Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(तू)

प — प्यारे१, Mon, 04/29/2013 - 08:57
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या थेंबासारखा तू . पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या घाणीसारखा तू . रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या बेवड्यासारखा तू . हवा मारुन मारुन न पेटणार्‍या रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखा तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा तू . सूर्यास्ताच्या वेळी हटकून नेहमीच्या जागी पाय वळणारा तू . तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू .... तू, तू आणि तू ... सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4891 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Mon, 04/29/2013 - 09:46 नवीन
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 04/29/2013 - 10:03 नवीन
कोडाईकनाल ला इतक्या भयंकर भूछत्र्या उगवतात ..? Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/29/2013 - 10:23 नवीन
@सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?>>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 04/29/2013 - 10:28 नवीन
बाब्बो, काय केलेस रे हे त्या कवितेचे?? ;) असो. विडबंनकारांना __/\__!! :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 04/29/2013 - 10:32 नवीन
हलके घेतल्याबद्दल आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 04/29/2013 - 10:40 नवीन
अगायायायायाया, मघवानाचे पार श्वानच करून टाकिलेनीत =)) =)) =)) (विडंबनप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 04/29/2013 - 16:59 नवीन
प्यारे श्वा, मध्वा नि युवा एकाच नजरेने पाहतो. ;) बादवे हे राहीलेच की, पनीर खाताच खाजणारी अ‍ॅलर्जी तू... ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/30/2013 - 10:45 नवीन
=)) अजून भरः डास चावताच उठणार्‍या खाजेसारखी तू ;)
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Mon, 04/29/2013 - 13:48 नवीन
तू कुठे चचला म्हंजे काय रे दादा?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 04/29/2013 - 17:07 नवीन
हा 'प्रेमानं' वापरला जाणारा शब्द आहे. चचणे = खपणे = हरवणे = मरणे अशा विविधार्थाने वापरला जातो. उदा. : गावाकडे एखादा थोडा अप्रिय माणूस मेला की अमुक अमुक चचला म्हणण्याची पद्धत आहे. -४थी स्कॉलरशिपला पास झालेला प्यारे ;)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/30/2013 - 06:34 नवीन
स्कॉल्लरशीप्प? बाब्वो!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/30/2013 - 06:36 नवीन
तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू
या ऐवजी तोंडी नाव आल तरी फटफटणार्‍या अस्सल शिव्यांसारखा तू हे कस वाटेल कविवर्य?
  • Log in or register to post comments
क
कोमल Tue, 04/30/2013 - 07:43 नवीन
:)) :)) :))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/30/2013 - 10:40 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा