Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

क्रिस गेलाख्यान.

ब — बॅटमॅन, Tue, 04/23/2013 - 15:45
कळायचे बंदचि होत पूर्ण क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण केले तयें बॉलर हो विवर्ण ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण आहेत साचे जरि लोक फार आय्पीलची कीर्त पहा अपार त्यातेहि हातोडिमाणूस येक क्रिस गेल आख्यान सांगेन येक पुण्यासवे खेळले बंगळूर ब्याटिंग घेई, रन काढि फार मिसाइले वर्षती जैं अपार छक्के तसे मारितो फारफार मारोनिया सिक्सर सर्व ग्रौंडी केली तये फिल्डरें कानकोंडी मागेपुढे ऑफ व ऑन बौंड्री लोकांचिया गेलचि नाम तोंडी ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा पळे कधी जास्त न तो फुकाचा त्यासाठी हा सिक्सरू खेळ साचा जो ऐंशि वा शंभर मीटरांचा आरंभि इब्राहिमखान जैसा जो गारद्यां मारि पहा अपैसा तैं गेलने तीस चेंडूंत फक्त हो ठोकली सेंचुरी पूर्ण सक्त त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस यासाठिची जी षटकेहि वीस त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस वन्डे असो वा विस ओव्हरींचे पैं शॉट याचे बहुता परींचे फाष्टर् असो वा स्पिनही असो तो चेंडू सदाचा नभि धाडतो तो ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा सचिन जिमि शतक पर | मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर | त्यों तडीपार सिक्सर पर | क्रिस गेल राज है ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5222 views

💬 प्रतिसाद
प
पैसा Tue, 04/23/2013 - 15:49 नवीन
जोरदार बॅटिंग रे बॅट मॅना! बाकी २०/२० मधे कधीतरी डबल शेंच्युरी गेल नावाचे वादळच करील!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/23/2013 - 15:52 नवीन
:) होय, हे फक्त तो गेलच करू शकेल, अजून कुणाच्या बसची बात ही नाही. केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे गेलही म्हणतो: "फटक्यास माझ्या कुंपण पडणे मला न साहे | तेच पतित की, आखडिती प्रदेश फटक्याचा |" :)
  • Log in or register to post comments
व
विनोद बोरोले Tue, 04/23/2013 - 15:51 नवीन
खुपच छन....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/23/2013 - 15:55 नवीन
तेथे कुणाचे चालेना..
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 04/23/2013 - 16:11 नवीन
गेल हा मनुष्यप्राणी नाही.....हा बहुतेक मागच्या जन्मीचा महाबली भिम आणी हिडींबेचा पुत्र घटत्कोच असावा.अक्षरशः बोलर्सची कत्तल करतो हा प्राणी....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/23/2013 - 16:17 नवीन
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस>>> Image removed. तु ही आज ब्याट-म्यान करणार नाहिस बहुतेक ;-)
  • Log in or register to post comments
उ
उपास Tue, 04/23/2013 - 16:20 नवीन
समयोचित.. आवडलं!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 04/23/2013 - 16:23 नवीन
भारी लिहिलय की. मजा आली वाचायला. :)
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 04/23/2013 - 16:30 नवीन
त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस यासाठिची जी षटकेहि वीस त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस
कडक!
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Tue, 04/23/2013 - 16:32 नवीन
__/\__ लै भारी रे बॅट्या.. मान गये.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Wed, 04/24/2013 - 07:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/23/2013 - 17:26 नवीन
खल्ल्लास आहे ! ! ! ! ! खत्त्त्तरनाक ! भारी आहात आपण.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/23/2013 - 17:34 नवीन
मस्त रे!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 04/23/2013 - 17:42 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 04/23/2013 - 17:52 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Tue, 04/23/2013 - 18:09 नवीन
काव्यरसाचा पण कडक शॉट! (वाचता वाचता वाटत होतं की एखाद कडव्याच्या शेवटि गा का पा असतं नं तसं येईल, पण नाही आलं) यावरून अर्धवटरावांची (पेटवी लंका हनुमंत) आठवली.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 04/23/2013 - 18:22 नवीन
कवितेच्या दुव्याबद्दल बहुत धन्यवाद :) खत्तरनाक कविता आहे एकदम!!!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 04/23/2013 - 18:13 नवीन
लै भारी... एकदम खतरनाक :) :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/23/2013 - 18:19 नवीन
बॅमॅ - दंडवत स्विकारा... ख्रिस गेलने हाणले मणामणाने, प्रसवले शीघ्रकाव्य ब्याटमणाने... (गुस्ताखी माफ असावी)
  • Log in or register to post comments
स
साळसकर Tue, 04/23/2013 - 18:34 नवीन
हा हा हा.. भारीच लिव्हलय.. कविता आवडत नाही की कळत नाहीत पण क्रिकेटचे वेड या धाग्यात खेचून घेऊन आले..
  • Log in or register to post comments
म
मिहिर Tue, 04/23/2013 - 20:29 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Tue, 04/23/2013 - 20:43 नवीन
साधु साधु !!!! हे तूच करू जाणेस रे बाबा.
  • Log in or register to post comments
क
कोमल Wed, 04/24/2013 - 06:15 नवीन
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस
:)) १० कडव्यांतून १० षटकार लगावलेत की तुम्ही सुद्धा... बेष्टच...
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 04/24/2013 - 06:19 नवीन
जबरदस्त म्हणजे एकदमच जबरदस्त.. बॅट्समॅन गेल और बॅटमॅन, तुस्सी ग्रेट हो :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 04/24/2013 - 06:22 नवीन
आवडलं (हे आपलं तू कंपूत म्हणून ) बाकी कोण गेल? - धन्यवाद
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Wed, 04/24/2013 - 06:24 नवीन
कहर.... लईच झ्याक ! सचिन जिमि शतक पर | मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर | हे लई म्हणजे लईच भारी! जे.पी.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 04/24/2013 - 06:25 नवीन
:D :D
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ माणुस Wed, 04/24/2013 - 06:34 नवीन
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा भारी :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 04/24/2013 - 07:35 नवीन
जबराट लिवलया!
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Wed, 04/24/2013 - 08:09 नवीन
बॅट्समॅन गेल आणी बॅटमॅन.....कहर आहेत दोघेही. बॅटमॅना ___/\____ स्विकारावा.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Wed, 04/24/2013 - 08:31 नवीन
कालच्या सामन्यात जे घडले त्यामुळे पुण्याचे नाव आता क्रिकेट खेळल्या अन बघितल्या जाणार्‍या सर्व लोकांना कायमचे लक्षात राहिल एवढे मात्र नक्की.. ;) बाकी कवितेतील, त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस यासाठिची जी षटकेहि वीस त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस हे कडवे खासच.. :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 04/24/2013 - 08:47 नवीन
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/24/2013 - 09:49 नवीन
सुंदर रचना ! :) मी देखील एक तोडका-मोडका प्रयत्न करुन पाहतो... कैसे करावे ते वर्णन राज्यात असता आवर्षण क्रिकेट पाहुने सर्व जन म्हणे फलंदाजीत गुंतले मन हा हा काय म्हणावे कोणी कोणास सांगावे दुष्काळी राज्यास लागले कैसे हे व्यसन भलते लोक तिन्ही दिशेस भटकती तरी जला अभावी प्राण ठेवती त्याच राज्यी ही चालली मौज भलतीच पाहिली नसता चाड मनास कैसे भान जनास खेळ चालला हा मुजोर हा तर पैशाचा माज फार... बाण म्हणे सकल जनास विचारावे अंतरीच्या मनास काय उत्तर मिळते शोधुन ते जरी पहावे.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/24/2013 - 10:06 नवीन
बाणाख्यान आवडले!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 04/24/2013 - 10:24 नवीन
धन्यवाद :) बाणाख्यान आवडले हेवेसांनल :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/24/2013 - 09:55 नवीन
एक नंबर रे ब्याम्या. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 04/24/2013 - 10:04 नवीन
या शिघ्रकाव्याबद्दल दंडवत घ्यावा. _/\_
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 04/24/2013 - 10:31 नवीन
सचिन जिमि शतक पर | मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर | त्यों तडीपार सिक्सर पर | क्रिस गेल राज है ||
कविता वाचोण भूषण कवी आनंदिले असतील वर
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 04/24/2013 - 13:50 नवीन
बॅटींग ही आवडली आणि कविताही, खरच खुपच छान ! त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस बॅटींग बघुन डोळ्यांचे पारणे फिटले व कविता वाचुन मनाचे.... !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 04/24/2013 - 15:25 नवीन
जबरी गेलाख्यान !
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/24/2013 - 15:57 नवीन
क्रिकेट पाहीला नाही पण काव्य जबरदस्त झाले आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 04/26/2013 - 08:01 नवीन
यूट्यूबवर आहे का ही इनींग..? बाकी ब्याम्या.. तोडलंस लेका!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 11 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 25 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 27 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा