शकुनगंध
त्या ओठातिल शब्द
मदनउत्कट होऊनी झरतात
स्मितहास्याची लकेर स्वरमय
खग चिमणे किलबिलतात
बंद पापणी मन चंचल
पर फुलाफुलात विहरतात
चुंबुनिया मधुपराग सालस
शीळ ओळ आळवतात
कोण कळे ना प्रतिमा केवळ
स्पर्श उणे दरवळतात
शकुनगंधमय वास सदाही
तळहृदयी वावरतात
......................अज्ञात
💬 प्रतिसाद
स
स्पंदना
गुरुवार, 06/20/2013 - 04:23
नवीन
तात ऐवजी ती चालेल का? मग तुमची कविता वाटेल अज्ञात.
:)
- Log in or register to post comments