सरकारी नोकर
वेळेवर येईना कधी
कामाला कधी मधी
पगाराला सर्वात आधी
तो सरकारी नोकर॥१॥
फाईल्स टाकी ऐसपैस
काम करी सावकास
टेबलाखालुन घेई पैस
तो सरकारी नोकर॥२॥
पैसे घेऊन काम न करी
पार्टीला बोलवी घरी
नेहमीच अपेक्षा धरी
तो सरकारी नोकर॥३॥
जेवण करून झाकी डोळे
कधी चार वाजताच पळे
घरी जाऊन नुसता लोळे
तो सरकारी नोकर॥४॥
वाटेल तेंव्हा घेई रजा
खाऊनपिऊन करी मजा
म्हणे साहेब आहे माझा
तो सरकारी नोकर॥५॥
काम चुकार एक नंबर
काम थोडे बोले फार
टाकी दुसर्यावरी भार
तो सरकारी नोकरी६॥
साहेबांची हाजी हाजी
सह-कार्यांची नाराजी
रोज बातमी सांगे ताजी
तो सरकारी नोकर॥७॥
युनियनचा पदाअधिकारी
काम कधीच नाही करी
वाटेल तेंव्हा जाई घरी
तो सरकारी नोकर॥८॥
--बी.डी.वायळ
💬 प्रतिसाद
प
पक पक पक
Mon, 07/08/2013 - 05:08
नवीन
हिय्य्या......मस्स्स्त.. :)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Mon, 07/08/2013 - 05:17
नवीन
कैच्याकै..
सगळेच सरकारी नोकर असे नसतात कै.
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Tue, 07/09/2013 - 13:02
नवीन
बहुतेक असेच असतात पण; असे नसणर्यांसाठी क्षमा. प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार..!
- Log in or register to post comments
न
निनाव
Mon, 07/08/2013 - 16:26
नवीन
lihit raha. pu.le.shu.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 07/09/2013 - 05:14
नवीन
अॅप्ट ! नेमकं !
छान लिहिलंय!
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/09/2013 - 09:20
नवीन
सरकारी नोकर महिमास्त्रोत्र.
अफलातून. :)
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Tue, 07/09/2013 - 13:06
नवीन
कविता वाचल्याबद्दल तसेच प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचेच आभार..!
- Log in or register to post comments