Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

घाबरगुंडी

ऋ — ऋषिकेश, गुरुवार, 08/08/2013 - 12:12
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला? माझं करियर, माझे मार्क हरवले तर! समोरून 'प.पू.' आले तावातावात बोलू लागले अमुक विद्या, तमुक मंत्र वक्री ग्रह, चक्री तंत्र मला आहे शक्ती फार क्षणात तुजला बसेल मार माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो मठात पाकीट टेकवून आलो उगाच कशाला? त्यांच्या शापाने शांतता हरवली तर! समोरून बुवा आले तावातावात बोलू लागले बाबा-भोंदू थापा फार प.पू. नुसता फुसका बार देवात आहे ताकद खरी त्याच्याशी सलगी बरी माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो देवळात पावती फाडून आलो उगाच कशाला? देवाचा कोप झाला तर! समोरून तज्ज्ञ आले तावातावात बोलू लागले आली मंदी बुडेल धंदा अर्थव्यवस्थेचा वांदा येईल साठी जवळ जेव्हा वणवण करत राहशील तेव्हा माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो 'स्कीम'चा चेक फाडून आलो उगाच कशाला? म्हातारपणी पैसे संपले तर! समोर निवांत मित्र आला मला मग ताव चढला धर्म भाषा शिक्षण पैसा सारे काही धोक्यात आहे हे कर ते कर सारे काही नाहीतर काही खरे नाही त्याची उडाली घाबरगुंडी तो मग तडक गेला मनात भिती भरून बसला मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं! साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2531 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण गुरुवार, 08/08/2013 - 12:45 नवीन
समोरुन पाकडे आले आपल्या सैनिकांना ठार केले संसद, चॅनल , वर्तमानपत्र सर्वत्र फक्त चर्चाच आहे ह्यांचा हात म्हणे त्यांच्या बरोबर आहे लष्कराचे निवेदन अन् मंत्राचे निविदेत यात तफावत कशी काय आहे ? हा नक्क्की कसला विरोधाभास ? मी उद्विग्न झालो...पाकड्यांच्या नावाने बोटे मोडु लागलो. सगळेच म्हणतात त्यांना आपण बघुन घेउ,हे तर दरवेळच ठराविक उत्तर आहे !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 08/08/2013 - 12:49 नवीन
कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 08/08/2013 - 15:10 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 08/09/2013 - 18:44 नवीन
वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 08/10/2013 - 09:15 नवीन
आहे खरं असं - कळपात सामील होणारेच कळप वाढवायच्या मागे लागतात.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 08/10/2013 - 13:13 नवीन
कविता भयंकर आवडली.
मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं
ऐवजी "मोकळं कोकरू कळपात आलं.... मग मी नवे कोकरु शोधु लागलो" हे वस्तुस्थिती धरुन झाले असते. ड्रॅकुलाला घाबरणार्‍या माणसाचा जेव्हा ड्रॅकुला होतो तेव्हा इतरांना ड्रॅकुला बनवण्यासाठी तो धडपडु लागतो
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 08/10/2013 - 16:47 नवीन
असा अचानक समोर आरसा धरू नये रे! भीती वाटते!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/11/2013 - 16:52 नवीन
राईट्ट्ट एकदम. मस्तच
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 08/11/2013 - 17:26 नवीन
वाहवा... छान.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/14/2013 - 05:34 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे, प्रोत्साहकांचे आभार! गेले काही दिवस हाफिसातून मिपा अ‍ॅक्सेस होत नसल्याने प्रतिसाद देणे राहत होते. उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 08/14/2013 - 16:58 नवीन
कविता छानच आहे, पण आत्मस्थिती असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/14/2013 - 17:03 नवीन
मस्तच... :) जे न देखे रवि मध्ये प्रतिसाद द्यायची वेळ क्वचित येते..... ___/\__
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 08/16/2013 - 10:29 नवीन
सलाम!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा