मि.पा. येते.... आणिक जाते
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p
(ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत!
)
मि.पा. येते.... आणिक जाते... येताना कधि एरर आणिते,
अन जाताना...आशा लाविते, मि.पा. येते आणिक जाते
येणे-जाणे,'गायब' होणे
"असले" जाणे जे ना
कुणी ध्या..नी धरते.
येताना मि.पा. अस्से.. त्रासते
तर,रिफ्रेश होताना त्रासविते
रिफ्रेश काही होतच नाही
कितिदा दट्या दाबुन पाही,
लॉग-इन करुन,,,पुन्हा पुन्हा ए..रर म्हणते.
आले मि.पा.- कापली फीत
जाणार नाही ना,पुन्हा मी भीत
जाताना कधि offline देत,
येण्यासाठिच(?) ऑफ-ला-इन देत.. ;)
Retry येते,येताच जाते,लै..लै...सलते.
💬 प्रतिसाद
प
पैसा
Sat, 06/15/2013 - 20:14
नवीन
=)) =)) =))
=)) =))
=))
बर्याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Sat, 06/15/2013 - 22:15
नवीन
=))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 06/16/2013 - 03:34
नवीन
मिपा सतत येत जात असल्याने आलेल्या अस्वस्थतेतूनच हे काव्य बाहेर आलंय हे जाणवत होतंच. म्हणून फक्त इतकेच म्हणतो, यथायोग्य रचना.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 06/16/2013 - 04:58
नवीन
जिल्बी पाडणे हा अआचा हातखंडा आहे.
- Log in or register to post comments
त
तर्री
Sun, 06/16/2013 - 10:04
नवीन
भवना अगदी पश्ट लिव्ल्या आहेत !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 06/16/2013 - 10:15
नवीन
मिपागमनसंबंधी रचना समयोचिता!
खाई मठ्ठ्यासवे साची जिलबी जी कराकरा ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 06/16/2013 - 12:47
नवीन
भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता...
तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 06/16/2013 - 22:31
नवीन
आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता|
दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||
जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी |
आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी ||
वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 06/16/2013 - 22:49
नवीन
यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः |
नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः ||
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/18/2013 - 13:17
नवीन
ठार मेले!
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 06:49
नवीन
जबरी जुगलबंदी!
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Mon, 04/06/2015 - 08:29
नवीन
हहपुवा ...
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 06/17/2013 - 04:32
नवीन
@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>>
@वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>
__/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!!
@आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>>
@दुष्टो
स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
...............................
वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))
- Log in or register to post comments
स
सविता००१
Mon, 04/06/2015 - 09:14
नवीन
मेले हसून हसून
- Log in or register to post comments
आ
आशु जोग
Sun, 06/16/2013 - 12:16
नवीन
झकास !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/16/2013 - 12:57
नवीन
आधीच अतृप्त, त्यातची झाला मिपाविरह तयाला !
अश्या आत्म्याची कथा काय सांगू तुम्हाला ? ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/16/2013 - 13:04
नवीन
'मिपा येते आणिक जाते’ अजून उत्तम माल भरता आला असता.
पण, जो भरलाय तोही ठीकच आहे. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 06/16/2013 - 14:46
नवीन
एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 06/19/2013 - 18:02
नवीन
आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा मठ्ठा...!
केले सगळे मिपाकरांनी चट्टामट्टा.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 06/19/2013 - 20:46
नवीन
+१११११
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 06/20/2013 - 00:18
नवीन
मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Sat, 06/22/2013 - 08:43
नवीन
=)) =))
काय एक एक पात्र जमलेत मिपावर .
लई दिवसांनी हापिसात हसतोय
भारी रे . आत्मा आणि ब्याट्या .
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/08/2013 - 14:23
नवीन
आज तुझी अठवण येते.... मि.पा..येते..आणिकं जाते! =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 05:38
नवीन
आले मि.पा.- कापली फीत
जाणार नाही ना,पुन्हा मी भीत
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 04/06/2015 - 11:23
नवीन
तुम्ही कुठे चाल्लात भिऊन ?
- Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 06:52
नवीन
चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 07:33
नवीन
@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>>
..
.. 
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 08:03
नवीन
काय राव माझा लिहायचा फ्लो मोडला!!!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 04/06/2015 - 09:09
नवीन
खी खी खी.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 04/06/2015 - 09:30
नवीन
काय राव च्या जागी एक शिवी टाकून वाचलं.
मिपा विपश्यना संपली,भृगुसंहिता बहुतेक ओककाकांना सापडली असणार.पुढे काय?
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 04/06/2015 - 17:28
नवीन
सॉल्लीड
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 04/06/2015 - 21:11
नवीन
लय मज्जा =))
- Log in or register to post comments