" हे असे चालायचेच!! "
बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे
ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे !
काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे
थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे !
तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते
मग तोच म्हणाला ,
जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !!
बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
💬 प्रतिसाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/18/2013 - 11:39
नवीन
ठिक ठाक आहे, तुमच्याकडून अपेक्षा अजुन जास्त उंचीची आहे.
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 07/18/2013 - 22:54
नवीन
मि . का.
नक्कीच!
तुमचे आशिष असेच असू द्यावे !
आपला विनम्र
निनाव
- Log in or register to post comments