Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नशिब!!!

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 06/13/2013 - 15:00
वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला? खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला... आळसाची मीच माझ्या, ढाल अन केली जरी प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले... नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'... उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे कळले,नाही ढाल ती,'मुखवटा' आहे तिथे! रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती? आज मजला वाटते या,मुखवट्याची-ती भिती... फेकुनी देऊन नशिबा,सत्य मी स्विकारिले तरी माझ्या अंतरीने,सत्य ना स्विकारिले! 'आहे' 'जसा' तैसाच मि ही,मजला स्विकारितो. कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4634 views

💬 प्रतिसाद
प
पैसा गुरुवार, 06/13/2013 - 16:07 नवीन
तुमची काव्य प्रतिभा अशीच बहरत राहू दे!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 06/14/2013 - 07:09 नवीन
छान आहे....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/15/2013 - 06:00 नवीन
सुरेख पण गंभीर कविता. पण आता जरा एखादे हलकेफुलके काव्य येउ द्यात.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 06/15/2013 - 07:29 नवीन
व्वा बुवा!!
पण आता जरा एखादे हलकेफुलके काव्य येउ द्यात.
काय नको. असंच धीरगंभीर लिहित रहा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 06/15/2013 - 07:53 नवीन
@काय नको.>>> :D @असंच धीरगंभीर लिहित रहा.>>> :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 06/15/2013 - 07:55 नवीन
बुवा तुमच्या प्रतिभेला असे बंदिवासात अजिबात टाकू नका!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 06/15/2013 - 08:12 नवीन
अगदी अगदी. बुवांची इनोदी काव्ये, विडंबने वाचायला लैच आवडतात. आम्हास त्यापासून असे वंचित करू नका.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/09/2013 - 17:22 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sat, 06/15/2013 - 09:43 नवीन
हेच म्हण्तो.. :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 06/15/2013 - 12:37 नवीन
म्हणून नशिबाला दोष देताय की काय!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/15/2013 - 16:46 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 06/15/2013 - 18:01 नवीन
सुरेख. अलिकडे आत्मा शांत होऊ लागला आहे ...जाने क्या बात है ?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 06/16/2013 - 00:07 नवीन
कविता मस्तच. गंभीर आहे पण आवडली. वरती स्नेहांकिता म्हणताहेत तशी आम्हालापण शंका येऊ लागलीये-त्रुप्तीचे नक्की काय कारण आहे म्हणे भो आत्मूस भवान् ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 06/16/2013 - 10:34 नवीन
आत्मुस गुर्जी. नका हो नका असे गंभीर होऊ, आमच्याकडं तशा प्रकारची वेगळी माणसं आहेत की ! तुम्चं डिपार्ट्मेंट वेगळं आहे का नाही? मग? ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 06/16/2013 - 10:38 नवीन
कविता भारी आवडली हे सांगायचं र्‍हायलंच. ;)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Tue, 07/09/2013 - 09:53 नवीन
सुरेख कविता. :)
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 07/09/2013 - 13:33 नवीन
सुरोख कविता, आवड्ली.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 07/09/2013 - 17:28 नवीन
नशिब आमच कविता वाचायला मिळाली
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/09/2013 - 18:22 नवीन
तथाssssssssssस्तू!!! :)
  • Log in or register to post comments
र
रानी १३ Wed, 07/10/2013 - 10:19 नवीन
ही कविता भाऊसाहेब पाटणकराच्या एका कवितेसारखी वाटते आहे....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/10/2013 - 11:17 नवीन
श्टाइल तीच आहे..! आंम्ही भाऊसाहेबांच्या शायरीचे परचंड फ्यान... त्यामुळे त्याचा वारा येणे स्वा भाविक आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 32 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 39 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा