Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

झणझणीत सातारी कोंबडी

स
सानिकास्वप्निल
Wed, 04/17/2013 - 18:30
सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब मालिकेतल्या चिकन ह्यामधील ही पाककृती आहे.पाककृतीचे प्रमाण मी आमच्या आवडी व चवीप्रमाणे बसवले आहे. साहित्य: अर्धा किलो कोंबडीचे तुकडे हळद + मीठ लावून ठेवलेले २ कांदे उभे चिरलेले ५-६ लसुण + १ इंच आले ठेचून ३ टेस्पून कांदा-लसूण मसाला (हा मसाला खूप तिखट असतो , थोडी चव घेऊन बघा व त्याप्रमाणे घालावा) २ टेस्पून सुके खोबरे १ टेस्पून पांढरे तीळ १ टेस्पून खसखस १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १/२ टीस्पून हळद मीठ चवीप्रमाणे ३ लसूण पाकळ्या बारीक चिरलेली कोथींबीर तेल . पाकृ: एका पॅनमध्ये तीळ, खसखस व सुके खोबरे कोरडेच सोनेरी रंगावर भाजून घ्या. भाजलेले जिन्नस वेगळ्या ताटलीत काढून घ्या. पॅनमध्ये १ टेस्पून तेल घालून ३ लसूण पाकळ्या परतून घ्या. लसूण सोनेरी-तांबूस रंगावर परतल्यावर त्यात उभे चिरलेले कांदे घालून लालसर रंगावर परतावे. थोडे गार झाले की खसखस, तीळ, सुके खोबरे, परतलेले कांदा+लसूण एकत्र करून, थोडे पाणी घालून वाटून घ्या. . जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉन-स्टीक भांड्यात ४ टेस्पून तेल गरम करावे व त्यात आले+लसूण ठेचा घालून परता. खमंग परतले की त्यात वरील वाटण घाला. त्यात लाल तिखट, हळद, कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. आता त्यात चिकनचे तुकडे व मीठ घालून परता व गरजेनुसार पाणी घालून, झाकून उकळी आणा. . चिकन शिजले की वरुन थोडी कोथींबीर घाला. झणझणीत सातारी कोंबडी गरमा-गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा. . नोटः मुळ पाककृतीत एक किलो कोंबडीचे प्रमाण दिले आहे मी अर्धा किलोच्या व आमच्या आवडीप्रमाणे प्रमाण बसवले आहे. मुळ पाककृतीत आल्याचा वापर अजिबात नव्हता, मी आले घातले, चांगले लागले. लसणाचा वापर जास्तं आहे पण इथे मिळणारे लसून मोठं असतं म्हणून पाकळ्या त्याप्रमाणे घेतल्या आहेत, तुम्ही जास्तं घेऊ शकता. कांदा-लसूण मसल्यात ही मिरच्या व इतर मसाले असल्यामुळे तो तसा झणझणीत असतो, म्हणून घालताना आवडीप्रमाणे कमी-जास्तं घालावे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25294 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Wed, 04/17/2013 - 18:35 नवीन
मार डाला टाईपचे फोटो आहेत! करुन पाहीन बहुतेक.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 04/17/2013 - 18:38 नवीन
भन्नाट.... शेवटचा फोटो तर क्या बात.. क्या बात !!! :) :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/17/2013 - 18:47 नवीन
रंगावरून चिकन चांगलं झालेलं असणारच. पण भाकर्‍या तर जबरदस्तच दिसत आहेत!
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 04/18/2013 - 07:07 नवीन
स्साला...काय चंद्रासारख्या शुभ्र भाकर्‍या आहेत!!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 04/18/2013 - 10:20 नवीन
भाकरी चे अनेकवचन 'भाकरी'च आहे. धन्यवाद. सामिष खात नसल्याने अम्मळ कमी श्या देण्यात आलेल्या आहेत. प्रेझेन्टेशन्साठी आहेतच. ;)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/18/2013 - 12:15 नवीन
असहमत. भाकरीचे अनेकवचन भाकर्‍याच आहे. आठवा "लष्कराच्या भाकर्‍या भाजणे"
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 04/18/2013 - 12:42 नवीन
पुण्यात भाकर्‍या म्हणतात पण ते चूक आहे. असो. असहमतीबद्दल सहमती.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 04/19/2013 - 10:21 नवीन
पुण्यात आम्ही जे बोलतो, ती प्रमाण भाषा असते. :-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 04/17/2013 - 18:52 नवीन
काय म्हणावं फोटूला? भारी, अगदी भारी. शाकाहारी असल्याने हा पदार्थ खाता येणार नाही पण चवदार झाला असणार असे वाटत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अक्षया गुरुवार, 04/18/2013 - 06:08 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Wed, 04/17/2013 - 18:55 नवीन
ह्या वीकांताला करूनच पाहतो.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/17/2013 - 19:00 नवीन
३ टेस्पून कांदा-लसूण मसाला - तयार मिळतो का कुठेही?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/17/2013 - 19:05 नवीन
अंबारी कंपनीचा मी इथे गोव्यात पण विकत घेते.
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 04/17/2013 - 19:15 नवीन
मी सासरच्या गावचा (सातार्‍याचा)घरगुती मसाला वापरलाय तिथे मसाला ऐवजी कांदा-लसूण चटणी असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/17/2013 - 19:19 नवीन
मग कसा बनवायचा तेही लिहा ना :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Wed, 04/17/2013 - 19:51 नवीन
हॅ हॅ ते आपले काम नाही सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते ;) मसाले घरी बनवणे वगैरे अजूनतरी कधी केले नाही मी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/17/2013 - 20:34 नवीन
अग्गो! साबांना विचारुन लिही की :D
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/18/2013 - 10:16 नवीन
सासूबाई गावावरुन आणून ठेवतात आणी मी तो सरळ घेऊन येते
आयतोबा कुठली ? उम्म्म्म (गाल फुगवुन भुवया उडवुन डोळे फिरवणारी बाहुली कल्पावी )
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 04/18/2013 - 09:56 नवीन
यशो, तुला हवे असल्यास साहित्य, प्रमाण अन कृती व्यनी करते. पण फटू गिटू नही है अपनके पास !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 04/18/2013 - 10:01 नवीन
कोंबडीचे नव्हे हो, कांदा-लसूण मसाल्याचे ! Image removed. (कॉलिंग स्वसंपादन-सुविधा..)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2013 - 12:20 नवीन
कर कर.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/17/2013 - 19:19 नवीन
इथे पाहते मिळतो का ते.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले गुरुवार, 04/18/2013 - 12:32 नवीन
कांदा-लसूण मसाल्याची (गावराण) पाकृ देवु शकते. आई कदुन शिकले आहे ते. आम्ही तो १ किलो वैगेरे करतो एकदाच. त्याचे प्रमाण मी देवू शकते पण फोटो वैगेरे नाहित हा कांदा-लसूण मसाला(आम्ही त्याला मसला तिखट/काळे तिखट असे म्हणतो) फार झणझणीत असतो, थोडासाही पुरे होतो. मस्त तर्रीवाले मटण्-चिकण होते आणि हे वापरुन भाजी केली तर इतर मसाल्याची गरज ही नसते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2013 - 12:36 नवीन
लिहा पटकन :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले गुरुवार, 04/18/2013 - 13:53 नवीन
कांदा लसूण मसाल्याच्या पाकृचा धागा काढला आहे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/18/2013 - 17:05 नवीन
मनापासून आभार मानले आहेत :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Fri, 04/19/2013 - 08:13 नवीन
:)..
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/18/2013 - 12:19 नवीन
तुम्हीपण अन्नपुर्णा सातपुते का ?
  • Log in or register to post comments
म
मी_देव Wed, 04/17/2013 - 19:00 नवीन
खल्लास,,,,,,,,,,,,,,,,
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 04/17/2013 - 19:05 नवीन
लाभले भाग्य आम्हा, वाचतो सानिकेचे पाकृ. धन्य झालो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 04/17/2013 - 19:13 नवीन
फोटो फार फार जीवघेणे आहेत.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 04/17/2013 - 19:47 नवीन
घरात कांदा-लसुण मसाला आहेच... आता ह्या वीकेन्डला करुन बघते. बाकी चेपु वर बोलले तेच... कोणीतरी माझा जीव घेणारे. ;) :D
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 04/17/2013 - 20:19 नवीन
तों.पा.सु. शेवटचा फोटो पाहून खपलो. बाकी काही लिहायची गरज नाही. तु सातारकरांची सुन आहेस म्हणल्यावर सगळेच त्यात आले.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 04/17/2013 - 20:23 नवीन
कोंबडी तर उत्तम झाली आहेच पण त्या भाकरीने आधी जीव गेला.
  • Log in or register to post comments
म
मराठे Wed, 04/17/2013 - 20:33 नवीन
किलर!
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 04/17/2013 - 21:56 नवीन
काहीच्या काही किलर फोटो टाकू नका बुवा!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 04/18/2013 - 00:33 नवीन
शक्यतो माझे मसाले मीच बनवितो. म्हणजे, पुस्तकात किंवा आंतरजालावर पाहून आणि आपल्या आवडीनुसार त्यातील जिन्नस कमीजास्त करून हवी तशी चव आणण्याचा प्रयत्न करतो. कालच भारतातून कोणी झणझणीत कांदालसूण मसाला सँपल म्हणून आणून दिला आहे. तो वापरून त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. आता ह्या पाककृतीनुसार 'सातारी कोंबडी' करून पाहतो. शेवटचे छायाचित्र खतरनाक आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 04/18/2013 - 01:17 नवीन
रस्सा अस्सा मस्स्त दिस्सतो आहे की बस्स!! खल्लास्स्स!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/18/2013 - 02:25 नवीन
एक जरा तो शेवटचा फोटू बघितला आणि डायरेक्ट सर्गात जाऊन पोचलो राव! काय छळ लावलाय रे? आँ? :) ह्या सातारी रश्श्यावरुन आठवण आली ती आमच्या म्हमईतल्या दिवसांची. हापिसातल्या शेट्टी केटरर्सनी दुपारच्या जेवणाची सोय लावली (चाल- वाट लावली) होतीच. संध्याकाळचं काय? ह्या प्रश्नानं भांडूप पालथं घालायला सुरुवात केली अन अचानक एक दिवस एक आडबाजूला असलेल्या सातारी खानावळीचा शोध लागला. त्या मावशी सातारच्याच. पोरगा म्हमईत 'अजिंक्यतारा' ट्याक्सी चालवायचा अन मावशी पोराच्या संसाराला मदत म्हणून खानावळ! देवाऽऽ....काय चिकन करायच्या त्या..ओहोहो!!! खानावळ म्हणजे काय, एक टपरीसदृश दुकान, त्यासमोर मांडलेले चार मळकट बाक..बस्स! पण चव काय होती...सातारी पध्दतीच्या खान्याचं वेड लागलं ते इथूनच. आजूबाजूला सातारकडचे रिक्षावाले, टॅक्सीवाले बसलेले असायचे अन त्यांच्यात 'ऑड म्यान आउट' मी! मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा....काय याद जागी करवून दिलीत सानिकाताई तुम्ही! बाकी, ते कांदा-लसूण तिखट जगात भारी शोध आहे बरं का. कधी असा प्रकार करुन बघा- कांदा-लसुण तिखट - बचकभर तेल - कांदालसुण तिखट कालवलं जाईल इतपत. लवंगी मिरच्या - चार-सहा (काळपट रंगावर गेलेल्या ) दही - वाडगाभर कादा - नग १ (बुक्कीनं फोडलेला) भाकरी - आपापल्या तबियतीनुसार. :) मीठ - चवीपुरतं. बास्स! हे एव्हढंच. पक्वान्नं झक्क मारतात की हो हेच्यापुढं :)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 04/18/2013 - 07:12 नवीन
मस्त डाव्या उजव्या हातानं भाकरी कुस्करायची, तीवर तो झणझणीत रस्सा ओतायचा अन तो काला हाणायचा..आहाहाहाहा...
हिच खाण्याची खरी पध्दत. भले असे खाणा-याला मागासलेला समजोत.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने गुरुवार, 04/18/2013 - 06:02 नवीन
मस्त झणझणीत दिसतेय कोंबडी.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 04/18/2013 - 06:08 नवीन
अगायायाया .... .. ... .................................
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 04/18/2013 - 07:13 नवीन
झकास्स्स्स्स्स्....कोंबडी रस्सा आणि तांदळाच्या भाकर्‍या बघुनच खपलो...!!! ह्या रविवारीच बेत करायला हवा आता.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/18/2013 - 07:18 नवीन
त्या भाकरीने जीव घेतला राव. शाकाहारी असलो तरी शेवटचा फोटो पाहून जाम त्रास झाला
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 04/18/2013 - 07:29 नवीन
तुमचा जाहीर निषेध करत आहे. आज उपवासाच्या दिवशी असले खतरनाक फोटो ते ही मांसाहाराचे (शिव शिव शिव) कुठे फेडाल हे पाप ? (उद्या खावु घालुन अर्थात....बघा बरं नाहीतर कढईचा कान तोच तो फोटोत दिसणारा ..तुटेल....माझ्या जिभेवर तीळ आहे म्हणे :)) )
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत गुरुवार, 04/18/2013 - 08:25 नवीन
फोटो पाहुनच खपलो. हाय भाकरी खाये एक अरसा हो गया! खरं तर भाकरीची लज्जत चिकन, मटन, अंडा करी अश्या रस्सेवाल्या पाकॄ बरोबरच खुलते. ह्या वेळच्या भारतवारीत आण्यायच्या लीस्ट मधे कांदा-लसूण मसाला अ‍ॅड केला गेला आहे आणि ह्या पाकॄची वाचनखुण साठवुन ठेवतोय.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/18/2013 - 09:09 नवीन
मस्तच ... पाककृती !! तोंपासु !! गावाची आठवण झाली ! मला लहानपणा पासुन वाटायचं की सातार्‍याच्या २ च गोष्टी प्रसिध्द १) कंदी पेढे २) सातारी जर्दा पण सातार्‍याची झणझणीत कोंबडीही प्रसिध्द आहे हे पाहुन फार आनंद झाला ( मला ... कोंबडीला नाही )
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 04/18/2013 - 09:36 नवीन
त्यामुळे सासूबाईची मर्जी झाली कि मिळते आम्हाला अशी मेजवानी वीकांताला. तरी पण फोटो पाहून या विकांताला स्पेशल फर्माईश करते सासूबाई कडे आणि खाते वरपून.
  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 04/18/2013 - 09:40 नवीन
निव्वळ अप्रतीम....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 04/18/2013 - 09:42 नवीन
गवताळ असल्याने फकस्त फटू साठी धागा उघडून पाहिला. तृप्त झालो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा