हवं असं कुणीतरी
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर असो तुझा साथ
काटेरी वाटेवर विश्वासाचा घट्ट हात
शोधात अशा मी प्रेमा तुझ्या
ओवाळून टाकीन जीव तुजवर , होशील का तू माझा सख्या ?
ना कधी सोडून जाईन
ना अंतर तुला मी देईन
वचन हे माझे नाहीत नुस्तेच शब्द ,
नाही हे खोटे, ना हे म्रुगजळ,
तुझे आश्रू सामावण्यात - सदैव माझी ओंजळ
एकट्याने जगणे नाही हे इतके सोपे
एकमेकांवर अवलंबून जगण्यात देखील वेगळीच मजा असते
" काळजी करू नकोस , आहे मी " असे एकच प्रेरणादायी वाक्य
अनेक अडचणींना सामोरे जाणे होते ज्याने शक्य
पटेल तुला हे नक्की कधीतरी
तेव्हा तू ही म्हणशील , हवं असं कुणीतरी
-- प्रिया
💬 प्रतिसाद
ढ
ढालगज भवानी
गुरुवार, 05/09/2013 - 19:29
नवीन
छान आहे. समोरच्या व्यक्तीला 'कमिटमेंट अँग्झायटी" असेल तर अशा भावना मनात येऊ शकतात.
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 05/12/2013 - 06:57
नवीन
कविता छान आहे, आवडली...
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/12/2013 - 08:54
नवीन
इतकाच फरक करायचा आवकाश की झालं स्वामींच गाणं.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 05/12/2013 - 11:55
नवीन
वा वा. काय कविताय. मस्त एकदम.
लै म्हणजे लैच आवडली आहे. :)
पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 05/12/2013 - 12:09
नवीन
...." काळजी करू नकोस , आहे मी " ....
यावरून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे" आठवले.
(स्वगतः हल्ली स्त्र्यायडी खरा की लटका हे कळेनासं झालंय)
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/12/2013 - 12:33
नवीन
हमारे खयाल कितने मिलतेजुलते है!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sun, 05/12/2013 - 12:44
नवीन
...पटेल तुला हे नक्की कधीतरी...
त्याला हे पटले की आम्हाला नक्की कळवा आणि पार्टीत बोलवा.
- Log in or register to post comments