Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

Train To DAHANU

न
नावात्_काय्_आहे
Mon, 04/22/2013 - 20:11
💬 13
चायना मध्ये १ म्हण आहे , तशी ती चायनीज मध्ये आहे पण मराठीतच सांगतो . १० किलोमीटर फिरा किंवा १००० पुस्तक वाचा . तसं हे जर खरं मानलं तर आम्हाला इंजिनिरिंगमध्ये केटी नसती लागली .कारण भटकण्यात आमची ४ वर्ष गेली . हे कॉलेज मध्ये फिरणं किंवा फिरवण ,यामुळे भले हि ५% १०% कमी का पडले असेना .. :-) अक्कल मात्र आली नि पाझाळली पण . असो, १२ फेब्रूवारी , मोठ्या भावाच्या सासुरवाडीहून फोन आला , भावाच्या साल्याचा ( शिवी नाही आहे ;-) साला म्हणजे बायकोचा भाऊ ) साखरपुडा होता . तसं आधुनिक युगातले कुटुंब त्याला engagement म्हणतात .पण मी त्याला entertainment म्हणूनच पाहतो .( no offense please ) . ठिकाण होते डहाणू . साखरपुड्याची तारीख होतो १५ मी १४ फेब्रुवारीला :Pनिघायचे ठरवले . पुणे वेरावल एक्सप्रेसचे तत्काल मध्ये बुकिंग केले . रात्री ७.५० ची ट्रेन होती .ऑफिसमधून लवकर निघालो ,घरी आलो , bag भरली नि पीएमटीने निघालो , सर्व पेठा बघत बघत एकदाची बस स्टेशन ला पाहोचली . थोडस खाऊन , प्लटफॉर्मवर पहोचालो . reservation list पहिली तर त्यात माझं नावच नव्हतंच. आयुष्यातला आणखी १ धक्का .मग काय , बॅग उघडली ,तिकीट पाहिलं तर १४ फेब्रूवारी च्या एवेजी १४ मार्चचे बुकिंग झाले . चला , १४ फेब्रूवारी काही आम्हाला लाभत नाही , :-( .आता पुन्हा आमचे बाबा नि आई वर्ष ,२ वर्ष हा किस्सा सर्वांना ऐकवणार , मी किती वेंधला आहे हे परत सांगणार . असंच एकदा मी एक नात्यातली पोरगी पहिला गेलो होता , जाताना घाई घाईनेच अंगात जाकीट चढवल . त्यांचं घरी पहोचालो ,मुलगी आली , हसली पण .. :-) तितक्यात जाकीट वर लक्ष गेल, पाहिलं तर कपडे वळवताना लावायचा चाप तसाच त्याला. काय बोलणार , त्या दिवसापासून आई ,बाबाचं बोलतात , मी किती वेंधला आहे ते ! माझ्या मावस बहिणीच्या ,सासूला पण हि गोष्ट माहित आहे . असो मूळ मुद्द्यावर येऊ या ,तिकीट तर आता नव्हतच . काय करायचं विचार चालू झाला .पहिलाच नामी पर्याय सुचला , जाणे रद्द करू या . तो मला आवडला हि पण परत आई , बाबांच्या टोमणे आठवले . दुसरा विचार केला , मुंबई ला सकाळी जाऊ या , तिथून रेल्वेने जाता येईल . मग विचार केला अरे रेल्वेनेच जायच असेल तर याच ट्रेनने जाऊ या . धावत धावत फलाटावरून ,तिकीट खिडकीवर पोहोचलो. तिथे भली मोठी रांग . मी हि जरा हिमतीने सर्वात पुढे रांगेत घुसलो .रांगेत घुसत नाही तर मागून हिंदी , मराठी शिव्या ऐकू येऊ लागल्या. २ ४ अंग्रेजी मधल्या पण होत्या .त्या non-sesnse, idiot अश्या असल्यामुळे बहुतेक त्या मुलीनेच घातल्या होत्या .त्या सर्व शिव्या या माझ्यासाठी नसून , कोण ,दुसर्याकोणा व्यक्तीला प्रेमाने बोलवत असाव्या , अस समजून मी त्या कडे कानाडोळा केला . पण शेवटी बरयाच विनवण्या केल्यावर एकाने मला तिकीट घेऊ दिली .मला त्या माणसाविषयी बरीच आस्था वाटली , चांगला माणूस वाटला. पुढच्या क्षणाला आस्था व्यर्थ झाली . तो मला म्हटला , या जगात भूतदया आपण नाही दाखवणार तर कोण दाखवणार ? भूतदया !!!! जरा मराठीचा वर्ग घ्यावा वाटला , पण फलाटावर आमची आगगाडी उभी असल्यामुळे , मी आभार प्रदर्शन करून कलटी मारली .धावत धावत येऊन गाडी पकडली . गाडी सुरूच झाली होती मी स्लीपर च्या डब्यात चढलो , आणि तिकीट तपासनिकाची वाट पाहू लागलो . …. गाडीने वेग घेतला ,मी हि जरा बसायला जागा मिळते का ? या साठी २ डबे पालथे घातले . काही ठिकाणी जागा हि होती , पण वेळ रात्रीची असल्यामुळे काही वेळातच हि सर्व लोक झोपी जाणार हे हि गृहीतच होते , मी १ का डब्याच्या दरवाज्या जवळ येऊन तशरिफ टेकवली . पाण्याची बाटली पण विसरलो होतो , ती घेतली आणि मस्त थंड हवा चेहऱ्यावर घेत पुढचा प्रवास चालू झाला .कॉलेज ला असताना मी ट्रेननेच रोज प्रवास करत असल्यामुळे दरवाज्याजवळ बसने ,काही कमी पणाचे वाटत नव्हते . साधारणत: १/२ १ तासांनी १ गृहस्थ दरवाज्याजवळ आले , त्याच्या नासिकाजन्य आणि थोडाश्या तिरसट मराठीतून हटकले ,काय दरवाजात बसलायत , वारा थंड आहे , आमच्या प्रकुतीला मानवणार नाही . अर्थात या वाक्याने , यांचे सबंध आयुष्य मुळा मुठेच्या काठी गेले असणार याची मला खात्री पटली .लोणावळ्याच्या जवळ , रात्री साधरणतः ८.३० वाजता , उन्हाच्या झळा लागणार आहेत का ? पण मी वादात न पडता , दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट ignore केली .हा 'अस्सल पुणेकरांना ' टाळण्याच्या सर्वात सोपा , न तापदायक मार्ग आहे . (please note it down ). लोणावळ्याला शिंधी गरीब व्यापारी डब्यात चढला आणि तो पण इथेच दरवाज्यात बसला. मळकटलेला ड्रेस, दाढी वाढलेली , दिवसभर काम करून थकलेला चेहरा .तितक्यात चहा वाला आला ,नि चहा घेऊन गप्पा रंगल्या . गप्पात तो म्हंटला , “साहेब , ये तो रोज का हि ही , बीस सालो से सुबह ६ बजे घरसे निकालना , यहा माल बेचना , मुंबईमे माल खरीदते है और यहा बेचते है" , "बच्चे हात नाही बटाते?" मी विचारले . “साहब बच्चा तो कब का गुजर गया, बस बिवी और मे हु .” पुढे मला काय विचारव काही सुचले नाही , चहाचा घोट घ्याला पेला होठाला लावला , तर चहा कधीच संपला होता . आता कोणीच बोलत नव्हते , त्या शांततेला साथ देणारी एकाच गोष्ट होती , तो ट्रेन चा एक लयीत येणारा आवाज . कर्जत आले , तो उतरला , उतरताना म्हटला , "साहब फिर मिलेंगे" .मी मंद हसलो कदाचित स्वतःशीच म्हणालो ”हो नक्कीच" ….. जस अंबरनाथ गेले , मुंबईने स्वत:च्या अस्तीवाची जाणीव करून द्यायला सुरवात केली .दूर दिसणाऱ्या उंच इमारती , ट्रकच्या शेजारच्या झोपड्या , वस्तू लादाव्यात तश्या माणसांनी लादलेल्या लोकल , आणि या सर्वाना दरवाजात पाहणारा मी .हे सगळ मला जाम "confuse” करत , बहुतेक नेहमीच . हे सगळ कशासाठी ? हा प्रपंच कशासाठी ? १ बालगीताच्या २ ओळी ओठात आल्या , “कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी ", माधव जुलिअन कि पाडगावकर ? प्रश्न पडला , मी हि उत्तराच्या भानगडीत पडलो नाही .कारण पहिलच प्रश्न सुटला नव्हता , कशासाठी ? दरवाज्या जवळ बसल्यामुळे ,बरीच मंडळी नजर ओळखीची झाली होती ,१ का ने येऊन चौकशी केली , :-) नि निघून हि गेला . गाडी ठाण्यावरून पुढे बोरावालीला जाते , १०.३० वाजून गेले होते , शक्यतो सर्व मंडळी झोपी गेली होती , एव्हाना जर माझं हि reservation असते तर मी हि माझ्या i-pod ला जवळ घेऊन झोपी गेलो असतो. पण आता मस्त गाणी गुणगुणत बसलो होतो ,शिळ हि वाजवत होतो. “बैठू क्या ?” अरे मला हा का विचारतो ? , दरवाज्याजवळ कोणी हि बसू शकतो. हा बर्थ थोडीच आहे . मी मागे पहिले , “हा बिलकुल , तशरिफ रखो " मी हि शुद्ध हिंदीत सांगितले . त्याने हि त्याची तशरीफ टेकवली . मी हि वळवलेली मान सरळ केली , गाणी गुणगुणणे चालूच ठेवले . बोरावली गेले होते . “काही खायला आहे का?” फोन वर मी मराठीत बोललं असल्यामुळे मला मराठी येत हे त्याला समजले असावे . पुन्हा त्याने विचारले " काही खायला आहे का ?”, मी बागेतून गुड डे चा पुढा काढाला नि उघडून त्याचा पुढे ठेवला , त्याने न लाजता ४ , ५ बिस्कीट उचलली , मी हि चवीसाठी १ उचललं.त्याने न बोलता पुडा संपवला .त्याचे कडे काही समान दिसत नव्हते , म्हणून पाणी पण मीच दिले . सडपातळ ,इन न केलेला आडव्या रेघांचा सदरा, प्लेन pant आणि clean shave . साधारणत: ४० वर्षाचा असेल तो इसम .धन्यावद देऊन नाव , गावाच्या गप्पा चालू झाल्या .माझा कर्मभूमी mate , म्हणजे तो पुणेकर गृहस्थ २दा डोकावून गेला . मी विचारलं, “कुठे जायचे ", “अहमदाबाद " “काय एकटेच", तो म्हंटला , “नाही , भाऊ नि वाहिनी पण आहे " “ते कुठे आहे ", “वो आगे सोये हुये है ", “मग तुम्हाला झोप नाही येत आहे का", मी विचारलं . तो म्हंटला , “नाही , माझं बुकिंग नाही आहे " “confirm नाही आहे का?”, “ नाही काढाल नाही आहे " तो म्हंटला . Now I was shocked . “काय ??” "काय माझं general तिकीट आहे ,भाभी ने भाईला नाही सांगितलं " मी विषय टाळायला विचारल , “बिस्कीट खाणार का ?” तिथून थोड्या वरमलेल्या स्वरात आवाज आला . “हो ", आणि दुसरा good day चा पुडा पुढ्यात आला . त्याने विचारले , “ डहाणूला कशासाठी ". “साखरपुड्यासाठी .” “मग लग्न झाले का ?”, मी बोललो . “नाही " “ भाभी नाही म्हणते ", तो म्हंटला. त्याला पुढे हि बोलायचे होते , पण मीच विषय बदलला ,” अजून डहाणू किती दूर ", “बस आधा घंटा" ,तो बोलला आणि बोलण्याची गाडी दुसर्या विषयावर घसरली . १० मिनिटांनी त्याचा भाऊ तिथे आला , हातात चपाती नि भाजी होती , ते हि खाली बसले , नि दोघ खाऊ लागले ,तोडफार बोलून १० १५ मिनिटांनी ते निघून गेले . हा अजून हि चपाती,भाजी खात होता,डहाणू हि जवळ आले होते , गाडीचा वेग मंदावला , स्टेशन आलेच होते , मी पाण्याची बाटली त्याच्या हातात दिली . मला तशी आता लागणारच नव्हती , किबहुना लागली जरी असती तरी गरज त्याला जास्त होती . रात्रीचा १ वाजून गेला होता ,स्टेशन आले मी खाली उतरलो . तो म्हंटला "फिर मिलेंगे ", मी परत मंद हसलो , काही न बोलता वळलो , “फिर मिलेंगे ??” तो खडुस गृहस्थ , तो रोज प्रवास करणारा व्यापारी किंवा हा दरवाज्याजवळ बसून भाजी पोळी खात असलेला इसम नि मी , आम्ही खरच भेटणार आहोत का ? नाही....बहुतेक ? माहित नाही .खूप सारे प्रश्न मनात होते, थोडा नियतीचा राग हि होता , पण मूळप्रश्न अजून तसाच होता , आज हि आहे , कशासाठी ?? अगदी कशासाठी ? – लेखणीतून …. नावात काही नाही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5689 views

💬 प्रतिसाद
म
मुक्त विहारि Mon, 04/22/2013 - 20:28 नवीन
पहिला भाग आवडला..
  • Log in or register to post comments
व
वसईचे किल्लेदार Tue, 04/23/2013 - 07:45 नवीन
बाकि पोप्कोर्ण्र्स वेग्रे आलंच.
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Tue, 04/23/2013 - 08:04 नवीन
सुरुवात चांगली आहे येऊ द्या आणखी
  • Log in or register to post comments
न
नीलकस्तुरी Tue, 04/23/2013 - 09:31 नवीन
कपडे वाळवताना लावायचा चापच किस्सा अवडला! येऊ द्या आणखी...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/23/2013 - 10:00 नवीन
वा !!! आमच्या गावावर लेख. पहिला भाग फार त्रोटक झाला राव. येउंद्या जोमानं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/23/2013 - 10:05 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/24/2013 - 00:44 नवीन
वा! मस्तच.
  • Log in or register to post comments
न
नावात्_काय्_आहे Fri, 04/04/2014 - 18:42 नवीन
खुप उशिरा रहिलेला भाग प्रकाशित करतोय . माफी असावी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/04/2014 - 19:19 नवीन
माफी कशाला मागताय? तुमच्या सवडीप्रमाणे लिहा.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Fri, 04/04/2014 - 19:39 नवीन
अशी कुठ्लीच गाडी ऐकलेली नाही. कथा म्हणून चालवून घेतले आहे :-)
  • Log in or register to post comments
न
नावात्_काय्_आहे Sat, 04/05/2014 - 07:45 नवीन
साधरणत: या गोष्टीला वर्ष उलटून झाले , मुंबईला मी फारच कवचित येत असल्याने हि चूक झाली . पण हि काल्पनिक कथा नाही आहे .
  • Log in or register to post comments
अ
अगोचर Fri, 04/04/2014 - 19:52 नवीन
अक्कल मात्र आली नि पाझाळली पण
कारण पहिलच प्रश्न सुटला नव्हता , कशासाठी ?
अश्या वाक्यान्नी मजा आणली. रेल्वे आणि दरवाज्याच्या आठवणी जाग्या झाल्या. पण तिकिट तपासनीस उगवलाच नाही वाटते !
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Mon, 04/07/2014 - 12:16 नवीन
पण मुदलातल्या चुका करू नये. त्यामुळे ही सत्यघटना नाही हे लक्षात येते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा