Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

भार्गव राघव द्वारकाधीशा .. (भाग १)

प
परिकथेतील राजकुमार
Sat, 04/20/2013 - 06:49
💬 19
कलादालन आणि प्रवासवर्णन इथे आमची हजेरी कायम वाचक म्हणूनच लागत आली आहे. ह्या ठिकाणी कधी लेखक म्हणून येऊ असे वाटलेच नाही. त्यामुळेम मग अशा लेखांवरती आपले ज्ञानकण उडवणे येवढेc आपले काम उरले होते. मात्र काल अचानक रामनवमीच्या मुहूर्तावर द्वारकेची वारी झाली आणि मन कसे प्रसन्न झाले. ह्यातलेच काही फटू झेपेल तेवढ्या वर्णनासह देत आहे. काही दिवसांपूर्वी असाच योग पोरबंदरचे सुदामा मंदीर बघण्याचा आला. त्याचे देखील काही फटू देत आहे. ह्या सर्व प्रवासातले आमचे सहप्रवासी म्हणजे आमचे परम मित्र आणि मिपाचे मूकवाचक अमोल जाधव. खरेतर ह्या भूमीला आमचे पय लागण्याचा आणि ही पवित्र माती आमच्या कपाळाला लागण्याचा योग आमच्या अमोल जाधवांमुळेच शक्य झाला आहे. सध्या इथे त्याची कंपनी गुजरात ह्या दुसर्‍या कंपनीच्या सहाय्याने मस्त एकदम मख्खन असे रोड तयार करत आहे. . गुजरातमध्ये (खरेतर सौराष्ट्र) आल्यापासून प्रवास असा दोन टोकालाच होतो आहे. एका बाजूला पोरबंदरच्या दिशेने आणि एका बाजूला राजकोटच्या दिशेने. दोन्हीकडे जाताना येणारा समान अनुभव म्हणजे दुतर्फा दिसणारी जमीन आणि फक्त मोकळी जमीन. एक गिरनारचा डोंगर सोडला, तर इथे डोंगर नावाला देखील दिसणे मुष्कील. पोरबंदरला बघण्यासरखी ठिकाणे भरपूर, मात्र आमच्या पाहण्यात आलेली आणी अती आवडलेली ठिकाणे म्हणजे सुदामापुरी आणि Porbandar Bird Sanctuary. . . इथे निवांत बसून 'पाखरे' टिपण्याची देखील सोय आहे. पक्षांची माहिती देण्यासाठी जाणकार माणूस देखील उपलब्ध आहे. इथे आजारी, अथवा जखमी पक्षांची देखभाल देखील करण्यात येते. . . ह्या ठिकाणापासून जवळच आहे ती म्हणजे सुदामापुरी. कृष्णमित्र सुदाम्याचे जन्मस्थान. . सर्व ठिकाणी असते तशी इथे देखील फटू काढण्यास बंदी असल्याने, बाहेरच्या बाजूने जमेल तेवढा क्लिकक्लिकाट केला आहे. . . ही सुप्रसिद्ध 'लक्ष चौराशी' परिक्रमा. जी खरेतर सुदाम्याने कृष्णभेटीसाठी केली, पण इथे चालून तुम्ही देखील तिचे पुण्य मिळवु शकता. इथे सुदाम्याच्या जुन्या घराचे अवशेष फार छान जपलेले आहेत. खास गोष्ट म्हणजे, इथे प्रसाद म्हणून पोह्याची पुरचुंडी दिली जाते. पोहे अक्षरशः अविट गोडीचे असतात. . इथून पुढे सुरु होतो तो कीर्तिमंदिर अर्थात महात्मा गांधीचे जन्मस्थान आणि द्वारकेच्या दिशेन. ह्या धाग्यातच फटूंचा भडिमार झाल्याने, पुढच्या धाग्यात हा प्रवास पूर्ण करतो. अर्थात धागा उद्याच्या आतच त्वरेने टाकला जाईल हे नक्की. (क्रमशः)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5465 views

💬 प्रतिसाद
स
स्पा Sat, 04/20/2013 - 06:57 नवीन
ह्या धाग्यातच फटूंचा भडिमार झाल्याने,
खरय.
पुढच्या धाग्यात हा प्रवास पूर्ण करतो. अर्थात धागा उद्याच्या आतच त्वरेने टाकला जाईल हे नक्की.
कशाला? बाकि चान चान
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 04/20/2013 - 06:57 नवीन
गुड टु सी यु हिअर.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 04/20/2013 - 11:12 नवीन
मस्त फोटो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Sun, 04/21/2013 - 08:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 04/20/2013 - 12:08 नवीन
शेवटच्या फोटूत नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 04/21/2013 - 04:50 नवीन
"(स्वस्तिक) श्री सुदामाजीकी लक्ष चौराशी परिक्रमा (स्वस्तिक)" हे आहे. पर्‍या...लेका तुझ्यासारखा मनुक्ष भटकंतीमध्ये येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं रे. :D
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 04/21/2013 - 05:18 नवीन
गुजरातीत अभयारण्याचे अभ्यारण्य झालेले पाहून 'गंमट' वाटली :). बाकी वास्तवातल्या असो वा अ-वास्तवी. सँक्च्युअरीज् एकंदरीतच 'रण्य' (ज्यांच्यावरून रण माजू शकते असे जे ते) क्याटॅगॅरीतल्या ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 04/21/2013 - 05:27 नवीन
नंद्या...नंद्या....दे मेल्या..पाय कापून दे पाठवून...देव्हार्‍यात ठेवेन म्हणतो. =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 04/21/2013 - 12:57 नवीन
अगागागागा =)) =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 04/21/2013 - 13:24 नवीन
हा हा हा हा! परवाचा चेपुवरचा शिरा पण पराच्याच हातचा खरंतर! येतील. आता पाकृ देखील येतील. ;)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 04/21/2013 - 05:55 नवीन
फटु चान आलेत पराशेठ,
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Sun, 04/21/2013 - 05:58 नवीन
शीर्षक पाहून लेख वाचायला घेतला आणि अपेक्षाभंग झाला.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 04/21/2013 - 09:26 नवीन
पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 04/22/2013 - 03:16 नवीन
भेटला का? भेटला? देवमाणुस म्हनौन मंदिरात बसवलेला माणुस भेटला का? बाकी जुन्या घराचे अवशेष म्हणजे कीती जुन झाल हो घर ते परासाहेब?
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 04/22/2013 - 03:20 नवीन
वा पोहे मिळतात किती स्थानोचित प्रसाद!!! कौतुक वाटलं.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Mon, 04/22/2013 - 09:53 नवीन
आवडले...जुन्या घराचे अवशेष म्हणजे काय हे बघायला आवडेल. असल्यास त्याचेही फोटो टाकावेत
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 04/22/2013 - 13:20 नवीन
चला बर्‍याच दिवसांनी पराशेठ लिहिते झाले. तो पहिल्या फोटोतला रस्ता बघुन डोळे निवले हो.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 04/23/2013 - 15:23 नवीन
मस्त माहिती आणि फोटू! अजून येउंदेत.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 04/23/2013 - 15:33 नवीन
छान. फोटु आवडले. पुढच्या भागाची (आणि सुदाम्याचे पोहे कधी खायला मिळणार याची) वाट बघत आहे. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा