गायत्री मंत्राचा सोपा अर्थ
बायकोच्या घरी चहा प्यायला म्हणून गेलो. चहा पीत असताना मेहुण्यांनी मध्येच एक बॉम्ब टाकला.
"गायत्री मंत्राचा अर्थ माहिती आहे का?"
चहा सगळा नाकातोंडातून बाहेर, एवढा जोराचा ठसका लागला. मनात म्हटले चहा पिताना गायत्री मंत्र नदीवरच्या भटाने देखील म्हटला नसेल तर यांना कुठून आठवण आली? नवीनच लग्न झालेले. त्यामुळे बायकोच्या घरी आपली इज्जत जायला नको म्हणून म्हटले पहिले मंत्र तरी आठवतोय का? लगेच मनातल्या मनात त्या मंत्राची उजळणी करून बघीतली.
तेवढ्यात मेहुणे रावांनीच खुलासा केला. "या प्रश्नचा उद्देश तुझे संस्कृत ज्ञान वगैरे तपासणे हा नसून सोप्या भाषेत त्या मंत्राचा अर्थ हवाय हा आहे."
"वा रे बच्चू! मनात एक तोंडी दुसरे काय?" मी विचारले, "अशी वेळ तुमच्यावर का यावी?"
उत्तर आले "आमचे चिरंजीव!"
मी संभ्रमात पडलो. यांचे चिरंजीव मला चांगलेच माहिती होते. वय वर्षे ४. अतिशय चिकित्सक. तूफान धुडगूस. पण संस्कार चांगले. वडिलांचा म्हणजे आमच्या मेहुणेरावांचा त्यांना धाक. मग अशा मुलाला काय पडले आहे या गायत्रीमंत्राच्या अर्थाचे?
तर पुढच्या उत्तराने शंकासमाधान झाले. "शाळेमध्ये यांना दररोज प्रार्थनेबरोबर गायत्री मंत्र म्हणायला लावतात. हा ते म्हणतो. परंतु गेले काही दिवस त्याने भुणभुण लावली आहे कि त्याचा अर्थ काय? मी नेट वर वगैरे शोधले परंतु त्याला समजावता येईल अशा सोप्या भाषेत तो काही मला सापडला नाही. "
हे एवढे ऐकून मी सुद्धा विचारात पडलो. संस्कृत चे ज्ञान आमचे यथातथाच. ९ वी १० वी ला जेवढे काही संस्कृत विषय शिकलो होतो तेवढेच. त्यामुळे खालील मंत्र मनात १० वेळा म्हटला परंतु तरीही त्यात सोप्या भाषेत समजावण्यासारखे काहीच दिसेना. एवढेच कळले कि सूर्याची प्रार्थना केलेली आहे.
ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
मग काही दिवस इकडे तिकडे हातपाय हलवल्यावर तसा अर्थ तर सापडला परंतु सोप्या भाषेमध्ये विशेषतः चिरंजीवांना समजेल असा कसा सांगणार?
मिपाकरांनी थोडीशी मदत केली तर खरच छान होईल. एका ४ वर्षाच्या मुलाला याचा अर्थ त्याला समजेल अशा सोप्या भाषेत कसा सांगणार? शब्दाची फोड करून जर जमले तर अजूनच छान म्हणजे या शब्दच अर्थ हा असे सांगता येइल.
🗣 चर्चा
(73)
आ
आनन्दा
गुरुवार, 12/26/2013 - 07:28
नवीन
गायत्री छन्दाचे अनेक प्रकार आहेत त्यातील हा एक.. हा गायत्रे छंदाचे काही नियम पाळत नाही असा सूर दिसला.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 12/25/2013 - 08:49
नवीन
ही माहीती विकी वर मिळाली
Gayatri: 3 padas of 8 syllables containing 24 syllables in each stanza.
Ushnuk : 4 padas of 7 syllables containing 28 syllables in each stanza.
Anustubh: 4 padas of 8 syllables containing 32 syllables in each stanza.
Brihati : 4 padas (8 + 8 + 12 + 8) containing 36 syllables in each stanza.
Pankti : 4 padas (sometimes 5 padas) containing 40 syllables in each stanza.
Tristubh: 4 padas of 11 syllables containing 44 syllabes in each stanza
Jagati: 4 padas of 12 syllables containing 48 syllables in each stanza
There are several others such as:
Virāj: 4 padas of 10 syllables
Kakubh
असो...
(अवांतर : आपल्या भाषेबद्दल आपल्याच माहीती नाही , संस्कृत छंदांबद्दल इंग्लिशमशुन माहीती मिळवावी लागतीये :( स्वतःच्या कर्मदरिद्रीपणाबद्दल स्वतःचीच खंत वाटली :(
छ्या:राव , हे काही बरोबर नाही आपल्याच माहीत नाही , पुढच्या जनरेशन्स ना कसे कळणार ? शिवाय हे उष्णता बिष्णता वादी लोक आधीच वैदीक संस्कृतीची वाट लावायचे काम जोमाने करत आहेतच :( )
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
गुरुवार, 12/26/2013 - 07:53
नवीन
मला शिकविलेला गायत्री मन्त्र अजुन मोठा आहे
ॐ भू: भुव: स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम
ॐ तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ आपो ज्योति रसो अमृतम्
ब्रह्म भुर्भुवस्वरोम्
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/26/2013 - 19:42
नवीन
@मला शिकविलेला गायत्री मन्त्र अजुन मोठा आहे >>> =)) नाही नाही.. तसे नाही..
गायत्रीमंन्त्र हा ॐ तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढाच आहे. त्या अधी असलेल्या ॐ भू: भुव: स्वः, ॐ महा:, ॐ जनः ॐ तपः, सत्यम या व्याहृती आहेत. त्या फक्त प्राणायाम पूर्व म्हणतात. आणी ॐ आपो ज्योति रसो अमृतम्
ब्रह्म भुर्भुवस्वरोम् ही शेवटची ओळ म्हणत असताना,दोन्ही कानांच्या पाळ्यांन्ना उजव्या हताने स्पर्श करतात. त्यासाठी ती ओळ आहे. गायत्रीमंन्त्राचा जप(१/१०/२८/१०८) करताना फक्त ॐ तत्सवितुर्वरेण्यं ।
भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥ एव्हढाच आणी एव्हढाच मंत्र म्हणायचा असतो.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 19:52
नवीन
यग्जाक्टलि. सोनाराने कान टोचले हे उत्तम झाले.
जर तो मंत्र मोठा असता तर पहिली गोष्ट म्हणजे गायत्री नामक छंदातच बसला नसता ;)
शिवाय योग्य तितकी उष्णतादेखील पैदा झाली नसती हेवेसांनल ;)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 12/26/2013 - 20:03
नवीन
फ्रीझमधे ठेवलेली अंडी देखील उकडली हा धागा वाचता वाचता =))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 20:12
नवीन
=)) अंडी उकडली अपैशी | मिळता गायत्रीयोगे उष्णतेसी ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/26/2013 - 20:45
नवीन
फ्रीजावर गायत्री मंत्राचा स्टीकर लावला की त्याचा ओव्हन होतो. ;)
ते स्टीकर छापताना सुध्दा हात भाजतात म्हणून आम्ही छापत नै :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 20:59
नवीन
अगागागागागागा =))
तरीच भारतात "शुद्ध" संस्कृतवाले सगळे दक्षिणेला आहेत! गायत्रीपठणाने कायम उष्णता वाढून वाढून काळे ठिक्कर पडलेत भौतेक =))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/26/2013 - 21:05
नवीन
ती उष्णता पास व्ह्यायसाठी ओन्ली लुंगी ना?
आणि नॉर्थवाले ते श्लोक उपरण्यावर छापून त्यासाठीच पांघरतेत. गायत्री थर्मल वेअर भौतेक. :)
च्यायला नियम सिध्द होतोय राव ब्याट्या :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 21:13
नवीन
आयला खर्रंच की बे =))
लै थंडी वाजायलीय राव, जरा गायत्रीपठण करतो ;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 22:09
नवीन
गायत्रीमंत्राबद्दल अत्यंत हीन शेरेबाजीचा तीव्र निषेध!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 22:31
नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 22:46
नवीन
पोचल्या. :)
- Log in or register to post comments
म
म्हैस
गुरुवार, 12/26/2013 - 08:01
नवीन
ह्याचं खरं कारण असं अहे कि कुठल्याही मंत्राचा जप हा स्वताच्या मानाने हवा तसा करता येत नहि. त्यासाठी मंत्रदीक्षा घ्यावी लागते (नामस्मरण कुठेही कसही केला तरी चालतं ). गायत्री हा तर मंत्रांचा राजा आहे . वयाच्या ८ व्या वर्षी मुंज करताना गुरु त्या मुलाच्या कानामध्ये गायत्री मंत्राची दीक्षा देतात आणि मगच गायत्री मंत्र जप करण्याची परवानगी मिळते . पूर्वीच्या काळी स्त्रियांची मुंज होत नसल्यामुळे त्या जप करू शकत नवत्या . पण ह्याचा अर्थ असा नव्हे कि त्यांना मंत्र जपण्याची परवानगी नाही वगेरे . स्त्री - पुरुष दोघेही मंत्र दीक्षा घेवू शकतात .
मला वाटत ४-५ वर्षाच्या मुलांना गायत्री मंत्र जपायला सांगणे चूक आहे कारण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा उच्चार . गायत्री मंत्रामध्ये २४ बीजमंत्र अहेत. मंत्राने उष्णता वाढते , कुंडलिनी जागृत होते वगेरे हे सगळा बरोबर अहे. त्यामुळे चुकीचा उच्चाराने वेगळेच परिणाम होण्याचा धोका आहे .
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 08:15
नवीन
पूर्वीच्या काळी स्त्रियांना उपनयनाचा अधिकार होता. त्यामुळे स्त्रिया गायत्री मंत्र जपू शकत असत. पुढे तो राहिला नाही.
आणि मंत्राने उष्णता वाढते वगैरे सगळे बिनडोकांचे पोरखेळ आहेत. विदा द्या मग बोलू.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 12/26/2013 - 09:19
नवीन
>>>बिनडोकांचे पोरखेळ आहेत. विदा द्या मग बोलू.
असला काय होत नाय म्हनून कुनाकुनाला सांगनार?
सोरून दे ना रं बाला. बिनडोकांच्या नादाला कं लागतंस?
-प्यारे भोईर
(हलके घ्या)
- Log in or register to post comments
म
म्हैस
गुरुवार, 12/26/2013 - 08:04
नवीन
गायत्री छंद वेगळा आणि गायत्री मंत्र वेगळा .
- Log in or register to post comments
म
मनिम्याऊ
गुरुवार, 12/26/2013 - 08:30
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
अ
अव्यक्त
गुरुवार, 12/26/2013 - 10:07
नवीन
फक्त "स्वर्गोम्हरे" याचा अर्थ नीटसा कळला नाही. थोडी फोडाफोडी कराल का? संधीची हो!
"स्वर्गोम्हरे"
स्वर्गोम्हरे = स्वर्ग + ॐ + हरे
- Log in or register to post comments
म
म्हैस
गुरुवार, 12/26/2013 - 13:27
नवीन
अति शहाण्यांनी बिन्डोकांच्या नादाला कशाला लागायचं?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 12/26/2013 - 13:37
नवीन
( अवांतर :अतिशाहणा त्याचा बैल रिकामा अशी म्हण आहे , रेडा रिकामा अशी नाही , पण आजकालच्या LGBT पुरक वातावरणात म्हशीला बैलाचीही भिती वाटणे स्वाभाविक आहे :D )
- Log in or register to post comments
प
प्रफुल्ल पा
Sat, 12/28/2013 - 10:43
नवीन
ओम देहे प्रअने मने,
व् र निय जे सवि त्याचे
तेज देवाचे ध्याउया
प्रे रो बुधिस आमुच्या
-विनोब भवे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2