2014 - 04:50 नवीन
शेवटी CBI म्हणजे काय सरकारी पिंजर्‍यातील पोपट. सरकार म्हणेल तसे वागणार! हो ना?
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/02/2014 - 10:01 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
म
म्हैस गुरुवार, 01/02/2014 - 10:21 नवीन
सह्मत . गुजरात दंगलींबद्दल ओरड करणारे . ह्या दंगलींना घडलेल्या कारणाबद्दल मात्र बोलत नाहीत. तुम्ही हिंदूंना कोंडून जिवंत जाळून मारा पण त्यांनी त्याचा प्रतिकार करायचा नाही असं म्हणायचंय व्होट-बँक पॉलिटिक्स वाल्यांना
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे गुरुवार, 01/02/2014 - 14:14 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक गुरुवार, 01/02/2014 - 18:01 नवीन
नाही हो रेल्वे चे डबे हे परग्रह वासियांनी जाळले होते म्हणून तर त्या हत्याकांडा बद्दल ब्र पण काढला जात नाही !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा