Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

अ — अत्रुप्त आत्मा, Wed, 07/17/2013 - 21:56
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!? https://lh6.googleusercontent.com/-0GQsszprAq4/UOmuf-K1p2I/AAAAAAAAV_s/WtGNYtQz17M/w702-h468-no/IMG_3714.JPG गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!? https://lh4.googleusercontent.com/-m6PSkS0HP8s/UOmuXattpQI/AAAAAAAAV_M/qDzljr7bmEM/w702-h468-no/IMG_3710.JPG वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो? https://lh6.googleusercontent.com/-tuyJTOzVNEA/UOmuRLAkHpI/AAAAAAAAWKc/UVwxDHcMhOQ/w702-h468-no/IMG_3707.JPG गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय? हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!! https://lh6.googleusercontent.com/-1XWU-EkGyUI/UOmuhkR-ecI/AAAAAAAAV_0/0xwj7PI2nEU/w702-h468-no/IMG_3715.JPG कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते. https://lh3.googleusercontent.com/-62YPWqZPoI4/UOmusblIGwI/AAAAAAAAWAs/VctXhvk_AGI/w702-h468-no/IMG_3724.JPG सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी. https://lh4.googleusercontent.com/-QEqFBjbsDBc/UOmvZNeurAI/AAAAAAAAWDc/RPW5b9A2IEU/w702-h468-no/IMG_3756.JPG ======================================================== डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले? मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...! कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!? गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!? वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो? गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय? हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!! कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते. सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी. ======================================================== सर्व छायाचित्र-वल्लींकडून साभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12723 views

💬 प्रतिसाद
म
मोदक Wed, 07/17/2013 - 22:05 नवीन
आवडले.. बुवा.. कशाला न्हाई त्या इडंबनात वेळ वाया घालवता हो..???
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 07/18/2013 - 03:10 नवीन
मस्त..............बुवा आता एखादे दीर्घकाव्य रचायला हरकत नाही..........फोटोही चांगले काढलेत.......
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/18/2013 - 03:47 नवीन
धन्यवाद हो जयंत काका. फोटोंचि किमया वल्लींची आहे,माझी नाही. :)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 07/18/2013 - 03:16 नवीन
सुंदर! गेलो नाहीये इथे कधी. पण सगळ्याच लेण्या जणु एक प्रश्नच देऊन परत पाठवतात बघणा-याला, की 'कसं काय???' काव्य छान आहे !
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 07/18/2013 - 04:01 नवीन
मस्त हो आत्मुस!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/18/2013 - 04:06 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/18/2013 - 05:13 नवीन
सुंदर कविता. तुम्ही तिथे किती भारून गेला होतात हे प्रत्यक्षच पाहिलेच आहे.
कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
'नसता हाती छिन्नी हातोडा' ही शब्दयोजना चुकीची वाटतेय. कारण ह्या शिल्पकारांनी इतर कुठलीही साधने नसता फक्त छिन्नी आणि हातोडीच्याच साहाय्याने हे अफाट काम करून खडकात कवित्व ओतलंय. थोडासा बदल कसा वाटतोय पहा. कुण्या देशीचे कोण प्रवासी असता फक्त छिन्नी हतोडा खडकामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/18/2013 - 06:54 नवीन
कुण्या देशिचे कोण प्रवासी, केवळ हाती छिन्नि हतोडा.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/18/2013 - 06:59 नवीन
सुंदर कविता आणि लेण्यांची चित्रे ! आमचे दोन पैसे... कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा ऐवजी कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा असं लिहिलं तर कसं वाटेल?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/18/2013 - 07:11 नवीन
येकदम पर्फेक्ट.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/18/2013 - 07:26 नवीन
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा>>> ग्रेट...ग्रेट...हेच बरोब्बर!!! (संपादक हाच बदल करा!...लवकर...प्लीज!!!) माझा "केवळ" हा(बदललेला) शब्दपण तीच अर्थनिष्पत्ती करतो,पण परिणामकारता साधली ती इस्पिकच्या एक्क्यानेच...!!! त्यामुळे तोच बदल हवा. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/18/2013 - 07:44 नवीन
केलाय..केलाय. किती घायकुतीला येता हो अत्रुप्त. :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/19/2013 - 06:14 नवीन
+१११ सुचविलेल्या बदला साठी ! पण मत्त हाती की हत्ती ? ऑं ?
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 07/18/2013 - 05:40 नवीन
सुंदर कविता. शिल्पांना साजेशी.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 07/18/2013 - 05:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/18/2013 - 06:01 नवीन
वा बुवा!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 07/18/2013 - 06:02 नवीन
(अत्रुप्त आत्मा - एक गूढानुभव!) खालील ओळीत प्रश्नचिन्हाची दुरूस्ती केली आहे. हातामधुनी कसा अवतरे मत्त हाती अन निधडा घोडा!? जुळता जुळता सर्व गणीते...हिशेब मन का मागत नाही!? बाकी वेगळ्याच अनुभूतीची कविता.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 07/18/2013 - 06:24 नवीन
खुपच छान. मस्त. फोटो आणि वर्णन कवितेच्या माध्यमातून बघताना, वाचताना वेगळाच अनुभव आला. सहीच.
बुवा आता एखादे दीर्घकाव्य रचायला हरकत नाही
+१००
  • Log in or register to post comments
R
rain6100 गुरुवार, 07/18/2013 - 07:25 नवीन
??????????????????
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 07/18/2013 - 07:32 नवीन
फोटोच आवडले. गद्य वर्णन जास्त आवडले असते.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 07/18/2013 - 07:34 नवीन
मस्त धागा. काव्य अणि फोटो दोन्हीही अतिशय आवडले. गुड मॉर्निन्ग झाली माझी एकदम! :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 07/18/2013 - 07:55 नवीन
बुवा. एक नंबर. फोटोंबरोबर काव्या द्यायची आयडिया पण खूप आवडली
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 07/18/2013 - 07:34 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 07/18/2013 - 07:45 नवीन
जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा
या विषयावर तेजग्यान फाउंडेशनच्या सरश्रींचं "स्विकाराची जादू" नावाचं छान पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा गुरुवार, 07/18/2013 - 22:57 नवीन
भौतिक सुखांच्या राशित असतात असे निरीक्षण आहे. खरं खोटं देवाक माइत.
  • Log in or register to post comments
ध
धन्या गुरुवार, 07/18/2013 - 07:43 नवीन
लय भारी रे आत्मुस. बरं हे फोटो घेताना मांडी घालून बसला होता की नाही? ;)
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर गुरुवार, 07/18/2013 - 08:03 नवीन
वाह बुवा, सुरेख. औरभी आन दो.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 07/18/2013 - 08:19 नवीन
पहिला फोटो जरा सुधारुन टाकला आहे. कॉम्प्रेसड असल्यामुळे विशेष चांगला करता आलेला नाही..... Image removed.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 07/18/2013 - 11:58 नवीन
लेण्यांइतकीच सुघड घडण ! रच्याकने कुठे आली हो ही बेडसे लेणी ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/18/2013 - 19:12 नवीन
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत वरून पवनानगर (काळे कॉलनी) कडे जाणार्‍या रस्त्यावर ११/१२ किमी पुढे करूंज गाव आहे. करूंज गावातूनच उजवीकडे १/१.५ किमी आत बेडसे गाव. तिथल्याच डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 07/19/2013 - 06:18 नवीन
पुण्यास आलात तर जाउ आपण.. अशी जवळ आहेत. वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतात व मी इतिहासाची मस्करी करतो दोन्ही अनुभव मस्त असतील.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 07/22/2013 - 19:32 नवीन
वल्ली बुवा तल्लीन होऊन इतिहास ऐकवतात पॉईंट नोटेड!
  • Log in or register to post comments
क
कान्होबा गुरुवार, 07/18/2013 - 14:45 नवीन
वा बुवा या लेण्या पाहायला कसे जायचे याचे वर्णन पण लिहा ना
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/18/2013 - 19:19 नवीन
काँलिंग वल्ली... तुमच्या बेडसे लेणीच्या धाग्याचि लिंक टाका हो इथे! म्हणजे कामच होइल. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 07/18/2013 - 19:24 नवीन
हे घ्या. :) http://misalpav.com/node/16902
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/18/2013 - 20:04 नवीन
कविता आवडली. फटूंमुळे अजून जास्त भारी वाटले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/18/2013 - 23:08 नवीन
गुर्जी गुर्जी ब्येस्ट ब्येस्ट. आवडले एकदम :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 07/19/2013 - 06:21 नवीन
व्वा बुवा!! वल्लीच्या जबरदस्त फोटोंना तुमच्या सुंदर काव्याची साथ मिळालीय.!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Mon, 07/22/2013 - 09:48 नवीन
लेणी आवडली !
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Mon, 07/22/2013 - 10:34 नवीन
तुमचा आणि वल्लीदा दोघांचा धागा मस्तच. मी बघितली आहेत हि लेणी.
  • Log in or register to post comments
आ
आरति २३ Mon, 07/22/2013 - 10:51 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 07/22/2013 - 15:08 नवीन
सु रे ख!
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 07/22/2013 - 15:36 नवीन
पद्य वर्णन आणि वल्लीने काढलेले फोटो आवडले!
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 07/23/2013 - 16:52 नवीन
समसमा !बहारदार !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 07/27/2013 - 11:31 नवीन
आणी सर्व वाचक आणी प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    22 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    22 hours ago
  • सुंदर !!
    22 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा