Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कर्माचरण

B — Bhagwanta Wayal, Fri, 05/10/2013 - 08:40
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥ जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला । दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला। नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥ उपवास केले नाना नवस सायास । लागला ना कधी देवा तुझा निजध्यास। मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥ ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन । आवरेना तरी माझे चंचळ मन । केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥ वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण । नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण। भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥४॥ राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2308 views

💬 प्रतिसाद
च
चाणक्य Fri, 05/10/2013 - 11:37 नवीन
झालीये कविता
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sat, 05/11/2013 - 18:22 नवीन
प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 05/11/2013 - 18:31 नवीन
भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी । वा! छान ..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 05/11/2013 - 23:28 नवीन
बहुतांपरि संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनांची, दीनाचा दयाळू मनी आठवावा.... प्रभाते मनी राम चिंतीत जावा!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/12/2013 - 06:44 नवीन
शोधीशी मानवा राऊळी मंदीरी, नांदतो देव हा ह्या तुझ्या अंतरी.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 05/12/2013 - 07:00 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 09:03 नवीन
मस्त! असा साधारण एक कोटी जप केला की नक्की काही तरी होणार.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 05/12/2013 - 09:34 नवीन
उपहास समजला. पण काहीच न करण्यापेक्षा ही सुरुवात चांगली नाही का माऊली?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 09:38 नवीन
मुक्काम येण्याची शक्यता शून्य.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 05/12/2013 - 09:41 नवीन
खरंच? ठाऊक नव्हतं ब्वा! सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 05/12/2013 - 13:52 नवीन
चुकिच्या मार्गावर चाललो काय किंवा सरळ मार्गावर शेवटी मुक्काम तर येणारच, यात काय शंकाच नाही. खुप छन प्रतिसाद दिल्याबद्दल मनपुर्वक आभार..!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 17:02 नवीन
सध्या जिथे आहोत तोच तर मुक्काम आहे कारण स्वतःलाच तर गाठायचंय!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 05/12/2013 - 18:59 नवीन
चांगली कविता. गेय आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 05/14/2013 - 07:30 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्य्वाद..! पण "गेय" कळले नाही
  • Log in or register to post comments
स
सुधीर Mon, 05/13/2013 - 15:17 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Tue, 05/14/2013 - 07:31 नवीन
धन्यवाद...!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा