Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जीव

D — drsunilahirrao, Mon, 05/27/2013 - 14:48
जीव दुखतो.. जीव खुपतो जीव अनावर हुंद्क्यासारखा ओंजळीत लपतो जीव जीवाला छळतो , माशासारखा तडफडतो जीव कसायाने नुकत्याच कापलेल्या ताज्या मांसाच्या तुकड्यासारखा तडतड उडतो ! जीव तुटतो, जीव स्वतःच्याच जीवावर उठतो जीव धुमसत्या आठवणींनी उरातल्या उरात उभा आडवा फुटतो जीव अर्ध्यात खुडतो, जीव खोल डोहात बुडतो जीव आपल्याच बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो ! जीव सुटतो , जीव स्वत:लाच विटतो : जीव शिशिरामधल्या एकाकी झाडासारखा वठतो ! जीव आटतो, जीव फाटतो जीव जीर्णशीर्ण धाग्यांसारखा तटातट तुटतो जीव भरून येतो, जीव हरून जातो जीव कुणालातरी जीव लावण्याच्या नादात एकाकी मरून जातो जीव वेडा होतो , थोडा थोडा होतो.. जीव तुझ्या जन्मभराच्या प्रतीक्षेसाठी डोळ्यात गोळा होतो.. - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/05/blog-post_26.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2242 views

💬 प्रतिसाद
स
स्पंदना Tue, 05/28/2013 - 02:10 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 05/28/2013 - 07:01 नवीन
@aprna akshay मनापासून आभार !
  • Log in or register to post comments
म
मीउमेश Tue, 05/28/2013 - 07:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 05/28/2013 - 07:51 नवीन
@मीउमेश, धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मीउमेश Tue, 05/28/2013 - 08:26 नवीन
जीव आपल्याच बेवारस कलेवरावर धुवांधार रडतो जीव इथेतिथे सांडतो, जीव जीवाशीच भांडतो जीव स्वतःच्याच विखुरलेल्या तुकड्यांना पुनःपुन: खांडतो ! तोडलस मित्रा
  • Log in or register to post comments
क
कोमल Tue, 05/28/2013 - 08:29 नवीन
आवडली.. मिका कॉलिंग..
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय Tue, 05/28/2013 - 14:47 नवीन
अशा ओळी वाचल्या की वाचणाऱ्याचा जीव हुरहुरतो!
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 05/28/2013 - 14:59 नवीन
@उमेश, @कोमल @इनिगोय, आभारी आहे !
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 05/29/2013 - 09:51 नवीन
कविता छान आहे.. :) छान आहे. प्रत्येक प्रतिसादकर्त्याचे आभार मानण्याची पद्ध्त पाहुन एका जिलबीसम्राटाची आठवण झाली.. ;)
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Wed, 05/29/2013 - 14:24 नवीन
पक पक पक :-)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा