Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शत'शब्द शोधिताना...!

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 08/07/2013 - 12:25
शतशब्द कथा हा प्रकार सध्या वेगात प्रचलीत होत आहे.मी ही प्रयत्न करायला गेलो.पण छ्छे! मग माझं मन म्हणालं मला--आत्मू..तुझा प्रांत नाही रे हा.आपला वकूब ओळख मेल्या! पण तरिही ते ऐकेल तर माझं मन कसलं? सलग दोन रात्री मेंदूबरोबर हुतुतू खेळून सुद्धा,हाती काही लागलं नाही.मग मन म्हणालं,तू सावरकरनिष्ठ ना? मग त्यांचे काव्य वाच,स्फूर्ती येइल.अरे अगीचे भस्म आणी राखेचाही अंगार करणारा माणूस तो! त्याच्या शब्द स्पर्शाने तुझा मेंदू चेतणार नाही काय? आणी खरच मेंदू चेतला,पण कुठे? तर काव्याच्याच प्रांतात."कथा" या प्रांतातली "गती" दाखवून,एक खराखुरा "मोक्ष" दिला त्या स्पर्शानी मला! ======================================================== शत'शब्द शोधिताना शत रात्री व्यर्थ गेल्या कथिता तुला व्यथा ही त्या रात्री धन्य झाल्या! खर्ची पडे वह्यांची एक थप्पी एका पाठी कशी साधना तुझी ही हातात अंती "वाटी" हाय हाय..जमे न काही ठेव पाने तू मिटोनी प्रतिभा नभातं गेली घरट्यातूनी उडोनी!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6550 views

💬 प्रतिसाद
म
मदनबाण Wed, 08/07/2013 - 13:07 नवीन
शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या | शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या || तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी | सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी || हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी | क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी || कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/07/2013 - 13:13 नवीन
हायला... मूळ काव्य "सांगायचं" र्‍हायलं :( माफी असावी हो! :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 08/12/2013 - 19:36 नवीन
वाचता वाचताच वसंतखाँच्या आवाजात ह्या ओळी ऐकू यायला लागल्या राव. :) ठ्यांक्यु मदनवा :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/07/2013 - 13:26 नवीन
ह्या धाग्यातली मेख ओळखणार्‍याला माझ्याकडून येक बक्षिस.. ;) वळखा..वळखा..बरं!!! :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 08/07/2013 - 16:34 नवीन
तुमचा "शत शब्द अनुभव" आवडला बर्का! काव्य झक्कास! या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! एवढे बोलून मी माझे २४ शब्द संपवते.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Wed, 08/07/2013 - 17:19 नवीन
या निमित्ताने एका सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 08/14/2013 - 14:27 नवीन
" शतशब्द अनुभव".. ;-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/15/2013 - 19:20 नवीन
दोन..! ;)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 08/07/2013 - 13:34 नवीन
मला तर बुवा एक ओळ पटकन सुचली. शत लुब्ध शीधताना फिल्डिंग व्यर्थ गेल्या शत लेख काव्य माला किती त्वदर्थ लिहिल्या हाय हाय करू मी काय ही सांज गे उदास चिती चितारलेल्या स्माईली उडून गेल्या
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/07/2013 - 13:34 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/07/2013 - 16:43 नवीन
छान प्रयत्न आहे ! जागलेल्या रात्रींचे चीज झाले ! चिती चितारलेल्या स्माईली उडून गेल्या हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे ! +D
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 08/07/2013 - 18:01 नवीन
हे मात्र आत्माबुवांना चपखल लागू आहे! +११११११
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 08/09/2013 - 08:44 नवीन
हेच म्हण्णार होतो, एकदम चपखल =))
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 08/09/2013 - 12:17 नवीन
हम्म लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत. फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.;-) गुरजी तुस्सी ग्रेट हो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 08/09/2013 - 13:48 नवीन
लै जणांच्या रात्र रात्र जागलेल्या अन चितार्लेल्या स्मायल्या उडून जातेत.
हा हा हा =))
फ़क्त गुरजी बिनधास्त कबूल करतेत.
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 08/09/2013 - 09:42 नवीन
शतशब्दकाव्य आहे की काय असं वाटलं आधी :-)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 08/09/2013 - 13:33 नवीन
यस्स! आत्मुस तुस्सी ग्रेट हो।
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/09/2013 - 14:11 नवीन
वाचकांना एक विनंती- हे सावरकरांच्या काव्याचे विडंबन नाही. फक्त रचनेचे आधारभूत प्रतीरूप आहे. :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 08/09/2013 - 16:14 नवीन
विडंबनात मूळ काव्याची चेष्टा नसतेच. खरे तर त्याचा फॉर्म विडबन कर्त्याने स्वीकारला यात मूळ काव्याचा सन्मानच होतो.
  • Log in or register to post comments
व
वेणू Mon, 08/12/2013 - 05:43 नवीन
प्रयोग आवडला रे...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/12/2013 - 19:16 नवीन
सर्वांचे आभार..! :)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 08/12/2013 - 19:37 नवीन
अपितु सहजीचि म्हणोनी धागा उघडुनि पाहो तो आपुली काव्यशलाका आमुचिये मनास स्पर्शून गेली असे ऐसे लिहावयासि मात्र मिपामाजी आज प्रवेशकर्ता झालो आहो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा