Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत

म — मूखदूर्बळ, Tue, 05/07/2013 - 06:56
नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत नाच रे सुब्रा नाच ! सेबीशि वेडा झुंजला रे काळा काळा पैसा भिजला रे आता तुझी पाळी, वीज पडे भाळी वाचव सहारा नाच ! भरभर धाड पडली रे रायांचि भरली शंभरी रे पेपरात लिहू, जहिराती देऊ करुन ठणाणा नाच ! नवनव्या योजना(स्कीम) काढूया रे गुंतवणूकदारांस नाडूया रे करोडोंच्या नोटांत, केस लढु कोर्टात नवाबी लखनव्या नाच ! मिडीयाची गडबड थांबली रे तुझि माझि जोडी जमली रे जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड कमांडीखाली त्या नाच ! चु भू द्या घ्या ____________________ मूळ अजरामर गाणे: नाच रे मोरा, अंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच ! ढगांशि वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच ! झरझर धार झरली रे झाडांचि भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ करुन पुकारा नाच ! थेंबथेंब तळ्यात नाचती रे टपटप पानांत वाजती रे पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत निळ्या सौंगड्या नाच ! पावसाचि रिमझिम थांबली रे तुझि माझि जोडी जमली रे आभाळात छान छान, सात रंगी कमान कमानीखाली त्या नाच ! गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - पु. ल. देशपांडे स्वर - आशा भोसले चित्रपट - देवबाप्पा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2843 views

💬 प्रतिसाद
क
कुंदन Tue, 05/07/2013 - 10:01 नवीन
कमांडीखाली त्या नाच ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/07/2013 - 11:26 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 05/07/2013 - 12:15 नवीन
मुखदुर्बळ बोलतात (लिहीतात) तेव्हा भारीच बोलतात.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 05/07/2013 - 14:18 नवीन
भारीच !!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 05/07/2013 - 14:47 नवीन
खरपूस व समयोचित विडंबन!!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 05/07/2013 - 14:50 नवीन
खर्पूस, फर्मास अन फक्कड इडंबण!!!! मस्त आवडल्या गेले आहे!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 05/07/2013 - 15:58 नवीन
मज्जाच !!! =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/07/2013 - 19:38 नवीन
जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड कमांडीखाली त्या नाच ! >>> =)) __/\__ =))
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 05/08/2013 - 05:55 नवीन
झकास . मूळ गीत दिलेत हे फारच योग्य . छोटेसे इडंबन गाणे पाच पानी खरडीपेक्षा भारी हाय .आपलं एरंडाचं गुऱ्हाळ असंच चालू ठिवा खुळुम खुळुम . रायांनी क्रिकेटवीरांना दोन कोटिँचे बंगले अॅंबिवहैलीत दहा वर्षांपूर्वी फुकट दिले होते (असेपण ते विकत घेऊ शकत होते) .सुयेशदादा ,भाई ठाकूर ,कलमाडी यांनी वरपर्यंत प्रामाणिकपणे माल पोहोचवला पण हेचि फळ काय मम तपाला होऊन रडत बसले .काळे मेघ पांगले नि भर उन्हात नाचायची पाळी आली .
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 05/08/2013 - 06:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Wed, 05/08/2013 - 10:26 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 17:14 नवीन
खतरनाक हसले!!! ;)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 05/08/2013 - 18:25 नवीन
मस्त विडंबन. आर्थिक गैरव्यवहार करणारी सुब्रतो रॉय, किंगफिशर, चिट फंड चालवणाऱ्या वगैरे धेंडांना सामाजिक प्रतिष्ठा मिळू नये असे मनापासून वाटते. दुर्दैवाने तसे होत नाही.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Sat, 05/11/2013 - 09:30 नवीन
धन्यवाद परत एकदा :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा