Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माझे ऑफिस

B — Bhagwanta Wayal, Sat, 06/22/2013 - 18:14
माझे ऑफिस ऑफिस , कसे दिसते भकास। वाजले दहा तरी...., नाही कुणाचा तपास॥१॥ माझे ऑफिस ऑफिस , आस सेवेची धरावी। ग्राहक देव भव....., सेवा तयाची करावी॥२॥ माझे ऑफिस ऑफिस , कसे वाटेना आपुले। जणु टाटा अंबानीने..., त्याला विकत घेतले॥३॥ माझे ऑफिस ऑफिस , पहा कँप्युटर आलं। नविन तंत्र ज्ञान...., आम्हा शिकाव लागेल॥४॥ माझे ऑफिस ऑफिस , नका घेऊ हो टेन्शन। काम करुन आपले..., रहा नेहमी प्रस न्न॥५॥ माझे ऑफिस ऑफिस , करु उत्तम नोकरी। हेची जाणा श्रीसेवा...., मिळे पोटाला भाक री॥६॥ माझे ऑफिस ऑफिस , करू सारे मेहनत। नका धरू हो अपेक्षा.., फळ देईल समर्थ॥७॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2513 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Sat, 06/22/2013 - 18:28 नवीन
माझे ऑफिस ऑफिस , कसे दिसते भकास। वाजले दहा तरी...., नाही कुणाचा तपास॥१॥ हॅ हॅ हॅ, सरकारी नोकरी वाटते!
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 06/23/2013 - 05:55 नवीन
पहिले सरकरी नंतर निमसरकारी आणि पुढे प्राव्हेट होण्याची शक्यता.आता तुम्ही ओळ्खल असेलच मी बी एस एन एल मध्ये नोकरीला आ॑हे.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 06/23/2013 - 20:37 नवीन
मी बी एस एन एल मध्ये नोकरीला आ॑हे
वा वा वा वा. भारीच की. मस्त ब्रॉडबँड कविता लिहिता ब्वा तुम्ही. दिपीका बीएसेनेलमध्ये नसते का हो सध्या? तिच्यावर येऊ द्या की एक कविता.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 06/26/2013 - 12:52 नवीन
कोणत्या जमान्यात वावरताय राव? प्रिती,दिपीका कधीच गेल्या, हाय...! आता उरले सिब्बल. आणि.... कवितेच म्हणाल तर,आम्ही लवंगी फटाके फोडणारे, तुम्ही अ‍ॅटमबाँब फोडायला सांगताय यार.
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 07/09/2013 - 16:57 नवीन
बीएसएनएलमध्ये आहात का? पोस्टपेडचा ग्राहक सेवा क्रमांक काय आहे हो? बिल भरुनही आऊटगोइंग बंद केलंय.. :-( नेटवर दिलेल्या नंबर्सवर कोणी बोलायलाच मागेना...
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal गुरुवार, 07/11/2013 - 07:42 नवीन
०२५१-२३१९७८७ या नंबरवर कॉल करुन बघा.
  • Log in or register to post comments
ख
खबो जाप Sat, 06/22/2013 - 19:22 नवीन
आमच्या हापिसात वाजले साडे आकारा तरी...., नाही कुणाचा तपास॥१॥ आस असतया भाऊ
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 06/23/2013 - 06:15 नवीन
खरंय भऊ , प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 07/02/2013 - 18:53 नवीन
lihit raha..veglaach vichaar mandala ahe.. khoop shubhechha..
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sat, 07/06/2013 - 10:01 नवीन
Thanks
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा