स्वप्नांची शाळा
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती,
दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी,
ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा ,
घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर ,
दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा,
झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक ,
आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या,
मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती,
गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
💬 प्रतिसाद
प
पक पक पक
Sun, 04/21/2013 - 14:58
नवीन
चान चान....
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 04/21/2013 - 18:28
नवीन
ताज्या भाज्या चिरायला दाणपट्टा ?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sun, 04/21/2013 - 18:46
नवीन
छान बालकविता!
- Log in or register to post comments