Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

(प्रणयासक्ती)

म
मूकवाचक
Fri, 12/27/2013 - 20:34
🗣 21 प्रतिसाद
प्रणयासक्तांच्या प्रेमभावना आणि निसर्गदत्त वासनांप्रती पूर्ण आदर आहे.कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले. सॅडिझम, मेसोचिझम, कुंटणखाने, मनुष्य देह व्यापार, पेडोफिलिया असल्या सगळ्या विकृती आणि गरमी, परमा ते एच आय व्ही पर्यंतचे घातक आजार ते लोकसंख्येचा विस्फोट हे सगळे नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रणयाराधन मुळातून थांबले पाहिजे. मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाला बळी पडणारे भोळेभाळे रोमँटिक लोक शहाणे होतील तो सुदिन. किरकोळ केमिकल लोच्याच्या प्रभावाला मर्दानगी, पुरूषार्थ वगैरे समजणे किंवा मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करणे थांबले पाहिजे. साचेबद्ध प्रक्रिया न करता पुनरूत्पादन करता येण्याची सोय आधुनिक विज्ञानाने करून दिलेलीच आहे. ती प्रणयाराधनाला सशक्त पर्याय देणारी व्यवस्था ठरेल अशी सोय करता येईल का? बरे प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते? खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार. पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेच्या (मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे प्रणयासक्त लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.) टीपः अखंड मानवतेचे ब्रह्मचारी, समलिंगी, विषमलिंगी, तृतीयपंथी वगैरे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन होणे, आणि त्यांनी एकमेकांकडे तिरस्काराने बघणे हे सगळे प्रकार थांबवणे आपल्याच हातात नाही का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8982 views

🗣 चर्चा (21)
प
प्यारे१ Fri, 12/27/2013 - 20:43 नवीन
___/\___ केवळ उच्च! टीपेबद्दल म्हणाल तिथं पार्टी. =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/28/2013 - 06:23 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 12/28/2013 - 07:11 नवीन
हेच म्हणतो, बाकी वल्लीशेठ सहीचा अर्थ काय ओ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/28/2013 - 07:49 नवीन
बाकी वल्लीशेठ सहीचा अर्थ काय ओ?
उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राजा यांनी पृथ्वीचा भार समानपणे तोलून धरलाय. :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 12/28/2013 - 08:07 नवीन
मला वाटलं की सर्दीमुळे विद्या उदंड, मान चुकवत शिंकली तर मग अश्या विद्येला कोण पुसेल ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 12/27/2013 - 21:12 नवीन
पण नकोच. प्रणयाने मानवतेचं विभाजन झालय हे तुम्ही स्विकारत नाहि तोवर चर्चा संभवत नाहि.
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Fri, 12/27/2013 - 21:56 नवीन
जमलं नाही. कुंटणखाने, पेडोफिलिया, समलिंगीच्या समस्या वगैरे गोष्टी ट्रिविअलाइझ करून विनोद साधण्याइतक्या क्षुल्लक वाटत नाहीत. असो.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/28/2013 - 07:15 नवीन
दंडवत
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 12/28/2013 - 07:59 नवीन
लेखकाचे प्रणयाराधनाबद्दलचेच काय मत आहे हे कळले नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Sat, 12/28/2013 - 08:06 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 12/28/2013 - 11:13 नवीन
प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?> प्रणयाराधनापलिकडे तीनचार गोष्टी सहज सुचतात. - पुनरुत्पादनावर विश्वास - शरीराच्या आसक्तीवर विश्वास - शेकडो वेगवेगळ्या पद्धती - लग्नव्यवस्थेचं समर्थन. लई फ्येमस धागे
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 12/28/2013 - 18:35 नवीन
बरे प्रणयाराधनच नसेल तर माणूसपणाचे अन्य लक्षण कोणते?
- खाणे - श्वास घेणे - पिणे - संस्थळांवर विडंबनं करणे वा लोकांवर टीका करणे (अर्थात संस्थळीय राज्यघटनांनी या वर्तनाचा सुंभ जाळलेला असला तरी पीळ टिकून आहे) ;)
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/28/2013 - 18:54 नवीन
भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.
पटलेले नाही. संपूर्ण लेख हा सर्व मनुष्य जात हि भोळीभाळी आहे आणि डोक्यातील रासायनिक लोच्याच्या आहारी जाऊन प्रणय ह्या अपप्रवृत्तीकडे वळलेली आहे ह्या निष्कर्षावर आधारलेला आहे. आजिबात पटण्यासारखे नाही. एकूण काय तर माणसाने प्रणयामधली भावनिकता बाजूला सारून इतर सर्व प्राण्यांप्रमाणे विणीचा हंगाम आला कि पुनरुत्पादन करावे असे लेखकाला वाटते.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 12/28/2013 - 19:09 नवीन
एकूण काय तर माणसाने प्रणयामधली भावनिकता बाजूला सारून इतर सर्व प्राण्यांप्रमाणे विणीचा हंगाम आला कि पुनरुत्पादन करावे असे लेखकाला वाटते.
नै म्हणजे लोच्या एकच आहे की माणसाचा विणीचा हंगाम एकच एक असा नाही. त्यामुळे पुनरुत्पादन कधीही करू शकतो-करतो. लग्न झालेल्यांना यातल्या भावनिकतेवर आपलाच अग्रहक्क आहे असे वाटत असेल तर वाटो बापडे. खाऊंदे गरीब!
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Sat, 12/28/2013 - 20:59 नवीन
महाराज नमस्कार. हा धागा एका नाजुक विषयावर आहे, त्यानिमीत्ताने आपण विचार करुया. मला जरा जाणुन घ्यायचेय कि या धाग्याचे शीर्षक प्रणयासक्ती म्हणजे काय ? प्रणयासक्ती = .प्रणय + आसक्ती कि प्रणयासक्ती = .प्रणय + सक्ती ?? भोळेभाबड्या लोकानी कोणता अर्थ घ्यावा ? आता तुम्ही म्हणता तसे विचार करू.
पुनरूत्पादनाच्या सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला आणि पुढे काम हा पुरूषार्थ गणला जाण्यापर्यंत या भावनेचा प्रवास झाला. भोळ्याभाळ्या लोकांनी मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला मर्दानगी, स्त्रीत्व समजायला सुरूवात केली. काहींनी मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करायला सुरूवात केली. मात्र पुढे या प्रकाराला विकृत वळण लागले.
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ? ज्या नैसर्गिक सहजप्रेरणेतून प्रणयासक्तीचा उगम झाला तिला अन्गिकारणारे फक्त भोळेभाबडेच असतात का / होते का ?? हे कसे ?? त्यान्चा प्रणय हा नेहमीच गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद होता व असतो याला आधार कोणता ?? जसेच त्याला पुढे विकृत वळण लागले म्हणजे नक्की काय झाले ?? सरसकट सम्पुर्ण मनुष्यजात ही विकृतीयुक्त प्रणय करते असे तुम्हाला सुचवायचे आहे का कि आपण सगळे व आपले सगळे पूर्वज त्या विकृतीची उपज आहोत ?? सरसकट सम्पुर्ण मनुष्यजात ही फक्त विकृत प्रणय कशी काय करू शकते. हे अशक्य आहे. विकृत-प्रणयाची तुमची नक्की व्याख्या काय ?? विकृती ही कमी अधिक प्रमाणात प्रतेक गोष्टीत अस्तेच की.
सॅडिझम, मेसोचिझम, कुंटणखाने, मनुष्य देह व्यापार, पेडोफिलिया असल्या सगळ्या विकृती आणि गरमी, परमा ते एच आय व्ही पर्यंतचे घातक आजार ते लोकसंख्येचा विस्फोट हे सगळे नेस्तनाबूत करायचे असेल, तर प्रणयाराधन मुळातून थांबले पाहिजे.
प्रणयाराधन म्हणजे काय याबद्दल तुमचा गैरसमज झालेला दिसतोय, प्रणय म्हणजे सम्भोग नव्हे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे व समजुतीप्रमाणे जर तमाम मनुष्यजातीने जर 'प्रणयाराधन' थाम्बविले तर काय होइल यावर अधिक काय लिहावे. तुमचा हा उपाय म्हणजे रोगापेक्षा औषध भयन्कर असा प्रकार आहे. तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ??
मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाला बळी पडणारे भोळेभाळे रोमँटिक लोक शहाणे होतील तो सुदिन
म्हणजे फक्त भोळेभाळे लोकच काय ते रोमँटिक ??? बरे जे तुम्ही म्हणता तसे भोळेभाळे नाहीत ते कधीच रोमँटिक होउ शकत नाहीत का ?? वाचावे ते नवलच.
किरकोळ केमिकल लोच्याच्या प्रभावाला मर्दानगी, पुरूषार्थ वगैरे समजणे किंवा मातृत्वाची आस वगैरे उदात्तीकरण करणे थांबले पाहिजे.
किरकोळ केमिकल लोच्याचा प्रभाव म्हणजे काय हो ?? साचेबद्ध प्रक्रिया न करता पुनरूत्पादन करता येण्याची सोय आधुनिक विज्ञानाने करून दिलेलीच आहे. ती प्रणयाराधनाला सशक्त पर्याय देणारी व्यवस्था ठरेल अशी सोय करता येईल का? जे आपल्या आयुष्यात कधीही व कोणत्याही कारणाने प्रणय म्हणजे सम्भोग करू शकणार नाहीत, त्यान्च्या रान्गेत तमाम मानवजातीने का उभी रहावे ?? प्रणय हा फक्त आणि फक्त जीवाच्या पुनरूत्पादनाकरीताच करायचा असतो असे सन्स्कार तुमच्यावर झालेले दिसतात कीवा तशी तुमचीच समजूत दिसते. कितीही विज्ञान प्रगत झाले तरी मनुष्यनिर्मितिचा कारखाना निघणे केवळ अशक्य.
पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेच्या (मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे नव्हे) खर्या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे.
पुनरूत्पादनाच्या साध्यासुध्या नैसर्गिक प्रेरणेचे खरे रूप ते कोणते ??? जरा अधिक स्पष्ट केलेत आमच्यासारख्या लोकांना त्याचे आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. मर्दानगी, मातृत्वाची आस वगैरे प्रकाराचा आपल्याला एव्हढा तिटकारा का बरे ??
टीपः अखंड मानवतेचे ब्रह्मचारी, समलिंगी, विषमलिंगी, तृतीयपंथी वगैरे छोट्या छोट्या तुकड्यात विभाजन होणे, आणि त्यांनी एकमेकांकडे तिरस्काराने बघणे हे सगळे प्रकार थांबवणे आपल्याच हातात नाही का?
अहो कुणाच्या हातात काय असेल हे सान्गणे तसे जरा अवघडच, सरकारी अल्पसन्ख्यान्क आयोग आहेच कि तिकडे पहायला. अजुनही मला तुमचा नक्की प्रोब्लेम काय तो समजला नाही. आपला धागा वाचला काही विचार मनात आले म्हणुन ह प्रतिसाद. विनोद१८
  • Log in or register to post comments
P
pacificready Sat, 12/28/2013 - 22:27 नवीन
Now consider this to be a parody. Rgds,
  • Log in or register to post comments
ग
ग्रेटथिन्कर Sun, 12/29/2013 - 05:17 नवीन
you are confused btw copulation and romance
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/29/2013 - 06:05 नवीन
लेखाचे शिर्षक कंसात आहे... नाहितर लेखकाच्या विचारप्रक्रियेबद्दल संशय आला असता ! :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/29/2013 - 06:08 नवीन
हे राहिलंच की... (केवळ) त्या कंसामुळेच 'विचारपूर्वक इतकं असंबद्ध लिहू शकल्याचे' कौतूक वाटले ! :)
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 12/29/2013 - 07:26 नवीन
अहो, कुठलीच सक्ती नसावी, अगदी आसक्तीचीही. सक्तीने आसक्त तरी का व्हावे? आता नरप्राणी हे चित्रविचित्र आवाज करून आणि मादीप्राणी हे चित्रविचित्र पेहेराव, त्वचारंग इ. करून प्रणयासक्तीची सक्ती करतात, त्यांच्या विषयी आदर बाळगूनही, त्यांचे विचारपरिवर्तन व्हावे/होईल असे वाटते.! बाकी विडंबन फर्मास. जाता जाता : मिपावर विडंबन येणे ही मूळ लेखाच्या उच्चतेची खूण समजावी काय?
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 12/29/2013 - 08:48 नवीन
मेंदूतील काही रसायने आणि काही संप्रेरके यांच्या प्रभावाखाली घडणार्‍या या गतानुगतिक, ओंगळ आणि कष्टप्रद वर्तनाला ???????? तुमचा सूर औपहासिक आहे का? अन्यथा वरिल विधाने आक्षेपार्ह आहेत मूकवाचक साहेब !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा