" चिऊ चिऊ चिडकी - " (बालगीत)
बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -
चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -
बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -
बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -
चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.
💬 प्रतिसाद
आ
आनन्दिता
Fri, 07/26/2013 - 00:20
नवीन
आवडली !,,,
- Log in or register to post comments