या साध्या घरात माझ्या
या घरात माझ्या, काही न आलिशान
साधेच खोपटाचे, सारवलेले छान ll १ ll
नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले
निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll
नाहीत भिंती भक्कम, घुमणे वाऱ्याचे चाले
निवारा नसता किडा-मुंगी, त्यास आपले समजलेले ll ३ ll
पावसाळ्यात बरसुनी तो, घरास नाहवून जातो
उन्हाळ्यात तोही घरास, असा तावून सुलाखून जातो ll ४ ll
बैठेच स्वयंपाक चाले, नाही सोयी नव्या पूर्ण
चुलीवर भाजलेले, आगळेच अन्न ब्रह्मपूर्ण ll ५ ll
नाहीत विजेऱ्या दिवे, रात्रीस किर्र अंधार असतो
देवाजवळ मिणमिणणारा, हर कोपरा उजाळत असतो ll ६ ll
नाही फार बगीचा, नाही फार वनश्री ती
मोजकीच फुले अन्, तुळस वृंदावनी ती ll ७ ll
इतरांसारखे नसेल टुमदार, मला फिकीर ना त्याची
आसरा निवारा घ्याया, ती माझी वास्तू हक्काची ll ८ ll
या साध्या घरात माझ्या, काहीच ना चीजवस्तू
समाधान इतुकेच कि, देव म्हणे तथास्तु ll ९ ll
- सार्थबोध
💬 प्रतिसाद
म
मदनबाण
Mon, 08/05/2013 - 06:32
नवीन
सुंदर ! :)
नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले
निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll
केवळ अप्रतिम ! :)
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 08/12/2013 - 16:06
नवीन
+१
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Mon, 08/05/2013 - 06:41
नवीन
वाह!! प्रत्येक कडवं सुंदर आहे.
प्रत्येकाच्या मनात स्वत:चं असं एखाद घर असावं अशी सुप्त इच्छा असते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/05/2013 - 07:26
नवीन
सुख "पाहिजे आहे ते मिळण्यात" नसून "मिळाले आहे ते पाहिजे असण्यात" आहे !
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Tue, 08/06/2013 - 12:32
नवीन
इतरांसारखे नसेल टुमदार, मला फिकीर ना त्याची
आसरा निवारा घ्याया, ती माझी वास्तू हक्काची ll ८
खुपच छान..!
- Log in or register to post comments
S
sanjivanik१
Tue, 08/06/2013 - 17:42
नवीन
अप्रतिम शब्द रचना , त्याही पेक्षा अप्रतिम अर्थ
- Log in or register to post comments
व
वेणू
Mon, 08/12/2013 - 05:53
नवीन
किती खास लिहीलंय...
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 08/12/2013 - 15:58
नवीन
साध्या शब्दात साध्या घराचं वर्णन!
- Log in or register to post comments