गजलेचा अनुवाद
मूळ गझलेच्या स्वैर अनुवादाचा एक प्रयत्न. गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी.
क़तील शिफ़ाई यांची मूळ गजल
अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ |
कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ |
थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ |
छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ |
आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ||
हे सखी
हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी
आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी
आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज ज्ञात मी
आठवावे या मला आधीन मग होईन मी
लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी
ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी
एक वांछा तू असावी ज्योत मंगळ ह्या तमी
ओळखीची ओळ व्हावी तू, मला विझवीन मी
............................अज्ञात (१०/०७/२०१३)
💬 प्रतिसाद
द
दिपक.कुवेत
Wed, 07/10/2013 - 07:48
नवीन
लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी
ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी......हे कडव जास्त आवडलं
- Log in or register to post comments
न
निनाव
Wed, 07/10/2013 - 23:51
नवीन
chhan. khoop aavaDle. shivay
"गझलेच्या अंगाने लिहिली असली तरी ही निर्दोष गझल नसावी." agadee sahamat!!
- Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल
Sun, 07/14/2013 - 09:13
नवीन
आधी दिलेल्या अनुवादात थोडा बदल करून...................
हे सखी
हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी
आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी
आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणतो मी
आठवावे या मला अर्पीन समिधा प्राण मी
लोपले तिमिरात सारे जाळतो उश्वास मी
ना दिसे कांही तरीही एकटा फिरतोय मी
एक वांछा तू असावी ज्योत मंगळ ह्या तमी
ओळखीची ओळ होशिल तू जशी, जगा विसरीन मी
............................अज्ञात (१०/०७/२०१३)
- Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल
Sun, 07/14/2013 - 15:15
नवीन
आधी दिलेल्या अनुवादात अजून थोडा बदल करून...................
हे सखी अधरी तुला शब्दात गुंफू पाहतो मी
आंसवांचे श्वास होऊनी पसभर वाहतो मी
आजवर स्मरले तुला शिणलो कसा मज जाणले मी
आठवावे तू मला आता तरी सुखवेन मग मी
लोपले तिमिरात अवघे यातना उश्वास सारे जाळतो मी
ना दिसे कांही तरीही एकटा आधांतरी फिरतोय मी
एक वांछा तू असावी तेवणारी ज्योत मंगळ ह्या तमी
ओळखीची ओळ व्हावी तू, मरण जगवीन मी
............................अज्ञात (१०/०७/२०१३)
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 07/14/2013 - 17:27
नवीन
शब्दशः अनुवाद न करता भावानुवाद छान जमला आहे!
- Log in or register to post comments
र
रसिया बालम
Wed, 07/17/2013 - 22:05
नवीन
माझी आवडती गझल मराठमोळ्या रूपात.....
धन्यवाद साहेब!
- Log in or register to post comments