Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पाऊस

प — पद्मश्री चित्रे, Mon, 07/15/2013 - 12:23
आज पहाटे लाजत मुरकत, बरसून गेला पाउस नवथर तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर मातीवरती हलकी नक्षी, पानांवरती रंग ओलसर मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर पागोळ्यांचे पैंजण छुन छुन, टपटपणार्‍या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली मेघ अजूनही विस्कटलेले, चंद्रकोर ही ओली अजुनी अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2268 views

💬 प्रतिसाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 07/15/2013 - 12:31 नवीन
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन ,टपटपणार्‍या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली
या ओळी आवडल्या. पुलेशु.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 07/15/2013 - 12:35 नवीन
येलकम अगेन. लै दिवसानी अवतरलात फुलवा बै. कविता मस्त आहे. सातार्‍याचा पाऊस बराच मिस करतोय
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 07/15/2013 - 12:36 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 07/15/2013 - 12:43 नवीन
वा!आत्ता इथं पाऊस नसतानाही पावसाची अनुभूती देणारे शब्द :-)
  • Log in or register to post comments
ग
गोरा सौमित्र Mon, 07/15/2013 - 12:43 नवीन
मेघ अजूनही विस्कटलेले, चंद्रकोर ही ओली अजुनी अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी ओळी आवडल्या.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 07/15/2013 - 14:31 नवीन
सुरेख लिहिलेस फुलवा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/15/2013 - 15:58 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/16/2013 - 03:37 नवीन
अतिशय सुंदर कविता. विशेष काय आवडलं, असं विचाराल तर म्हणेन- ''आज पहाटे लाजत मुरकत, बरसून गेला पाउस नवथर'' मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर आणि ''पागोळ्यांचे पैंजण छुन छुन, टपटपणार्‍या ओल्या वेली हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली'' किती सुंदर.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 07/16/2013 - 03:47 नवीन
फारच सुंदर आहे रचना. सलग ३-४ वेळा वाचली. आवडली. :)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Tue, 07/16/2013 - 05:35 नवीन
खूप आवडली कविता.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Tue, 07/16/2013 - 09:45 नवीन
सुंदर झाली आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 07/16/2013 - 10:18 नवीन
किती छान! लयदार ओळी.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 07/16/2013 - 10:36 नवीन
असेच म्हणतो. लय अन शब्दयोजना मस्त जमली आहे!
  • Log in or register to post comments
र
रुमानी Wed, 07/17/2013 - 09:27 नवीन
सुदंर झलिये कविता. तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर ........मास्तच.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/17/2013 - 14:14 नवीन
मस्त वाटले वाचून.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 47 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    22 hours ago
  • सुंदर !!
    22 hours 3 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा