बाळूचे स्वप्न - (बाल कविता)
सशाने धरले सिँहाचे कान
गरगर फिरवून मोडली मान ।
शेळीने घेतला लांडग्याचा चावा
लांडगा ओरडला-धावा धावा ।
मुंगीची ऐकून डरकाळी कानात
हत्ती घाबरून पळाला रानात ।
कासवाने लावली हरणाशी शर्यत
हरीण दमले धापा टाकत ।
उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
काढायला लावल्या दहा उठाबशा ।
बाळूने मोजले दोन सात चार
स्वप्नात बाळू मोजून बेजार !
'
💬 प्रतिसाद
ज
जेनी...
Mon, 07/08/2013 - 19:47
नवीन
हि हि हि
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/09/2013 - 09:17
नवीन
एकदम चांगली विनोदी कविता.
(पण प्राण्यांचा स्वभावविशेषगूण समजले आहे, एवढे वय असणार्यांनाच ही कविता कळू शकेल आणि आनंद घेता येईल.)
- Log in or register to post comments
न
निनाव
Tue, 07/09/2013 - 12:00
नवीन
khoopach mast.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/09/2013 - 22:45
नवीन
हायला काय भारी कविताय.
एकदम मला चित्रे काढायला प्रेरणादायक अशी आहे बघा.
- Log in or register to post comments