पाकातले चिरोटे
साहित्य: तीन मोठ्या वाट्या मैदा, सहा ते सात टीस्पून्स साजुक तूप/डालडा,तीन टेबलस्पून्स् तांदूळ पिठी , कक्ष तापमानाचे पाणी, चवीपुरते मीठ, दीड मोठ्या वाट्या साखर, वेलदोडा पूड, केशर, आवडत असल्यास केशरी रंग, लिंबूरस, सजावटीसाठी उपलब्ध असलेले नट्स, तळणीसाठी तेल.
कृती: प्रथम परातीत साडेतीन टीस्पून्स तूप कणी मोडेपर्यंत हाताने फेसावे. मीठ घालून फेसावे. त्यात मोजलेला मैदा घालून त्यास तूप चोळावे. मुटका वळता आला पाहिजे असे मिश्रण झाले म्हणजे थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेइतपत घट्ट भिजवावे. हा मैद्याचा गोळा झाकून ठेवावा. त्याच परातीत राहिलेल्या तुपाची कणी फेसून मोडावी व तांदळाची पिठी घालून साटा तयार करावा. तो एका वाटीत काढून ठेवावा.
भिजवलेल्या मैद्याचे सहा सारखे भाग करून घ्यावेत. तीन गोळ्यांच्या तीन पातळ पोळ्या लाटाव्यात. एका पोळीला साटा लावून त्यावर दुसरी पोळी पसरावी. त्यावरही साटा लावावा. आता त्यावर तिसरी पोळी पसरून त्यावर साटा लावावा. असे झाल्यावर त्याची वळकटी करावी. अशीच वळकटी उरलेल्या तीन गोळ्यांची करून घ्यावी. आता सुरीने वळकटीचे एक पेर रुंदीचे तुकडे करावेत. पोळपाटावर प्रत्येक तुकडा ठेवून हलक्या हाताने थोडा थोडा चौकोनी लाटावा. तेल तापल्यावर आच मध्यम करावी व एकावेळी एकेक चिरोटा त्यात सोडावा. झार्याने हलकेच उलटून गुलाबी रंगावर तळावा. तळणीतच पापड भाजयच्या चिमट्यात चिरोटा उभा धरून डावाने त्यावर तेल ओतल्यास नीट तळला जातो. असे सर्व चिरोटे चाळणीत निथळण्यास ठेवावेत.
एका पातेलीत दीड वाट्या साखर व पाऊण वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावे. एकतारी पाक होत आला की त्यात केशर काड्या, हवा असल्यास केशरी रंग, वेलदोडा पूड, लिंबूरस घालावा. पाकाचे पातेले उतरवून त्यात एकेक चिरोटा चिमट्यात धरावा व डावाने पाक त्यावर ओतावा. चाळणीत निथळण्यास ठेवावा. असे सर्व चिरोटे करून झाले की त्यावर बदाम, पिस्ते, काजू यांचे तुकडे पसरावेत.
टिपा: १) साट्याचे सहा भाग करून ठेवावेत.
२) सर्व पोळ्या, वळकट्या व तुकडे स्वच्छ, ओल्या फडक्याने झाकून ठेवावेत.
३)वरील पद्धतीने चिरोटे बेताचे गोड होतात पण ज्यांना ते जास्त गोडीचे हवे असतील त्यांनी थोडा वेळ पाकात राहू द्यावेत व नंतर निथळण्यास बाहेर काढून ठेवावेत.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments