Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चीन विश्वासपात्र नाही

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/20/2013 - 17:23
चीन विश्वासपात्र नाही

सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही

उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही
सांभाळण्यास बाळा वरती जमीन नाही

समजू नका कुणीही त्याला गरीब निर्धन
झाले अजून त्याचे पावित्र्य दीन नाही

आहे जरी घमंडी, उद्धट ज़रा जरासा
पण तो तुझ्याप्रमाणे, मित्रा कमीन नाही

"खावू लुटून मेवा" हे ब्रीद शासकांचे
क्लुप्ती जमेच ना ते सत्ताधुरीन नाही

तोडीस तोड उत्तर जमले बघा मलाही
आता पुढील चर्चा मुद्देविहीन नाही

स्वातंत्र्ययुद्ध अथवा संग्राम कोणताही
लढतात तेच जे-जे हुजरेकुलीन नाही

अख्त्यार भावनेच्या जगतो 'अभय' असा 'मी'
हसणे अधीन नाही, रडणे अधीन नाही

                              - गंगाधर मुटे
----------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4247 views

💬 प्रतिसाद
अ
अर्धवटराव Sun, 07/21/2013 - 06:33 नवीन
कवितेची धार दिवसेंदिवस अधिक अभय होत चालली आहे. जे काहि स्थित्यंतर तुमच्यातल्या कविला दिसतय आणि पुढील संघर्षाची दिशा काय असेल याबद्दल एखादा लेख टाका साहेब. कवितेला समर्थ समीक्षेची जोड हवी. पण तुमच्या शिवाय इतर कोणि वास्तववादी समीक्षा देखील करु शकणार नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:26 नवीन
अर्धवटराव, सध्या संघर्ष देखील दिशाहीन आणि पोरका झाला, असे काहीसे चित्र आहे. बघुयात भविश्यात काय वाढून ठेवले आहे ते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/21/2013 - 06:40 नवीन
लिहित राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:28 नवीन
धन्यवाद डॉ. साहेब, आपल्या शुभेच्छा आहेतच माझ्यासोबत. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग Sun, 07/21/2013 - 10:04 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:29 नवीन
धन्यवाद सर.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 07/21/2013 - 10:11 नवीन
कविता कळली मजला, अगम्य त्यांत काही नाही, 'त्यांच्या' सारखा शब्दांचा, उगीचच खेळ नाही. चांगली आहे, आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:30 नवीन
धन्यवाद सर.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 07/21/2013 - 12:36 नवीन
चिन्याना बोल लावुन काय फायदा?आपले नाणेबघा..बद्द बद्द बद्द
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:33 नवीन
आपले नाणे..बद्द बद्द बद्द आहे म्हणून तर कोणीतरी विश्वासार्ह असावे, अशी आशा आपण बाळगतो. नाही तर जशास तसे नसतो का वागलो? :)
  • Log in or register to post comments
न
निवांत पोपट Sun, 07/21/2013 - 15:58 नवीन
तुमच्या कविता नेहमी आवडतात.पण ही कविता.....:( पहिल्या दोन ओळी तर अगदीच अर्थहीन वाटल्या.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/21/2013 - 19:35 नवीन
निवांतराव, असे होते कधीकधी. आणि सर्वांनाच सर्वच कविता आवडतील असेही नाही. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/22/2013 - 11:11 नवीन
निपोंशी सहमत.. मुटेकाका, तुम्हीदेखील मिकाप्रमाणे एक स्टँडर्ड सेट करुन ठेवलं आहे. त्यामुळे ही कविता कुच जम्या नही अशी भासली. मुख्य म्हणजे गझलेसारखा फॉर्मॅट घेऊन ओळी पूर्ण करताना चवैतुहि फार आले आहेत. पण त्याचवेळी मुटेकाकांशीही सहमत. कारण प्रत्येक रचना ही प्रत्येक वाचकाच्या मनाला एकसारखीच अपील होणारी असेलच असं नाही. पुढील कवितेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 07/22/2013 - 10:23 नवीन
आज सकाळ मधली बातमी "चीनची पुन्हा कुरापत - ५० चीनी सैन्य लडाकमध्ये घुसले!" (स्वगत : या चायन्यांनो या! आपले स्वागत आहे. तिथेच का बरे थांबलात? आणखी पुढे या. आम्हाला कश्याच्चा म्हणून प्रॉब्ल्रेम नाही. आम्ही आमच्या दिनचर्येत मस्त मशगूल आहोत. ;) )
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 07/24/2013 - 05:14 नवीन
आजच्या 'सकाळ' मध्ये ही गझल प्रकाशित झाली आहे. धन्यवाद 'सकाळ'. ----------------------------------
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/24/2013 - 11:38 नवीन
जबरदस्त...! @आजच्या 'सकाळ' मध्ये ही गझल प्रकाशित झाली आहे.>>> अभिनंदन...!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 07/25/2013 - 13:36 नवीन
चीन विश्वासपात्र नाही हॅहॅहॅ... च्यामारी मला आत्ता पर्यंत आपले राजकारणीच विश्वासपात्र नाही असे वाटत होते,त्यात आता चीनी भाई पण सामिल झाले का ? {प्रेमश्युई यक्स्परर्ट };)
  • Log in or register to post comments
उ
उराडे अ. ह॑. Tue, 08/13/2013 - 15:24 नवीन
वास्तवाच॓ यथायोग्य चिञण
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा