Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

ऐक स्त्री जन्मा तुझी कहाणी..

ट — टक्कू, Wed, 07/24/2013 - 11:50
कसं असतं नाही आमचं असं जगणं, मुलीच्या जन्माचं कोंदणच वेगळं. कोंदणात बसतो एकच हिरा, मात्र सांभाळाव्या लागतात नाना त-हा. मिळतात नवी नाती वयाच्या पंचविशी नंतर, जुळवून घ्यायला शिकावं हेच बेहत्तर. दोन घरांचं जरी भाग्य तिला लाभतं, मन मात्र दोन्हीकडे अडकलेलं राहतं. तिचं मन म्हणजे जणू द्विदली वाल, आत दले दोन पण वरून एकच साल. पाहाणा-याला वाटावे वा काय झालयं एकरुप, डोकावलं कि कळतं आतलं खर बहुरुप. लग्नानंतर तो होतो तिच्या मनाचा राजा, बदलत राहते ती स्वत:ला न करता गाजावाजा. कुणाची काय आवड तर कुणाची सवय काय, लक्षात ठेउन सारं अंथरुण पाहून पसरते पाय. अपेक्षा असतात तिच्या ब-याच पण खास अशी एकाचकडून, त्याच्याशिवाय मनातली ताजी फ़ुलही जातात गळून. वाटतं बदलावं कि त्यानेही जरा बायकोसाठी, करावं काही फ़क्त आपल्यासाठी. कधी करावं बायको बायको कधी कौतुक जमान्यात, आयुष्याचं सार्थक होतं बसं त्या चार शब्दात. काही न बदलल्याचा त्याला वाटे अभिमान फ़ार, कुणामुळे झालं शक्य याचा करावा विचार थोडाफ़ार. ’त्या’ ची एकदा झाल्यावर आयुष्याचे बदलतात क्रम, बाकी सारे नंतर येतात तो असतो प्रथम. त्याचे मात्र तसे नसते तो राहतो दोन्हीकडे, इथे आणतो तो पण गिरवावे लागतात आपल्यालाच धडे. बाहेर पडताना आधी विचार करी घरच्यांचा, अपराधीपणा डोळ्यात जणू काही चूक केल्याचा. होते मग अतिव दु:ख वाटते अगदी परके, इतके कठीण का जाते यांना जर आम्ही सोडून येतो सगळे. करावं लागतं सगळं शेवटी आपल्यालाच, कितीही राग आला तरी बाईपण लागतं जपायलाच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3081 views

💬 प्रतिसाद
अ
अग्निकोल्हा Wed, 07/24/2013 - 14:00 नवीन
उजविकडुनची तिसरी उपमा अप्रतिम.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 07/25/2013 - 13:35 नवीन
खूप छान…
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/25/2013 - 13:40 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा