Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पहिला पाऊस

त — तुमचा अभिषेक, Wed, 05/29/2013 - 06:38
नो चिकचिक नो झिगझिग अन दरवळणारा मातीचा वास आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला ! अंग भिजवायला पुरेसा नव्हता, मन मात्र पार न्हाऊन निघाले.. - तुमचा अभिषेक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2918 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Wed, 05/29/2013 - 09:53 नवीन
अपेक्षाभंग....
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 11:21 नवीन
सहमत आहे, पण नाही राहावले, गेले महिनाभर इथे मुंबईत गरमीने अंगाला पाणी सुटून जे नुसती चिकचिक झिगझिग होतेय ती आज झाली नाही, कसलं बरं वाटलय म्हणून सांगू जेव्हा महिन्याभरानेच आज डॉकयार्ड ते बेलापूर या तासाभराच्या प्रवासात थंड झोप लागली.... सिमेंट काँक्रीटचे जंगल आमची मुंबई पण आज त्या दगडी रस्त्यांनाही कुठूनसा कोकणातल्या मातीचा वास येत होता, त्यावरून चालताना अंगाखांद्यावर आभाळातून पडणारे पावसाचे थेंब, किती वाट बघत होतो मी या थंडाव्याची गेले महिनाभर.... ऑफिसमध्ये आल्यावर देखील हाच विषय चर्चेचा, म्हटल आपल्या ऑनलाईन कट्ट्यावरही या भावना शेअर कराव्यात, तर जे मनात आले ते टाईपले !
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 05/29/2013 - 12:06 नवीन
तुम्ही त्या पाच ओळींऐवजी याच सहा ओळी आधी लिहायला हव्या होत्या :-)
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 05/29/2013 - 12:16 नवीन
हो तर.. खरंच अभि भौ..
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 12:27 नवीन
हो खरंय ते.. वरच्यापेक्षा हे वाचणेबल आहे.. खरे तर घरी असतो तर एखादा छोटामोठा उतारा लिहिला असता पटकन.. पण ऑफिसमध्ये म्हणून जरा फस्स.. मुळात चार-पाच ओळी म्हणून मी कवितेच्या दालनात टाकले अन लोकांनी कविता किंवा तत्सम लिखाण म्हणून वाचले तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्याच असणार .. कविता वा चारोळी मी आजवर नाही केली, जमणे तर दूरची गोष्ट आवड नसल्याने वाचतही नाही.. याला फेसबूक शेअर किंवा ऑर्कुटवर काढलेला पहिल्या पावसावरचा धागा या नजरेने बघा.. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 05/29/2013 - 12:43 नवीन
हवे असल्यास तुमचा धागा तुमच्या प्रतिसादातील जरूर तो भाग टाकून तुम्हाला संपादित करता येईल... दोन्ही मिळून अजून सुरेख कविता बनेल.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 13:05 नवीन
सूचनेबद्दल धन्यवाद पण आता खरेच नकोच ते.. आणि कविता म्हणाल तर खरेच माझा प्रांत नाहिये.. पण ललित किंवा गद्यप्रकारात पावसावरच काही लिहावेसे वाटल्यास पुढे मागे लिहेनच, अजून बरेच पावसाळे बघायचे आहेत .. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 05/29/2013 - 11:26 नवीन
आज सकाळी कचेरीच्या दिशेने ड्रायव्हिंग सुरु करतानाच काळे ढग दाटून आलेले पाहून लवकरच तो येणार अशी खात्री वाटतच होती. पण लवकर म्हणजे किती? तर अगदी ऑफिसात पोचेपोचेपर्यंतच समोरच्या काचेवर थेंब जमा झालेले पाहून पाऊस येण्यासाठी जामच उत्सुक आहे अशी खात्री झाली.. बेताबेताने पड रे बाबा.. -(मुंबईपर्जन्यपीडीत) गवि
  • Log in or register to post comments
न
निल्सन Wed, 05/29/2013 - 11:55 नवीन
आमच्या इथे (ठाण्याला) काल रात्री २ वाजल्यापासुन जोरदार पाऊस पडत होता. एवढा आनंद झाला कि आम्ही दोघे(मी अन माझा नवरा) उठून खिडकीतुन पावसाची मजा घेत होतो पण मेल्या त्या लाईटीला बघवेल तर शपथ गेली लगेच, मग जे असे काही उकडायला लागले की सर्व मजाच निघून गेली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/29/2013 - 12:06 नवीन
मग जे असे काही उकडायला लागले की सर्व मजाच निघून गेली.
अरे...! कमाल आहे! बाहेर जाऊन मस्त पैकी भिजायचे पावसात. किती रोमँटिक क्षण गमावलात तुम्ही. पुढच्या वेळी लक्षात ठेवा, आणि पाऊस आला की, लाईट जावा म्हणून, देवाकडे प्रार्थना करा. महाराष्ट्रात तरी देव ऐकतो लगेच.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 12:50 नवीन
खरंय.. मी देखील सकाळी ब्रश हातात धरून खिडकीत गेलो तर पहिल्यांदा वाटले मुंबईवर आज धुके जरा जास्तच पडलेय की काय, पण पाहतो तर रिमझिमत होता मस्त पाऊस.. तयारी मग पटपट आवरताना देवाकडे एकच प्रार्थना करत होती की मी बाहेर पडेपर्यंत टाकी खाली करू नकोस........ ऐकले माझे :) पहिले बारीश मे नही भिज्या तो लाईफ मे क्या मजा !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/29/2013 - 13:35 नवीन
@पहिले बारीश मे नही भिज्या तो लाईफ मे क्या मजा ! >>> वाहव्वा!!! :)
  • Log in or register to post comments
त
तनुजा महाजन Wed, 05/29/2013 - 12:02 नवीन
मस्स्त पाउस........
  • Log in or register to post comments
त
तनुजा महाजन Wed, 05/29/2013 - 12:02 नवीन
मस्स्त पाउस........
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 05/29/2013 - 13:25 नवीन
इथे माझ्याकडे पावसाचं वातावरण तयार झालंय, गाण्याआधी तंबोरा जुळवून तबल्याची ठोका ठोक होते अन् मग मुख्य गाणं सुरु होतं तसाच पावसाआधीचा मस्त पिवळट प्रकाश अन् जोरदार वारा सुटलाय.. अन् च्यायला मला पण आजच गाडी सर्विसिंगला टाकायची हौस आली होती, निवांत भटकत आलं असतं
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 05/29/2013 - 13:50 नवीन
पुण्यालाच मेला हुकवतोय.. किंवा असं वाटतं मलाच हुकवतोय की काय.. :( अजुन किती दिवस असं करणार आहे कुणास देवाक ठाऊक.. मुंबईकरांवर बरीच जळजळ झाली बॉ.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 05/29/2013 - 13:58 नवीन
मुंबईकरांवर बरीच जळजळ झाली बॉ. >>>>>>>>>>>>>>>>>>>>> चला धागा अगदीच फुकट नाही गेला, एक सुप्त हेतू तरी साध्य झाला. :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 05/29/2013 - 19:23 नवीन
@एक सुप्त हेतू तरी साध्य झाला. >>> =)) अस्सं होय!? =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा