धरण उषाला कोरड घशाला
खिशामध्ये हात घालुन काही तरी खात होता
एका हातात हांडा घेऊन घाईघाईने जात होता
रखरखीत ऊन्हात वहात होत्या घामाच्या धारा
विचारले आम्ही त्याला कुठे जातोयस रे पोरा
त्यानेही अगदी सहजतेने आम्हाला उत्तर दिले
घरी आहेत आई वडिल तहाणेने व्याकुळलेले
कष्ट करुन त्यांना आलेय थोडी कणकण
पाण्यासाठी आमची होतेय अशी वनवन
शेजारच्या गावामध्ये म्हणे टँकर येतोय दोनदा
बघतो तिथे मिळ्तोय का पाण्याचा एखादा हंडा
तसं तर धरण पण आहे आमच्या गावाच्या उषाला
पण म्हणतात ना धरण उषाला अन कोरड घशाला
आमच्या ही बाबतीत असच काही तरी घडलय
धरणातले पाणी शेजारच्या जिल्ह्यांना सोडलय
तुमच तर काय साहेब बिसलेरी बाटलीवर भागत
हांडाभर पाण्यासाठी आम्हाला रात्रभर जागाव लागतं
💬 प्रतिसाद
द
दिपक वायळ
Fri, 05/03/2013 - 17:01
नवीन
वा वाह छान
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 05/06/2013 - 06:28
नवीन
दारूण परिस्थिती आहे; पण शुद्धलेखनातल्या चुकीने कवितेतल्या कारूण्याला विनोदाची झालर लागली आहे.
'धरण उशाला' असं म्हणायचं आहे असं समजून घेतले आहे पण शीर्षकात 'धरण उषाला' हे वाचून भलताच अर्थ वाटला होता. असो.
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Mon, 05/06/2013 - 08:25
नवीन
शीर्षकात झालेल्या शुध्दलेखन चुकीमुळे जो कही गैरसमज झाला त्याबद्दल क्षमा....!
प्रतिक्रियेबद्दल धन्य्वाद
- Log in or register to post comments