Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पौरुषाला आव्हान...!

व — विसोबा खेचर, Mon, 05/06/2013 - 17:19
राम राम मिपाकरहो, आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास.. फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य.. परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया.. त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना.. परंतु मला मात्र त्या मुक्तकामधली ताकद, त्यातील अफाट ऊर्जा जाणवली आणि 'तुम्ही नाही तर निदान मला तरी हे मिपावर लिहू द्या आणि मिपाकरांना एका छोटेखानीच परंतु जबरदस्त कलाकृतीचा आस्वाद घेऊ द्या..' असं मी रामदासबुवांना म्हटलं आणि अखेर हो, ना करत त्यांनी परवानगी दिली.. --------------------------------------------------------------------------------------------- सदर मुक्तकातली बच्यकी ही एक वेश्या आहे आणि तिचं हे प्रकटन आहे... पौरुषाला आव्हान.. (शीर्षकश्रेय - तात्या.) कथा जशी सरकत जाते त्याप्रमाणे बच्यकीची अनेक नॅरेशन्स आहेत .त्यापैकी एक... ये ना पुढे. ये..! माझ्या लाखो पेशी वाट बघतायत.. त्या पुरुषोत्तमाची जो भोगेल मला नजरेच्या हजारो कोनांतून.. भिरकावून टाकेल त्याच्या श्वासांच्या वावटळीत झेलेल अल्लद त्याच्या अनेक हातानी... आणि मी म्हणेन सोडू नको मला आता...! मी वाट बघते त्याची, जो करेल मोकळे आतून बंद झालेले झरे आणि न्हाऊ घालेल मला माझ्या बेबंद निर्वस्त्र अस्तित्वाला.. पुरून उरेल ज्याची वाफ, अशा ढगासारखा येईल... कधीही...! आणि मलाही लाज वाटणार नाही माझ्या ओलेत्या अंगाची... ये.., ये ना पुढे. लाखो डोळ्यानी - लाखो इंद्रीयाचा इंद्र होउन ये...! एक बाई म्हणजे दारु ठासून भरलेल्या फटाक्यांची पेटी असते... एक फुलबाजी म्हणजे दिवाळी नाही. एका चार क्षणाच्या आतषबाजीत तुझी आग संपत असेल तर.... तर जा बघ.. सिनेमाच्या पडद्यावरचेच प्रेमालाप.. आणि कुढत-कुरवाळत बस तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...! -- रामदास.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39823 views

💬 प्रतिसाद
ढ
ढालगज भवानी Fri, 05/10/2013 - 19:29 नवीन
तिच्याशी कॅरम खेळावा आणि ती हरत असलेल्या डावात तिला जिंकवावं.
हे भारी!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/10/2013 - 21:11 नवीन
बहोत खूब संजयजी. दिलसे!
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 05/16/2013 - 08:28 नवीन
संजयकाका, अत्यंत तरल, सुंदर प्रतिसाद.. आवडला..
विलाच्या टेरेसवर,
हे जरा कठीण आहे, सध्या आणि नजीकच्या भविष्यकाळात..;-)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 05/16/2013 - 10:04 नवीन
आणि न जमण्यासारखं काय आहे त्यात? ऑफ सिझनला रिसॉर्टचे विला अत्यंत स्वस्त असतात. (अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 05/16/2013 - 13:54 नवीन
न जमण्यासारखं काय आहे त्यात? ऑफ सिझनला रिसॉर्टचे विला अत्यंत स्वस्त असतात.
अहो काका, मला वाटलं की स्वत:च्या विलाबद्दल बोलताय म्हणून बोलताय.. त्यामुळे 'कठीण आहे' म्हणालो..:-) तसाच रिसाॅर्ट, विला ह्यांपासून शेकडो मैल दुर असलेल्या भागात सरकारी नोकरी करतोय हो मी..:-(
(अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)
अगदी अगदी.. तसा सभ्य आहे हो मी..;-)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 05/16/2013 - 16:33 नवीन
(अर्थात बायको मात्र स्वतःची हवी.)
या प्रणयाच्या बाबतीत ही लग्नव्यवस्थेची भानगड कुठून उपटली? निसर्गाने दोन धृव तयार केले तेव्हा लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं ब्वॉ.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 05/16/2013 - 17:13 नवीन
हहपु
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/16/2013 - 21:11 नवीन
स्वपीडनाचा "विकार" तुम्हां दोघांपैकी आधी कोणाला झाला? ;-)
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 05/16/2013 - 17:48 नवीन
चिगोशी सहमत
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/09/2013 - 21:40 नवीन
ही दुर्दमनीय अविरोध गती कामेच्छेचा मुलाधार आहे. म्हणुनच तिच्यात मनाला मुळापासुन झंकारायची प्रचंड शक्ती आहे. हे झंकार आपले तरंग सर्वत्र पसरवतात. नैसर्गीक प्रेमभावना असो, वा मानवनिर्मीत लग्नव्यवस्था असो... प्रेमीकांचे नाते असो वा पती-पत्नीचे, वेश्येने पैशापोटी केलेली शय्यासंगत असो किंवा समर्पण भवनेने लीन झालेली प्रेमीका असो... या सर्वांना जीवन देणारी मुळ प्रेरणा एकच आहे. ति प्रेरणा अमुक एक रूपात, अमुक एक नात्यातच बहरेल असं काहि नाहि. या काव्यात रामदासजींनी वर्णन केलेलं स्त्रिमनाचं आंदोलन अगदी सहज शक्य आहे... रामदासजींचा (तात्यांच्या मार्फत मारलेला) आणखी एक जोरदार षट्कार. अवांतरः लज्जा हा मनाचा फार लोभसवाणा पैलु आहे. या कुलीन स्त्रिच्या माथी सरसकट टॅबु नावाचा शिक्का मारुन तिला विद्रुप करायची हौस अत्यंत गचाळ आहे. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
स
सदाराम Fri, 05/10/2013 - 16:12 नवीन
झकास्
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/11/2013 - 07:45 नवीन
बिफोर आय क्लोज.... पहिली गोष्ट, रामदासजींना मी फक्त गविबरोबर फोटोत पाहिलंय. जसं इतर एकालाही मी व्यक्तिश: ओळखत नाही तसंच त्यांनाही नाही. माझ्या पहिल्याच प्रतिसादावर इथल्या अनेकांच्या मनात रामदासजी काय चिज़ आहेत ते रेवतीनं स्पष्ट केलंय. ते इथल्या अनेकांचे आप्त आहेत. मला रामदासजींच्या प्रतिसादाची अपेक्षा होती. देहाला साधन बनवून उपजिविका करणा‌र्‍या स्त्रीची प्रणयाप्रती काय भावना असते या तरल विषयाचा वेध घ्यायचा होता. पण रामदासजींसारख्या व्यासंगी सदस्यानं प्रतिसाद न देण्याचा पर्याय निवडला. माझा प्रतिसाद लेखनाच्या आशयावर आहे, लेखकावर नाही इतकं (त्यांचे चाहते समजू शकतील किंवा नाही पण) रामदासजींसारखा माणूस तरी नक्की समजू शकेल अशी अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट, खुद्द फोरास रोडवर काम केलेल्या शेखरनं माझ्या प्रतिसादाचा किमान प्रतिवाद तरी करावा अशी अपेक्षा होती. ‘रोशनी’ सारखं अनोखं ललित लेखन करणारा तात्या; वेश्येची चाहत काय, सारी दुनिया जिसके पिछे पागल है वो मोहोब्बत तिच्या लेखी काय आहे, ती प्रियकरात काय शोधते या अंगानं चर्चा करेल असं वाटलं होतं. तात्यानं सुबोध खर्‍यांना धन्यवाद देऊन सरळसरळ प्रतिसादाच्या इमॅच्युरिटीवर रोख नेला. पुढे हाईट झाली, इंटरनेटवर कितीही पटलं तरी तसं आवर्जून सांगणारे दुर्लभ. सुबोध खर्‍यांच्या प्रतिसादावर मी उपप्रतिसाद दिला तेंव्हा ते माझ्याशी राजी झाले! वास्तविक ज्यांच्या लेखावरच्या प्रतिसादामुळे मी अश्लील लिहीतो या वादात सापडलो त्या लेखकानं आवर्जून प्रतिसाद दिला नसता तरी चाललं असतं. त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक आहे. (त्या पोस्टवर त्यांच्याशी देह आणि मानसिकता या अंगानं स्त्रीयांच्या स्तनांच्या कॅन्सरविषयी चर्चा करायची होती. आणि स्त्रैण मानसिकता, स्वत:च्या स्त्रित्वाचा गौरव, आणि स्तनांच्या कॅन्सरपासनं भयमुक्तीसाठी स्त्रीनं काय करायला हवं ते सांगितलं आहेच.) शेवटी कहर झाला, ‘प्रेमिका आव्हान देणार नाही ? मग कोण देणार ?’ असा सवाल झाला आणि त्यामुळे स्त्रीची मानसिकता (मग ती वेश्या असो की कुणी सामान्य स्त्री) प्रेम म्हणजे काय, आणि प्रणयतृप्तीवर लिहू शकलो! जे म्हणायचं होतं ते सांगायला इतका अविश्वसनीय प्रवास झाला!

संपादित

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/11/2013 - 07:55 नवीन
जाव द्या हो संजयराव.. प्रत्यक्ष बोलूया केव्हातरी.. रामदासभाऊंना पण बोलावतो.. एकेक क्वार्टर मारू आणि जरा गंभीर चर्चा करू आणि काहितरी सुवर्णमध्य काढू.. काय बोल्ता? :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/11/2013 - 07:57 नवीन
किंबहुना, एखादा 'क्वार्टर-कट्टा' करुया असं रामदासभाऊ म्हणतात. आत्ता ते माझ्यासोबतच आहेत.. :)
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 05/12/2013 - 16:57 नवीन
क्वार्टरची किंमत काय असते? एखाद्या क्वार्टरमध्ये आठवड्याचा किराणा येतो का? की ४ दिवसांचा येतो ?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 05/12/2013 - 17:04 नवीन
त्यामुळे प्रश्न गैरलागू आहे
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 05/12/2013 - 18:40 नवीन
मुळात किराणा मालात कशाकशाचा समावेश होतो ते विचार की....! आमचा एक मित्र उसने दिलेले पैसे मागायला गेलो की फार वाईट परिस्थिती आहे, पैसे नाहीत द्यायला म्हणतो नि संध्याकाळ झाली की हाप ब्लेंडर्स प्राईड मागवतो रोज. - रोज आवश्यक झालेल्या गोष्टीला किराणा मध्ये गणलं जावं का?
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 05/16/2013 - 17:56 नवीन
>>>>मुळात किराणा मालात कशाकशाचा समावेश होतो ते विचार की....! माझ्या माहितीनुसार गायकी मधे देखिल किरानाचा समावेश होतो. >>> रोज आवश्यक झालेल्या गोष्टीला किराणा मध्ये गणलं जावं का? एखाद्या रुग्णास त्याचा रोजच्या औषधांची मात्रा देखिल मग किराणा मधेच मोडते का ? असा प्रश्न पडतोय.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 05/12/2013 - 19:04 नवीन
जनता क्वार्टर म्हणजे ओल्ड मंक किंवा इंपिरिअल ब्लू १०० रुपयांच्या एका नोटेत मिळून जाते. तेवढ्यात आठवड्याचा किराणा येणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 05/12/2013 - 20:05 नवीन
कॅन्टीनला काय? बाहेर महाराष्ट्रात नाही मिळत एका नोटेत. :( थोडे वर द्यावे लागतात.
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 05/11/2013 - 08:01 नवीन
"दारुचा पाश करी संसाराचा नाश"
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/11/2013 - 09:01 नवीन
आणि नशा कशात नाही? हे संकेतस्थळ काय कमी नशेमन आहे? इथे लिहीण्यात नशा आहे. एकेकाशी प्रतिवाद करण्यात नशा आहे. तुझ्या आणि रामदासजींच्या प्रतिसादातल्या दिलदारीला दाद देण्यात नशा आहे. परवा मित्रांच्या मैफिलीत प्रत्येकी चार पेग झाल्यावर `स्त्री काय चिज़ आहे' यावर एकानं सांगितलेला हा ज्योक ऐकः बराकच्या सेकंड टर्म प्रेसिडेंशियल विजयानंतर मिशेल म्हणते; बॅरी आपण हा आनंद व्हाइट हाऊसचा कोणताही प्रोटोकॉल न पाळता, दोघंच कुठं तरी दूर जाऊन, आपल्या पहिल्या दिवसांसारखा साजरा करू. बराक म्हणतो, मला मंजूर आहे, कुठे जायचं ते ठरव. मिशेलनं ठरवलेल्या एका दूरच्या साध्याश्या हॉटेलात दोघं सामान्य नागरिक म्हणून जातात. हॉटेल मालक म्हणतो, `मिस्टर प्रेसिडेंट, माझ्यासारख्याचं हॉटेल तुम्ही सेलिब्रेशनला निवडलं यात माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. तुमच्या इच्छेप्रमाणे इथे तुम्हाला इतरांसारखच वागवलं जाईल. माझी फक्त एक विनंती आहे, मला मिशेलशी दोन मिनीटं बोलायचंय. बराक म्हणतात, वाय नॉट? प्लीज गो अहेड. मालक आणि मिशेल तब्बल वीस मिनीटांनी परत येतात आणि सुहास्य वदनानं मिशेल सांगते : बॅरी, तू मला प्रपोज करण्यापूर्वी वी हॅड अ‍ॅन अफेअर. याच्याशी गपा मारतांना मी नॉस्टॅलजिक झाले आणि वेळेचं भान राहिलं नाही' बराक पण मिश्कीलपणे म्हणतो, तू याच्याशी लग्न केलं असतंस तर आज या हॉटेलची मालक असतीस. मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 05/11/2013 - 09:12 नवीन
तात्या, जगणं हीच एक नशा आहे त्यामुळे मला तर कायम चढलेलीच असते
हरकत नाही.. उतार्‍याची घ्यायला या.. :)
मिशेल म्हणते, बॅरी तसं नाही. मी त्याच्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकाचा प्रेसिडेंट असता!'
मस्त.. :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/11/2013 - 09:20 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 05/11/2013 - 07:58 नवीन
नो वे !! (कुठल्याही) स्त्रींच मन, पुरूष कसा काय ओळखु शकतो व्बा ? काल्पनिक प्रकटन म्हणुन आवडली असे म्हणायचे धाडस रामदास काकांशी असलेल्या सख्यामुळे करताही येत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 05/13/2013 - 05:37 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 05/16/2013 - 00:34 नवीन
आणि कुढत-कुरवाळत बस तुझ्या आखूड पौरुषाला पाप पुण्याच्या अंधारात...!
ह ह पू वा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 22 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 24 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 26 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 30 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा