झालंया सगळ येगळ आता ..
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ
सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल
बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल
भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर
भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल
पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर
पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर
आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर
शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर
दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर
पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचताया रक्तगटाची ओळ
💬 प्रतिसाद
न
निनाव
गुरुवार, 07/18/2013 - 06:19
नवीन
वैभव दा ,
हि दोन कडवी खूपच आवड्लि.
पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर
पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर
आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर
शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर
- Log in or register to post comments
व
वैभव कुलकर्नि
गुरुवार, 07/18/2013 - 06:23
नवीन
:)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 07/18/2013 - 06:32
नवीन
हॅट्स ऑफ !!!!
क्या बात है! काय म्हणावं या काव्याला...
चटके लावणा-या ओळी आहेत. इतके बारकावे टिपलेत तुम्ही की बोलून सोय नाही.
सुसाट!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 07/18/2013 - 06:34
नवीन
सुंदर काव्य
- Log in or register to post comments