आई
आयुषभर कष्ट करुन जिने तुला वाढवल ।
आयुष्याच्या संध्याकाळी तिलाच तू रडवल॥ध्रु॥
चिऊचा काऊचा घास करुन,
जिने तुला भरवल ।
कड्या खांद्यावर घेऊन तुला,
गावभर फिरवल ।
माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून,
गावभर मिरवल ।
नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल...॥१॥
अनंत कळा सहन करून,
तुला हे जग दाखवल ।
चिमुकल्या बोटला धरुन,
चालायला शिखवल ।
खोकला येताच तुला,
मधाच बोट चाखवल ।
तळहाताच्या फोडप्रमाणे जिने तुला वाढवल...॥२॥
तुझ्यासाठी तिने आपल,
रक्त आटवल ।
शिक्षणासाठी तुला,
चांगल्या शाळेत पाठवल ।
जीवनभराच दु:ख ,
आपल्या पोटात साठवल ।
स्वतःच्या स्वप्नांना तिने पायदळी तुडवल...॥३॥
सगळेच काय अगदी,
श्रावण किंवा पुंडलीक नसतात।
जे अखंड आईवडिलांची,
सेवा करतात ।
परंतु कंसासारखेही,
काही जण असतात ।
त्यांना ही समर्थांनी उत्तमच घडवल....॥४॥
💬 प्रतिसाद
प
पक पक पक
गुरुवार, 04/18/2013 - 06:51
नवीन
छान...
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 05/12/2013 - 07:04
नवीन
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...!!
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Sun, 05/12/2013 - 14:06
नवीन
"मदर डे" निमित्त पुनःर्वाचन...!
- Log in or register to post comments
द
दिपक वायळ
Sun, 05/12/2013 - 16:42
नवीन
चिऊचा काऊचा घास करुन,
जिने तुला भरवल ।
कड्या खांद्यावर घेऊन तुला,
गावभर फिरवल ।
माझा बाळ्,माझा सोन्या म्हणून,
गावभर मिरवल ।
नऊ महिने तुला आपल्या उदरी वाढवल.
आई खूप छान असते
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 05/12/2013 - 19:02
नवीन
साधी आणि मनापासून लिहिलेली.
- Log in or register to post comments