Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पंढरीचा राया : अभंग

ग — गंगाधर मुटे, Fri, 07/19/2013 - 11:24
पंढरीचा राया : अभंग-१ पंढरीच्या राया । प्रभु दीननाथा ॥ टेकितो मी माथा । तुझे पायी ॥१॥ युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥ बदलले जग । आणि माणसेही ॥ तशा देवताही । बदलल्या ॥३॥ कनकाच्या भिंती । सोन्याचे कळस ॥ सोन्याची हौस । देवालाही ॥४॥ त्यांचे भक्त बघा । विमानाने जाई ॥ आम्हा कारे पायी । बोलावतो ॥५॥ देव गरीबाचा । तू राहिला गरीब ॥ भक्तही गरीब । ठेविले तू ॥६॥ आम्हां कारे असा । गरीबीचा शाप ॥ असे काय पाप । आम्ही केले? ॥७॥ अभयाने देवा । करा नियोजन ॥ जेणे भक्तजन । सुखी होती ॥८॥ - गंगाधर मुटे ................................................ . शुभहस्ते पुजा : अभंग-२ प्रथम पुजेला । लालदीवा मस्त ॥ सत्ताधारी हस्त । कशाला रे ॥१॥ त्यांचे शुभ हस्त । कसे सांगा देवा ॥ हरामाचा मेवा । चाखती ते ॥२॥ लबाड लंपट । तयांची जमात ॥ माखलेले हात । रक्ताने गा ॥३॥ पाय तुझे कैसे । नाही विटाळले ॥ मन किटाळले । कैसे नाही ॥४॥ म्हणा काही देवा । आहे साटेलोटे ॥ अभयास वाटे । शंका तशी ॥५॥ - गंगाधर मुटे ......................................................... (आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाला थोडेसे साकडे) ………………………………………… . बोला पुंडलिकावरदे हरी विठ्ठल .......!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3142 views

💬 प्रतिसाद
आ
आशु जोग Fri, 07/19/2013 - 11:42 नवीन
'शुभहस्ते पुजा' आवडली
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 07/19/2013 - 11:44 नवीन
सोन्या रूपानं मढला, मारवाड्याचा बालाजी। शेतकऱ्यांचा विठोबा, पानफुलामधी राजी।। - बहीणाबाई
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/20/2013 - 02:57 नवीन
अभंग आवडला. युगे किती उभा । एका विटेवरी ॥ येवुनी बाहेरी । पहा जरा ॥२॥ मस्तच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/23/2013 - 15:48 नवीन
आवडले. छान लिहिलेत. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/23/2013 - 16:02 नवीन
शुभहस्ते पुजा : अभंग-२ Image removed. ओळि ओळितून बसलीया ओळी, अता यांची पोळी कैशी भाजेल... लावा अभंगाचे पान पंढरीला, विठुराया गेला वैकुंठाला...
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 07/23/2013 - 16:49 नवीन
मस्त ............आवडेश दादा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    22 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    22 hours ago
  • सुंदर !!
    22 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा