दुष्काळाच्या मरणकळा
आस लागली पाण्याची ती
कणकण उरात भरली काही
पेरलेले जाळून गेले
मयत झाली जमीन सारी
होरपळलेल्या मयतावरती
लाल उन्हाचा कपडा भारी
उघडे चोच एखादा दाणा
कोरडा घास त्याच्या दारी
किती हरपले किती करपले
कोण कोणास ना तारी
थरथरना-या काळजावरती
जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी
उन्मळलेले मूळ उठले
हंबरडा फोडी नभाच्या कानी
नभानेही मग सूर लावला
मरणकळाच्या सोडून तानी
💬 प्रतिसाद
अ
अमितसांगली
Fri, 07/12/2013 - 13:54
नवीन
आता ओल्या दुष्काळावर लिहा....लगेच नको...दमान..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/12/2013 - 14:13
नवीन
लिहित राहा.
(बाकी, अमित सांगलीशी किंचित सहमत)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 07/12/2013 - 14:19
नवीन
छान रचना. फक्त 'मयत झाली जमीन सारी' हि वाक्यरचना बरोबर आहे कां?
- Log in or register to post comments