Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शब्दबेवडा

ग — गंगाधर मुटे, Tue, 07/09/2013 - 18:18
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना
परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो

तुझे तडाखे सोसून काया झिजून गेली, सुकून गेली
तरी निसर्गा! कुठे मनाने यत्किंचित मी खचून गेलो?

विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली
पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो

देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी
दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो

                                           - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2209 views

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/09/2013 - 19:09 नवीन
पुन्हा एकदा...अतिशय उच्च आशयपूर्ण काव्य!!! फक्त सलाम...सलाम..सलाम..!!!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 07/10/2013 - 05:32 नवीन
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!! ही ओळ सीता शोधणे विसरलो अन् लंकेमध्ये रमून गेलो! अशी वाचली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/10/2013 - 06:30 नवीन
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो मस्त...
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 07/10/2013 - 13:17 नवीन
खुपच सुरेख काव्य.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/10/2013 - 13:24 नवीन
आस्तिक मी की नास्तिक आहे, जेव्हा कोडे मला सुटेना परमार्थाशी नाळ जोडुनी मानवतेला भजून गेलो विज्ञानाने हात टेकले अन् बुद्धीही हतबल झाली पूजन-अर्चन, जंतर-मंतर तमाम तेव्हा करून गेलो देण्यासाठी घाव सुगंधी टपून होती फुले गुलाबी दुरून टा-टा करून त्यांना 'अभय' जरासा हसून गेलो
क्या.... बात है ! क्या बात है! खल्लास!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 07/10/2013 - 13:31 नवीन
मस्त रचना!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 07/10/2013 - 19:10 नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. :)
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 07/11/2013 - 00:07 नवीन
kevaL : sashtaang _/\_ ajoon khooop shikaayche baaki aahe amuche..!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा