Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दारु पुराण

B — Bhagwanta Wayal, Sun, 05/12/2013 - 07:40
दारुपुराण सांगतो मी,तुम्ही ऐका शांतचित्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥ रोज येतो दरु पिऊन बाटली खिशामद्ये घेऊन सांगे रुबाबात येऊन चल वाढ मला भोजन रोज हवी मच्छी मटण बायको आण्ल सांगा कुठुन रागाने ऊठतो पेटून अर्ध्या जेवणावर ऊठुन होते त्याची चालू,ही बडबड आता ऐका एका दारुड्याची कथा ॥१॥ मुले कावरीबावरी होऊन आईच्या पदराखाली लपून ऊपाशी पोटी जाती झोपून याची थोडीही नाही त्याला जाण आई त्यांची कष्ट करुन देई मुलांना चांगले शिक्षण मुलेही हुशार आणि गुणवान फेडतील आईचे त्यांच्या ऋण मुलेच खरी तिची संपत्ती व सत्ता ऐका एका दारुड्याची कथा ॥२॥ दहा तारखेला होतो पगार जमे सारा मित्र परिवार दरु पिऊन चाले जुगार कोणी पिऊन होतात तर्र.. कुणा सुचेना आपले घर कोणी पडती भर रस्त्यावर घरी बायको पोरांना घोर हवलदाराचा खातात मार अशा त्यांच्या खोडी,किती वर्णाव्या मी आता ऐका एका दारुड्याची कथा ॥३॥ पैसे संपल्यावर सारं सारे मित्र होती पसार घरी येई जेंव्हा आजार कोणी लाविना त्याला हात भार याने केला मनी विचार हा सारा माया-बाजार गेला वेसन्मुक्ति केंद्रावर ऊपचार घेतले त्याने सत्वर सुटली त्याची दारु,हे सांगे भगवंता ऐका एका दारुड्याची कथा ॥४॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5359 views

💬 प्रतिसाद
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 08:33 नवीन
गावाकडच्या व्यसनमुक्ती केंद्रात म्हणायला. फाकडू चाल लावा, एकदम हिट आयटेम होणार.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 05/12/2013 - 08:35 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 05/12/2013 - 13:56 नवीन
"ऐका सत्य नारायणाची कथा" या चालीवर छान बसते
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 17:06 नवीन
तिर्थप्रसादानंतर म्हणायची का आधी?
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Mon, 05/13/2013 - 09:24 नवीन
तिर्थ घेतल्यावर व प्रसादाच्या आधी म्हणायची
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/12/2013 - 14:14 नवीन
दारूने बरबाद झालेला एक दारूडा एकदा दारू सोडण्याचा निष्चय करतो. घरी येऊन दारूच्या सगळ्या रिकाम्या बाटल्या फेकायला लागतो. पहिली रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझी नोकरी गेली.' फेकून देतो. दूसरी रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझे घर मला विकावे लागले आणि ह्या झोपडीत आलो.' फेकून देतो. तिसरी रिकामी बाटली घेतो, 'तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली.' फेकून देतो. चवथी बाटली भरलेली निघते. तिच्याकडे प्रेमाने पाहात म्हणतो, 'वेडी का तू? जरा बाजूला थांब. तुझा काय दोष. तू तर निष्पाप आहेस.'
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Mon, 05/13/2013 - 09:35 नवीन
दारुड्या व्यसनमुक्त होणार नाही,जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 05/12/2013 - 15:23 नवीन
चुकीने दारू पुरण असे वाचले.. एका भन्नाट कॉम्बिनेशनची शक्यता मनात डोकावतेय, सोत्री, जमेल का?
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Mon, 05/13/2013 - 09:26 नवीन
जमेल जमेल न जमायला काय झालय.
  • Log in or register to post comments
द
दिपक वायळ Sun, 05/12/2013 - 16:37 नवीन
वाह वाह क्या बात हॅ संसाराची वाट लावते दारु म्हणून संसार नका करू
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 21:14 नवीन
म्हणून चालू ठेवलीये दारू
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 05/13/2013 - 06:56 नवीन
ऐका एका दारुड्याची कथा ॥धृ॥
- ऐका सत्यनारायणाची कथा या चालीवर म्हणायचे का ? :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Mon, 05/13/2013 - 09:27 नवीन
दुसरी एखादी चाल लावली तरी चालेल.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 05/21/2013 - 07:55 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनापासून आभार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा