Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एक प्रेमपत्र लिहले होते

व — वैभव कुलकर्नि, Fri, 07/26/2013 - 13:27
एक प्रेमपत्र लिहले होते,शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. संदभ्र होते तिचे नि माझे आणि ईंद्रधनुचे सप्तरंग होते त्यात सात लिहताना काने-मात्रे एकसलग येत नव्हते, हाथ थोडा थरथरत होता नि तुझे नाव कोरले कि डावा डोळा नुसता फरफरत होता..... मध्येच एखादा अश्रू ठीबकात , माझ्या नावाला पुसायचा प्रयत्न करत होता तर कोरलेला तो बाण ह्रधयाभोवती कसला तरी यज्ञ करत होता. लिहता- लिहता हात थकला पण अक्षरे थांबायला तयार नव्हती नि पत्रातुनी बाहेर पडत तू फिरत होतीस माझ्या अवतीभोवती ........एक प्रेमपत्र लिहले होते , शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. परत -परत मी कोरत होतो , माझ्या ह्रधयाभोवती तुझा बाण नि काही संदभ्र असेही होते "चातकाची ती व्याकुळता नि पाण्यासाठी तहान" बरीच कळकळ दडली होती जरी काही शब्द होते लहान पत्रातुनी तुला ध्वनीही ऐकु येतील, थोडे पत्राला लाऊन तरी बघ कान प्रत्येक शब्दात गोडवा होता कारण त्यालाही होती साखरेची जान हे पत्र वाचल्यानंतर 'हो', 'नको' चे संकेत देईल नक्की तुझी मान ........एक प्रेमपत्र लिहले होते , शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. प्रत्येक मुद्दा वेगळा होता नि प्रत्येकाची वेगळी होती शान त्याच्याच खाली कोरले होते , 'तुझे'-'माझे' नाव नि वरती पिंपळाचे पान. कुठले संदर्भ गुलाबी नि कुठले रीकामे ठेवायचे याचे ठेवले होते मी भान नि पहिल्या समासात निळी मोरपीसे मी ठेवली होती छान. अधून मधून एखादी चारोळी लिहीत , मी ठेवला होता तीचा मान तिच्या नावाच्या अनुस्वारावर एक दवबिंदु ठेवला होता लहान ........एक प्रेमपत्र लिहले होते , शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. थोड लिहाल होत तिच्या बोलण्यावर, थोड तिच्या वागण्यावर तीच्या वेनीलाही विशीष्ठ रकान्यात ठेवलं होत, लिहाल होत तिच्या गजरा घालण्यावर असाही त्यात लिहाल होत , नात्याला काही नावच नसत ..... सगळ असत फक्त मानण्यावर शेवटच्या २ ओळी फार चं लिहिल्या होत्या..... शरीराला प्राणाची कीमत तेव्हाच कळते जेव्हा ते असत कुठे टांगल्यावर विलीन हो या प्रेमपत्रात नि बघ काय होत .. कोणी कोणाच्या काळजात शीरल्यावर ........एक प्रेमपत्र लिहले होते , शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1709 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा