कृष्ण तो आतला ...
रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.
युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.
निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.
प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.
अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.
**
तीच कवितेची ताकद असते आणि मर्यादाहीहे आवडलं.खरं तर कोणत्याही कविताच काय लिखाणाला अनेक अर्थ आणि पदर असू शकतातसहमत.तेव्हा एकदा लिखाण लिहून प्रसिद्ध केलं की ते संपूर्णपणे वाचकांचं!प्रत्येकाला हवा तो अर्थ घ्यायचं स्वातंत्र्य आहेमान्य. वाचक म्हणून मला जितकं स्वातंत्र्य हवं असतं तेच मी माझ्या वाचकांनाही द्यायला हवं!दर वेळी अर्थ कळलाच पाहिजे असंही नाही!यात थोडी दुरुस्ती करेन मी. दर वेळी मला कळलेलाच अर्थ इतरांना कळला पाहिजे असं नाही - असं मी म्हणेन.