Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शुभ मंगल सावधान …

भ — भावना कल्लोळ, Mon, 05/20/2013 - 14:41
(पुढील काव्य हे मंगलाष्टक्च्या लयीत वाचावे) घातला दारी मंडप लग्नाचा, खर्च तो बहु केला… पार्टी हळदीची दिली सर्वा, नाचुन जीव बहु थकला…. एवढे धुंद रात्रनृत्य ते झाले, सकाळी आम्बे हळदी मदतीला …. तेव्हाच अंतर्मन सांगे हृदयाला, बाबा सांभाळ रे स्वतःला… नाही कळले परी का म्हणतात तेव्हा … शुभ मंगल सावधान … आली समीप लग्न घटीका, heart beat तो वाढीला, पाहिले न माझ्या वधूस पहिले, बाप धाका पुत्र घाबरला, काय जाणे असेल कशी ती अप्सरा… रंभा, उर्वशी कि मेनका, तेवढ्यातच भट कोकलला, शुभ मंगल सावधान … चुळबुळ बहू झाली ती मनास , हातास घाम हि सुटला, अंतरपाट वैरी माझा, का आडवा कळेना … डोळे मिटून वाट पाहत मी त्या क्षणाची … समोर उभा ठाकला आणि शेवटचे भट पुटपुटला… शुभ मंगल सावधान … दृष्य समोरचे ते अघोरी, पाहूनच मला आली घेरी, महाकाय तो देह पाटावरी, Balance स्वतःचे Manage करी … हार हातात तिच्या वाटे भोवऱ्याची दोरी, शंभर एकरा साठी बापाने दिला माझा बळी … बापाचा रागाचा कटाक्ष पाहता गळून पडले अवसान …. माळला हार तिच्या डोकी, आणि मीच दिली एक आरोळी … शुभ मंगल सावधान … आयुष्य भर संभाळा हा पेहलवान …

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4548 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Mon, 05/20/2013 - 14:45 नवीन
:bigsmile: ह्हा ! ह्हा !! ह्हा !!!
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 05/20/2013 - 14:56 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
M
michmadhura Mon, 05/20/2013 - 15:02 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/20/2013 - 15:06 नवीन
अगागागागागा. द मा मिरासदारांची कुठलीतरी कथा असावी असं वाटलं झटक्यात!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 05/20/2013 - 15:20 नवीन
@आयुष्य भर संभाळा हा पेहलवान … >>> =)) अ वांतर--- वृत्तराजा ... ये रे ... ये... =))
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 05/20/2013 - 15:35 नवीन

भारी!

  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 05/20/2013 - 15:56 नवीन
हाहाहाहा.... डोळ्यांसमोर दृश्य तरळून गेले.. :D
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 05/21/2013 - 08:02 नवीन
वा!! सुरेख!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 05/22/2013 - 13:25 नवीन
मस्ताड!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/22/2013 - 14:54 नवीन
आजच्या युगातही असे घडते हे विश्वास ठेवण्यास कठीण आहे पण कवी म्हणतोय तर असेलही त्याचा तसा अनुभव.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 05/23/2013 - 13:53 नवीन
अहो प्रभा काका, काल्पनिक आहे हो हे, सत्य असले तरी तसा काही प्रत्यक्ष अनुभव मी तरी पहिला नाही आहे.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 05/24/2013 - 08:36 नवीन
हाहाहाहा लै भारी..
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/24/2013 - 09:06 नवीन
भारीच भारी. आता हिचे सासरचे नाव काय ठेवले, तेवढे नक्की सांगा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 39 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 44 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा