आकाश
.. तर हे थेट तुझ्यापासून माझ्यापर्यंत पसरलेले आपले आकाश ..
त्यात पुन्हा तुझ्या बाजूने आपल्या दोघांचे आकाश वेगळे ;
आणि माझ्या बाजूने वेगळे !
त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे
आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे ..
..चल, आता हे सारे तुकडे एक करून टाकू !
- डॉ. सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
प
पक पक पक
Mon, 07/15/2013 - 13:18
नवीन
छान छान... :)
कोणी मानसोपचारतज्ञ आहे काय.. ? ;)
- Log in or register to post comments
न
निनाव
Wed, 07/17/2013 - 00:39
नवीन
त्यातही आपल्या आकाशातील केवळ तुझे
आणि केवळ माझे आकाश आणखीन वेगळे ..
भन्नाट , भन्नाट । amazing ..simply wonderful
आश्चर्य आहे कि इतरां कडून कशी सुटली ही कविता ??
- Log in or register to post comments