Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अवनी

अ — अज्ञातकुल, Fri, 07/19/2013 - 14:10
भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे पवनासवे वराती मेघात सकल पाणी सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी ........................अज्ञात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 998 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/19/2013 - 14:49 नवीन
सुरुवातीच्या चार ओळी छान उतरल्या होत्या. पुढील ओळीही तशाच सहज आल्या असत्या तर कविता अधिक खुलली असती असे वाटले. लिहित राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    22 hours 8 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    22 hours ago
  • सुंदर !!
    22 hours 12 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा