Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!

अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 07/26/2013 - 21:11
💬 29 प्रतिसाद

Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!

  • ‹ फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
  • Up
  • फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल! ›
आज मी आपल्या समोर सादर करणार आहे-फुलांच्या रांगोळ्या कश्या काढाव्या? याच्या काहि व्हिडिओ क्लिपिंग्ज आणी माहिती.होतं काय,की खूपजण ह्या रांगोळ्या बघतात.त्यांना त्या अवडतात,आणी ''गुर्जी आंम्हाला पण थोडं शिकवा की टेक्निक!'' अशी विचारणा सुरू होते. मग मी असा विचार केला की इथे मिपावरपण मी माझ्या फुलांच्या रांगोळ्या दाखवल्या आहेत. http://misalpav.com/node/23831 आणी त्यातंही "रांगोळ्यांच्या" तांत्रिकतेबद्दल,अगदी माफक का होइ ना...पण,चर्चा/विचारणा झाल्या होत्याच म्हणूनच त्याचा पुढचा टप्पा किंबहूना त्या अधिचाच टप्पा म्हणून काहि मूलभूत तंत्र आज इथे सांगत आहे.कारण या रांगोळ्या काढण्यात तंत्राशिवाय ज्या गोष्टिंची गरज असते,अश्या गोष्टी म्हणजे अंगभूत कला/आवड(हौस नव्हे!)/रंगसंगतीचं उपजत ज्ञान/संयम आणी सगळ्यात महत्वाची-चिकाटी! बास्स...,या सर्व गोष्टी ज्याच्याकडे मुळातच आहेत, त्यानी यातली तंत्र शिकली,की तो यातला माश्टर झालाच! फुलांच्या रांगोळ्यांमधे या रांगोळ्या आकर्षक/सुबक/प्रमाणबद्ध होण्याकरिता फुलांच्या कटिंगची काहि तंत्र आहेत,त्याचप्रमाणे फुलं कुठनं?कशी?किती घ्यावीत? ही पुढे पुढे आपोआप उमजणारी तंत्र आहेत. शहरांमधे छोट्या-फुलविक्रेत्यांकडून फुलं घेऊ नयेत.ते सर्वच दृष्टिनी नुकसानकारक होतं.फुलांचं,मोठ्ठं घाऊकविक्रिचं ठिकाण शोधावं,जसे की पुण्यामधे गुलटेकडीचं-मार्केटयार्ड,म्हणजे आमची फुलांची महामंडई! http://misalpav.com/node/20666 अश्या ठिकाणी फुलं घेण्याचा फायदा म्हणजे,प्रत/विपुलता/वैविध्य(कॉलिटी/काँटिटी/व्हरायटी) या फुलांच्या रांगोळीसाठी अत्यावश्यक अशा गोष्टी या ठिकाणी मिळतात.

चला तर मग...

अता आज आपण पाहू,
फुलांच्या कटींगची २ तंत्र आणी १ रांगोळीचं छोटं प्रात्याक्षिक
दाखवणार्‍या व्हिडिओ क्लिप... १)लिलिच्या फुलांची कापण्याची पद्धत... ==================================== २)झेंडुच्या पाकळ्यां काढण्याची(विशिष्ट) पद्धत... ==================================== ३)लिलिचं कमळ किंवा गोलावा(प्रात्याक्षिक...) ==================================== क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 21717 views

💬 प्रतिसाद (29)
आ
आदूबाळ Sat, 07/27/2013 - 08:27 नवीन
क्रमशः
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Sat, 07/27/2013 - 08:35 नवीन
भारीच आहे..पाऊस संपल्यावर एक एक ट्राय करेन..तोपर्यंत तुम्ही क्रमशः शिकवा... :)
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 07/27/2013 - 08:57 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/27/2013 - 09:02 नवीन
माझ्या संगणकावर चलचित्र (व्हिडिओ) दिसत नाहीएत. कोणीतरी मदत करा की रे! पूर्वी चालायचे, आता माहित नाही काय झालय.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/27/2013 - 09:24 नवीन
झालं सुरु एकदाचं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/27/2013 - 15:43 नवीन
श्री. पेठकर काका, तुमचा पीशी पण गुर्जींच्या फुलांनेच व्हिडीऑ दाखवतो बहुतेक. आता एक फुलांच्या रांगोळी चे चित्र कायमचे वॉलपेपर म्हणून ठेवा. व्हिडीओ कायम दिसतील. :) गुर्जी कळली ब्वा तुमच्या कलेची पावर. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/27/2013 - 22:24 नवीन
ही:..ही:..ही:.. खरं आहे. तसंही 'इतर' व्हिडिओ पाहायचा शौक नाही. (म्हणजे आता उरला नाही).
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Sat, 07/27/2013 - 09:12 नवीन
आत्माराम धन्स.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/27/2013 - 09:21 नवीन
अरे वा! सुरेख! शिकवणी का? आम्ही मागल्या बेंचवरचे अडाणी विद्यार्थी आहोत :) शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/27/2013 - 11:01 नवीन
@शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत >>> नाय नाय नाय...असं व्हनार नाय...तुम्ही व्हिडिओ क्लिप्स पहा आणी ऐका...फुलांची कटिंग करता करता त्याबद्दलचं सर्व काही सांगितलं आहे... त्यामुळे पहा व ऐका...अगदी सहज जमेल,अवड असेल त्याला-त्यात अवघड असं काहिही नाही...!!! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/27/2013 - 11:19 नवीन
ओके :) नक्की प्रयत्न करुन पाहीन.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 07/27/2013 - 11:10 नवीन
अरे वा. छानच. हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/27/2013 - 11:18 नवीन
@हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?>>> होय..पण तो मिपा-लसीकरण मोहिमेत उडाला होता! :( तेच काल लक्षात आलं,म्हणून पुन्हा टाकला! :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 07/27/2013 - 12:35 नवीन
या गणपतीत नक्की प्रयत्न करणार!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/27/2013 - 14:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/27/2013 - 15:46 नवीन
ब्येस्ट गुर्जी. अप्रतिम कला हाये तुमच्या हातात. बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? ;) हिथे पिवळ्या फुलांना पिवळी कात्री दिसतेय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/27/2013 - 17:15 नवीन
@बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? >>> =)) कात्रीचं उत्तर-रात्री देणार होतो,पण अत्ताच देतो. ;-) रंग कोणताही असला तरी ब्लेड तेच असतं! :P
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 07/27/2013 - 18:22 नवीन
साला...काय कला आहे बुवा तुमच्या हातात! बेष्ट बेष्ट! :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sat, 07/27/2013 - 18:35 नवीन
अतिशय सुंदर
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sat, 07/27/2013 - 18:37 नवीन
मस्त हो बुवा.... :) एकदम झक्क्कास...
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sat, 07/27/2013 - 19:48 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 07/27/2013 - 22:49 नवीन
आवडली रांगोळी. एक शंका आहे. हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/28/2013 - 05:05 नवीन
@ हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?>>> पुढच्या/पुढच्या भागात हे सगळं सविस्तर येणार आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 07/28/2013 - 06:03 नवीन
ठिक आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Sun, 07/28/2013 - 12:51 नवीन
ईथे हापिसात काय तु नळि दिसत नाय.....दुसरा काय तो उपाय सांगा! (गुर्जिंचा आ धारक विद्यार्थि) हा शिंचा ‘Nya’ कसा लिहायचा?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 07/28/2013 - 12:55 नवीन
dnya=ज्ञ
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 07/28/2013 - 12:57 नवीन
छ्या!! हे विडिओ काही दिसत नाहियेत हापिसातनं. प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/02/2013 - 16:31 नवीन
@प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? smiley>>> पुण्याला आल्यास लावतो... ! Image removed.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 08/02/2013 - 17:14 नवीन
मस्त हो बुवा!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा